7 लाख 78 हजार कुटुंबांना मिळणार आनंदाचा शिधा; सप्टेंबरमध्ये होणार वाटप

anandacha shidha

नाशिक जिल्हा |  राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंद शिधा वाटण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल 7 लाख ७८ हजार लाभार्थ्यांना आनंद शिध्याचा लाभ होणार आहे. येत्या, नागरिकांना १ ते ३० सप्टेंबर या काळात आनंद शिधा वाटण्यात येईल. या शिध्यामध्ये गोरगरिबांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, … Read more

कराड शहरात दिवाळीत पाणी पुरवठा वेळेत बदल

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात दिवाळी सणानिमित्त तीन दिवस पाणी पुरवठा वेळेत बदल करण्यात येणार आहे. सोमवार दि. 24 ते बुधवार दि. 26 पर्यंत सकाळच्या पाणी पुरवठा वेळेत बदल केला असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली आहे. कराड शहरात सोमवारपासून पाणी टाकी व पाणी वेळ पुढील प्रमाणे ः- सोमवार पेठ पाण्याची टाकी … Read more

Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त

Dhanteras 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dhanteras 2022 : सध्या देशभरात सणासुदीचे वातावरण आहे. नुकताच दसरा झाल्यामुळे आता दिवाळीच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकांकडून या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. विशेषतः सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी लोकं या सणाची वाट पाहत असतात. बहुतेक लोकं मौल्यवान दागिन्यांसह इतर गोष्टींची खरेदी या काळातच … Read more

Bhau Beej : ‘या’ दिवशी पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे हिंदू धर्मग्रंथात सांगितले आहे

#HappyDiwali : भाऊ बीज (Bhau Beej) हिंदूंच्या दिवाळी सणातील एक महत्त्वाच दिवस आहे. भाऊ-बहीण यांच्या नात्याचा सोहळा या दिवशी साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीया किंवा यमद्वितीया या दिवशी हा सण साजरा करतात. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर (बीज) दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग … Read more

यंदाच्या दिवाळीत बनवा मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू

दिवाळी म्हटलं कि फराळ आलं. चकल्या, चिवडा, शंकरपाळी असं बरच काही. मात्र जर या फराळात काही पौष्टिक पदार्थांची भर घातली तर. आज आपण असाच एक पौष्टिक पदार्थ बघणार आहोत तो म्हणचे मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू. लाडू हा पदार्थ तसा लहान मुलांना चटकन आवडणारा आणि घरातील वृद्ध व्यक्तींना सहज खाता येणारा. त्याला जर पौष्टिकतेचे जोड दिली तर आरोग्याच्या दृष्टिने हा एक उत्तम दिवाळी फराळ होईल. चला तर जाणून घेऊया मुगाच्या पिठाचा पौष्टिक लाडू कसा तयार करतात ते..

माझ्यासाठी दिवाळी म्हणजे…!

लहानपणी दिवाळी हा फक्त उत्सव नव्हता, डोक्यावर घमेल्या मधे मती आणणे, किल्ले बनविणे, दिवाळीत नवीन कपडे घेणे, फटाके फोडणे, दीवाळी उत्सव नव्हता तर भावना होती. पहिला फटका फोडण्यासाठी सकाळी लवकर उठणे ही त्यावेळी स्पर्धा होती. आपल्या किल्ल्यावर लक्ष्य ठेवणे ते ही शेवटच्या दिवसापर्यंत आणी त्याचे रक्षण करणे ही माझ्यासाठी दिवाळी होती, मला दिवाळीच्या फराळात जास्त रस नव्हता. माझ्या बालेकिल्ल्यात तोफ, धबधबा, एरगन आदी मॉडेल्स वापरण्यासारख्या माझ्या आवडी भिन्न होत्या. मी माझे सर्व अभ्यास शाळेतच पूर्ण करायचो जेणेकरून मी किल्ला बांधण्यासाठी अधिक वेळ देऊ शकलो, किल्ले बनवताना मी संपूर्ण महिना अगोदर पासून तैयारी करायचो. किल्ल्यांकडे मला बरीच बक्षिसे मिळाली. हे माझे कौशल्य आता बालापासूनच्या तरुणाई पर्यंतचा प्रवासात गमावले आहे.

यंदा दिवाळी फराळात ट्राय करा कुरकुरीत ‘खजुऱ्या’

पश्चिम महाराष्ट्रात खजुऱ्या हा पदार्थ आवर्जून केला जायचा. दिवाळसोबत चाहूल लागते ती थंडीची. बाजरी उष्ण असल्यानं महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवाळीच्या फराळासाठी बाजरीचा उपयोग करण्यात येतो. खजुऱ्यासुद्धा बाजरीच्या पीठाच्या केल्या जातात.

प्रादेशिक वेगळेपण जपणारी ‘भारतीय’ दिवाळी

भारत हा विविधतेने नटलेला देश. प्रत्येक कोसावर येथील संस्कृती,परंपरा,चालीरीती यांत भिन्नता आढळते. त्यात सण उत्सव-साजरे करण्याबाबत विचार करायचा झाला तर त्यात बऱ्याच समान गोष्टीं सोबत वेगळेपण जाणवते. प्रत्येक प्रदेशात सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. दिवाळी हा त्यापैकीच एक सण जो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा होतो. विशेष म्हणजे तो साजरा करण्याच्या कालावधीत सुद्धा प्रदेशवार … Read more

आपण दिवाळी हा सण का साजरा करतो ?

आपल्या भारत वैविध्याने नटलेला देत. भारतात इतकी विविधता जरी असली तरी सगळीकडे या सणाचा एक समान दुवा सापडतो. तो म्हणजे-‘दिवा’,दीप. प्रत्येक राज्यात प्रत्येक प्रदेशात घरोघरी दिवे लावून,पणती लावून हा सण आजही साजरा केला जातो. ज्योती-ज्योतीने सारा आसमंत उजळून निघतो. मग दिवाळीत ‘दीपाचं’ महत्त्व काय? जेव्हा या देशात इलेक्ट्रिसिटी नव्हती, लाईट-ट्यूबलाईट नव्हते तेव्हा रात्रीचा अंधार दुर करण्याचं काम हे दिवेच करत होते. वेदांमध्ये म्हटलं आहे ‘तमसो मा ज्योतीर्गमय’-अंधाराकडून प्रकाशाकडे जावे. अंधाराकडून प्रकाशाकडे, तिमिरातून तेजाकडे जा हा दिवाळीचा खरा संदेश आहे.तात्पुरता का होईना हे दिवे घरातला अंधार दुर करतात. आजूबाजूला प्रकाश पसरवतात. अशा दिव्याच्या रांगांच्या रांगा लावून अमावस्येच्या रात्री सारा अंधारच नाहीसा व्हावा ही दिवाळीमागची खरी संकल्पना.

दिवाळी म्हणजे नक्की काय रे भाऊ?

दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ “रोशनाईचा सण’ किंवा “दिपोत्सव” असा आहे. संस्कृतमध्ये दिवाळी शब्दास “दिपावली” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ “दिव्यांची रांग” असा केला जातो. भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीती प्रमाणे यास साजरा करतात त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. पाच दिवस चालणारा हा उत्सव फारच मनोरंजक असतो. लोक एक दोन आठवड्या आधीच दिवाळीची तयार सुरु करून देतात त्यामध्ये त्यामध्ये घराची साफसफाई आणि रंगरंगोटी चा समावेश होतो. कपडे आणि जरुरी वस्तू एक-दोन आठवड्या पूर्वीच खरेदी केले जातात. घरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते. आकाश कंदील घरासमोर लावल्या जातो. सुंदर रांगोळी काढल्या जाते. विविध रंगांनी ती सजवली जाते.