जिल्हा परिषद शाळेची मुले खूपच हुशार…साताऱ्यातील ‘या’ शाळेतील मुले बोलतायत चक्क जपानी भाषा

Students School News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो पिल्याशिवाय कोणीही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी म्हण आहे. ही म्हण सातारा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्याबाबतीत तंतोतंत लागू होते. कारण सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुले सध्या जपानी भाषा बोलत आहेत. विजयनगर शाळेतील शिक्षक बालाजी जाधव यांनी एक प्रयोग केला असून … Read more

जीवनात आलेल्या अपयशानंतर सुद्धा जोमाने उभे राहणे यालाच यश म्हणतात : शिव खेरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जीवनात अनेक वेळा अपयशानंतर ही पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे यालाच यशस्वी होणे असे म्हणू शकतो.जिंकणे आणि हरणे या दोन्ही गोष्टींनी मिळून जीवन बनते. आजच्या मुलांना जिंकण्याबरोबरच हरणे सुद्धा किती महत्वाचे हे समजावून सांगणे काळाची गरजचे आहे,असे विचार प्रसिद्ध लेखक व प्रेरक वक्ता शिव खेरा यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना व्यक्त केले. … Read more

सातारा जिल्ह्यात तब्बल ‘इतक्या’ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची बदली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कामी केले जाते. सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 6 सवर्गामधील तब्बल 1 हजार 288 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यापासून जिल्हांतर्गत व जिल्ह्याबाहेरील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु आहे. … Read more

25 वर्षांनी त्यांना मिळालं हक्काचं व्यासपीठ; कराडच्या ‘या’ महाविद्यालयाने घेतला महत्वाचा निर्णय

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कधी एसटी बसने तर कधी सायकलवरून महाविद्यालयात येत शिक्षण घेतलेले मित्र-मैत्रीण तब्बल 25 वर्षांनी एकत्रित आले. आणि त्यांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळाले. कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात नुकताच 1996-97 च्या मराठी माध्यमाच्या विभागातीळ माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. यावेळी आपल्या विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकही भारावून गेले. या मेळाव्यात महाविद्यालयात माजी … Read more

पुणे शहरात ED ची मोठी कारवाई; शिक्षण क्षेत्रात खळबळ

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) ठिकठिकाणी कारवाईचे सत्र राबविले जात आहे. दरम्यान ईडीने आज पुण्यात बँकेच्या फसवणूक प्रकरणात नामांकीत शाळेच्या संचालकांवर कारवाई झाली असून 20 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे धाबे दाणाणले आहे. पुण्यात रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची … Read more

पत्रकारितेचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण हे डिजीटल पत्रकारितेमुळे झाले – प्रा. स्नेहल वरेकर

हॅलो महाराष्ट्र । जत प्रतिनिधी पत्रकारितेचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण हे डिजिटल पत्रकारितेमुळे झाले. डिजिटल पत्रकारिता ही आजच्या युगाचे एक प्रभावी माध्यम आहे. डिजिटल पत्रकारितेने नागरिक पत्रकारितेला बळ दिले. या पत्रकारितेमुळे प्रत्येक व्यक्ती हा एक जागरूक भारतीय नागरिक बनून समाजामध्ये विधायक बदल घडवू शकतो, असे प्रतिपादन प्राध्यापिका स्नेहल वरेकर यांनी केले. “डिजिटल पत्रकारितेचे स्वरूप, प्रक्रिया व … Read more

‘रयत’मध्ये जूनपासून सुरु होणार ‘ऑक्‍सफर्ड’चा अभ्यासक्रम : शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होतील. ऑक्सफर्ड हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ असून तेथे प्रशिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेतील काही निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत. लवकरच हा कोर्स रयत शिक्षण संस्थेत सुरु करणार आहोत. त्यामुळे येत्या जूनपासून रयतच्या सातारा, … Read more

आजपासून 12 वीच्या परीक्षेला प्रारंभ; कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी बोर्ड सज्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून बोर्डसह इतर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही परीक्षा आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला पात्र आहे. त्यासाठी 3 हजार 195 केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

इंग्रजी माध्यमाच्या शालेय वेळापत्रकात तात्काळ बदल करा !

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहे. परंतु हेच इंग्रजी माध्यम लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संस्थेची चौकशी करून वेळापत्रकमध्ये बदल करून थोड्या उशिरा घेण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण … Read more

10 वी आणि 12 वी परीक्षेबाबत मोठा निर्णय ! ‘या’ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणार नो एन्ट्री

SSC Exam HSC Board Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहावी-बारावीची परीक्षा जवळ आल्याने शिक्षण विभागाकडून यंदा परीक्षेच्या नियमात बदल करण्यात आलेले आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात म्हणून बोर्डाने प्रश्नपत्रिका 10 मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक … Read more