दिवाळीत ई-शॉपिंगला ग्राहकांची पसंती; इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी जास्त

औरंगाबाद – दिवाळीनिमित्त ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. त्यामुळे ई-शॉपिंगला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. 50 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर विशेष सूट मिळत आहे; तसेच अवघ्या तीन ते चार दिवसांत वस्तू घरपोच मिळत असल्याने यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेक नामांकित कंपन्यांचे कपडे, दागिने, भेटवस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, … Read more

अभिमानास्पद ! सिल्लोडच्या सुपुत्राची पंतप्रधानांसोबत दिवाळी

modi

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 04 नोव्हेंबर रोजी गुरुवारी जम्मू काश्मीरच्या सीमेवर जाऊन तेथील भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमाला औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील लोणवाडीचे सुपुत्र आर्मी सैनिक योगेश सुलताने यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सिल्लोडच्या सैनिकाला मिठाई खाऊ घालत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण औरंगाबादमध्ये … Read more

तीन हजार कोटींच्या उलाढालाने दिवाळी साजरी

Diwali

औरंगाबाद – गेल्या दिड ते पावणेदोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या चैनीच्या वस्तू खरेदी करता आल्या नव्हत्या. मात्र यावर्षी नागरिकांनी दणक्यात खरेदी करून दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला. गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत बाजारात मिठाई, फटाके, नवीन कपडे, घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टीव्ही, वॉशिंग मशीन यासारख्या असंख्य वस्तूंची शहरवासीयांनी मनसोक्त खरेदी … Read more

यंदाच्या दिवाळीत मोडला 10 वर्षांचा विक्रम, झाली 1.25 लाख कोटींच्या मालाची विक्री

Diwali

नवी दिल्ली । यंदा बाजारात दिवाळीची प्रचंड खरेदी झाली. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी समुदायाच्या संघटनेच्या म्हणण्यानुसार, यावर्षीच्या व्यवसायाच्या आकडेवारीने दिवाळीच्या दिवशी गेल्या 10 वर्षातील विक्रीचा विक्रम मोडला आणि सणासुदीच्या व्यवसायाने 1.25 लाख कोटी रुपयांची पातळी गाठली. व्यापारी संघटना CAIT ने सांगितले की,”या दिवाळी विक्रीमुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली आर्थिक मंदी … Read more

दिवाळीनिमित्त PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, कर्जावरील व्याजदर 6.50% पर्यंत कमी

Punjab National Bank

नवी दिल्ली । तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेचे म्हणजेच PNB चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर, PNB ने बुधवारी कर्जावरील व्याज 0.05 टक्क्यांनी कमी करून 6.50 टक्के केले. PNB ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की,” 8 नोव्हेंबरपासून रेपो अर्थात RLLR (Repo Linked Lending Rate) शी जोडलेले व्याजदर … Read more

आजपासून पुढील 5 दिवस अनेक शहरांमध्ये बँका राहणार बंद, बँकेत जाण्यापूर्वी संपूर्ण लिस्ट तपासा

Bank Holiday

नवी दिल्ली । आजपासून पुढील 5 दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या लिस्टनुसार या सुट्ट्या जारी केल्या जातात. त्यामुळे तुमचे बँकेचे कोणतेही काम असेल तर ते पुढील आठवड्यासाठी पुढे ढकलावे लागेल. RBI ने जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार, असे काही दिवस आहेत जेव्हा काही विशिष्ट भागात सण किंवा वर्धापन दिनानिमित्त … Read more

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर 30 किलो सोन्याची खरेदी

औरंगाबाद – धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर औरंगाबादेत तब्बल 30 किलो सोने खरेदी करून दिवाळी पर्वास उत्साहात प्रारंभ केला आहे. बऱ्याच दिवसानंतर ज्वेलर्सच्या लहान-मोठ्या शोरूम मध्ये मंगळवारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली तर अनेक मोठ्या शोरूममध्ये तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. दिवाळीला नुकतीच सुरुवात झाली आणि शहर रोषणाईत न्हाऊन गेले. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीला खरेदी शुभ मानली … Read more

खुशखबर ! दिवाळीपूर्वी खाद्यतेल झाले स्वस्त, प्रमुख कंपन्यांकडून दरात कपात

edible oil

नवी दिल्ली । सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दिवाळी आणि छठपूजेपूर्वी खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अदानी विल्मर आणि रुची सोया इंडस्ट्रीजसह प्रमुख खाद्य तेल कंपन्यांनी घाऊक दरात 4-7 टक्क्यांनी कपात केली आहे. इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) ने मंगळवारी सांगितले की,”इतर कंपन्यांकडूनही अशीच पावले उचलण्याची अपेक्षा आहे.” SEA … Read more

येत्या दिवाळीत सोने नव्हे तर क्रिप्टोकरन्सीद्वारे पडेल पैशांचा पाऊस ! आपण कुठे आणि कशी कमाई कराल हे जाणून घ्या

Cryptocurrency

नवी दिल्ली । गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने ही गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंतीची मालमत्ता आहे. यानंतर गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास प्राधान्य देत आहेत. गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली असली, तरी सोमवारी बाजार सावरताना दिसून आले. त्याच वेळी, आजकाल गुंतवणूकदारांमध्ये क्रिप्टोकरन्सीबद्दल बरीच चर्चा होते आहे. अशा परिस्थितीत क्रिप्टोकरन्सी हा एक चांगला पर्याय ठरेल का आणि सोन्याशी स्पर्धा करू … Read more

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या जादा बसेस सुसाट

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सोमवारपासून दिवाळीनिमित्त विविध मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. यानुसार औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून पुणे मार्गावर 22 तर नागपूर मार्गावर चार जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. सर्व बसेसना प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दिवाळीनिमित्त मूळ गावी जाणाऱ्या कुटुंबीयांची संख्या मोठी असते. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी … Read more