दिल्ली दंगलप्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला अटक

नवी दिल्ली । फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणात पोलिसांनी ‘जेएनयू’चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याखाली (UAPA) गुन्हा दाखल केला आहे. रविवारी तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली. स्पेशल सेलने यापूर्वीही उमर खालिदची चौकशी केली होती. चौकशी दरम्यान स्पेशल सेलने जेएनयूचा … Read more

दिल्ली हिंसाचारा दरम्यान जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टवरही पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात उत्तर-पूर्व दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात आपली चार्जशीट दाखल केली आहे. कमालीची बाब म्हणजे, या चार्जशीटमध्ये एका डॉक्टरच्या नावाचा समावेश दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी अल हिंद रुग्णालयाचे मालक असलेले डॉ. एम. ए अनवर यांच्यावर दंगलीसाठी लोकांना भडकावण्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, चार्जशीटमध्ये आपलं नाव … Read more

जामियाची विद्यार्थिनी सफुरा जरगरला जामीन मंजूर

नवी दिल्ली । उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्या जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थिनी सफुरा जरगर हिला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मानवी आधारावर सफुरा हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. याला केंद्र सरकारनंही समर्थन दिलं आहे. दिल्ली हिंसाचार प्रकरणातील चौकशीवर परिणाम होईल अशा कोणत्याही कृत्यात सहभागी न होण्याच्या अटीवर दिल्ली उच्च … Read more

लोकसभा अध्यक्षांची काँग्रेसच्या ७ खासदारांवर निलंबनाची कारवाई, ‘हे’ आहे कारण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून दिल्ली हिंसाचारासंबंधी चर्चा करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत आजही गदारोळ कायम राहिला. या दरम्यान आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या गैरहजेरीत पीठासीन सभापती मीनाक्षी लेखी यांनी काँग्रेसच्या ७ खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित सत्रापर्यंत निलंबित केले. सभागृहात गोंधळ घातल्यामुळे या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबीत करण्यात आलेल्या … Read more

राहुल गांधींनी केला दिल्ली हिंसाग्रस्त भागाचा दौरा; म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी संध्याकाळी हिंसाचारग्रस्त उत्तर-पूर्व दिल्लीतील ब्रिजपुरी भागाचा दौरा केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदारांच्या शिष्टमंडळाने हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केला.यावेळी हिंसाचारा दरम्यान जाळलेल्या एका शाळेची त्यांनी पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की,”दिल्लीच्या हिंसाचारात एकात आणि बंधुभाव जाळला गेला. अशा प्रकारच्या … Read more

दिल्ली हिंसाचार: ‘त्या’ जवानाचे घर आता BSF बांधणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचारात अनेकांच्या घरांना दंगेखोरांनी आगीच्या हवाली केलं. या हिंसाचाराच्या आगीत देशाच्या सीमेवर तैनात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या एका जवानाचे घर सुद्धा भस्मसात करण्यात आलं. ही वार्ता प्रसार माध्यामाकडून समजताच बीएसएफने या जवानाला मदत करण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. ईशान्य दिल्लीत खास खजुरी गली परिसरात मोहम्मद अनिस या बीएसएफ जवानाचे घर होते. … Read more

दिल्ली हिंसाचार: सलग ४ दिवस जळत राहिली राजधानी,पोलिसांना आले तब्बल 13,200 कॉल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील हिंसाचार थांबला आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा जास्त जखमी जीटीबी रुग्णालयात दाखल आहेत. दिल्ली पोलिस सर्व हिंसा प्रभावित भागावर दक्षतेने नजर ठेवून आहेत. दरम्यान आता भीषण हिंसाचाराच्या संबंधीच्या धक्कादायक कहाण्या आता समोर येत आहेत. हिंसाचाराच्या सुरुवातीपासून सलग ४ दिवसांपर्यंत पोलिसांना पीडितांचे तब्बल … Read more

काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्ली हिंसाग्रस्त भागांचा दौरा करणार; सोनिया गांधींकडे सादर करणार अहवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील हिंसाचाराबद्दल माहिती गोळा करण्यासाठी व अहवाल देण्यासाठी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक टीम तयार केली आहे. या पाच सदस्यीय प्रतिनिधीमंडळाला ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त भागाचा दौरा करून सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सोनिया यांनी मुकुल वासनिक, शक्तीसिंग गोहिल, कुमारी सेलजा, तारिक … Read more

दिल्ली दंगलीनंतर लालूंचा ‘तो’ व्हिडियो व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे भारतीय नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या वादाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न सुरु असताना अशीच वेळ ज्यावेळी लालकृष्ण अडवणींच्या रथयात्रेवेळी आली होती, त्यावेळी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले लालू प्रसाद यादव यांनी काय केलं होतं याचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. पाहुयात नक्की काय आहे या … Read more

दिल्ली हिंसाचार: शिवसेनेने भाजप सरकारला ‘या ७’ मुद्द्यांवर सामनातून धरलं धारेवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात दिल्ली हिंसाचारावर भाष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेने आपल्या अग्रलेखात ७ मुद्द्यांवर केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. सामानाच्या अग्रलेखातून सरकारच्या शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. सामनाच्या अग्रलेखातील ७ महत्वाचे मुद्दे १)दिल्ली जळत असताना गृहमंत्री कोठे होते? हिंसाचाराच्या वेळी निम्मे मंत्रिमंडळ अहमदाबादमध्ये होते. … Read more