लडाखच्या कारगिलमध्ये जाणवले भूंकपाचे धक्के; जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशाही हादरले

लेह । लडाखच्या कारगिलमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. ४.५ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. कारगिल येथे दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याचे केंद्र कारगिलच्या वायव्येस ११ किलोमीटर अंतरावर आहे. लडाखमध्ये भूकंपाच्या तीव्र धक्का जाणवल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी अडीच वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी … Read more

मुंबई परिसरात भूकंपाचे धक्के; उत्तरेला होते केंद्रबिंदू

मुंबई । राजधानी दिल्ली पाठोपाठ मागील आठवड्यात गुजरामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता मुंबईला भूकंपाचे हादरे बसले आहेत. मुंबईजवळच्या परिसरात उत्तरेला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर स्केल इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केद्रानं ही माहिती दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिलेल्या … Read more

गुजरातमधील राजकोट शहराला सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

अहमदाबाद । दिल्ली पाठोपाठ रविवारी गुजरातमधील राजकोट शहर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी झालेल्या या भूकंपानंतर आज पुन्हा एकदा गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी हे धक्के जाणवले असून रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.४ इतकी होती. या भूकंपाचं केंद्र राजकोटपासून ८३ किलोमीटर वायव्येकडे असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून देण्यात … Read more

पृथ्वीच्या भुगर्भातील ‘हा’ आकार पाहून शास्त्रज्ञही झाले आश्चर्यचकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पृथ्वीच्या गाभ्याभोवती फिरणारे तप्त आणि दाट असे द्रवाचे गोळे अधिक व्यापक असल्याचे मागे एकदा संशोधनात समोर आले होते. आता भूंकपाचे विश्लेषण करणाच्या एका नव्या पद्धतीत पूर्वी सापडलेल्या खंडीय आकाराच्या भागापेक्षा देखील वेगळे असे काही पृथ्वीचा गाभा आणि आवरण यांच्या सीमेवर सापडले आहे. तो कदाचित मॅग्मा, वितळलेले लोखंड किंवा आणखी काहीतरी असू शकते. … Read more

भूकंपादरम्यानही टीव्ही चॅनलला मुलाखत देत राहिल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान,पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी सकाळी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न एका दूरचित्रवाहिनीला लाईव्ह इंटरव्यू देत होत्या. हा इंटरव्यू सुरु असताना तिथे अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागले. मात्र , तरीही त्यांनी आपला इंटरव्यू पुढे सुरूच ठेवला. राजधानी वेलिंग्टनमधील संसद कॉम्प्लेक्समध्ये काय चालले आहे याची माहिती देण्यासाठी आर्डर्न यांनी मुलाखतकार रायन ब्रिजला अडवले. आर्डर्न म्हणाल्या, “रायन येथे … Read more

कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के; परिसरात भीतीचे वातावरण

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात बुधवारी २.७ रिश्टर स्केल क्षमतेचा भुकंपाचा धक्का बसला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्कयाची तीव्रता २.७ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर पुढे … Read more

कोयनेच्या विनाशकारी भूकंपाला आज ५२ वर्षे पूर्ण

कोयना धरण आणि भूकंप याचा नैसर्गिक अथवा तांत्रिक संबंध नसला तरी या विभागात सातत्याने होणार्‍या भूकंपामुळे हा तालुका भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. या ठिकाणी वारंवार भूकंपाची मालिका सुरु असते. मात्र एका भूकंपाने तेथील जनतेचे आयुष्य बदलून टाकले होते. त्याच विनाशकारी भूकंपाला आज ५२ वर्षे पूर्ण झाली. ११ डिसेंबर १९६७ ला कोयनेला तब्बल ६.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला होता.

डहाणू, तलासरीत पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत

पालघर प्रतिनिधी । डहाणू व तलासरी तालुक्यातील गावे भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी पुन्हा एकदा हादरली. तलासरी, डहाणू परिसरांत भूकंपाचे सत्र सुरूच असून रात्री  4 वाजून 31 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. आणि पुन्हा एकदा परिसरातील गाव तीव्र धक्क्यांनी हादरली. मात्र यावर उपाययोजना करण्याबाबत शासन यंत्रणेची उदासीनता पाहता गावातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डहाणू, तलासरी तालुक्यांतील अनेक … Read more

कोयना परिसरात भूकंपाचे धक्के

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण परिसर मंगळवारी रात्री भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. या परिसरात आज (मंगळवार) रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. कोयना धरण परिसरात झालेल्या या भूकंपाच्या केंद्रबिंदू कोयनानगर पासू 12.8 किलोमीटर वर होता. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. … Read more

सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

सातारा जिल्ह्यात सकाळीच भूंकपाचा धक्का बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. कोयनापासून 10 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती असून या घटनेमुळे कोयणावासीय हादरून गेले आहेत. भूकंपाची  तीव्रता 4.8 रिश्टर स्केल एवढी नोंदण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोयणा परिसरात वारंवार भूकंपाच्या घटना घडतात. जिल्ह्यातील या भूकंपाची तीव्रता मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने कमी सेकंदाचा भूंकप … Read more