“राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याआधी तुम्हाला काय पाहिजे असं विचारण्यात आलं होतं, तेव्हा मी..”, खडसेंचा मोठा खुलासा

जळगाव । “मला आता राजकारणात काही अपेक्षा नाही. मात्र उरलेली कामं पूर्ण करायचे आहे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला आहे. “मला राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याआधी विचारण्यात आलं होतं. तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळी तुम्ही मला देऊही शकणार नाही. कारण मी आतापर्यंत इतकं काही घेतलं आहे. जवळपास 15 ते 16 मंत्रिपदाचे खाते, विरोधी … Read more

कन्येनंतर एकनाथ खडसेंनाही झाली कोरोनाची लागण; उपचारासाठी मुंबईकडे रवाना

Eknath Khadse

जळगाव । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहनही खडसे यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची … Read more

नाथाभाऊ भाजप संपवणार? तर सून खा. रक्षा खडसे ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार

जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राज्यात भाजपला सुरुंग लावण्याची वल्गना केलीय. तर दुसरीकडे त्यांच्या सुनबाई आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणास्तव रक्षा खडसे यांनी येत्या ९ तारखेला आंदोलनाची हाक दिली आहे. जळगाव जिल्हाधिकारी … Read more

एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर भाजपनं आयोजित केलेल्या बैठकीला रक्षा खडसेंची दांडी; चर्चेला उधाण

जळगाव। एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर आयोजित करण्यात आलेल्या जळगावातील भाजप बैठकीला खासदार रक्षा खडसे अनुपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर डॅमेज कंट्रोलची चाचपणी करण्यासाठी जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची ही बैठक होत असल्याची माहिती आहे. भाजपच्या या तातडीच्या बैठकीला माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. बैठकीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पक्षसंघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी … Read more

खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू – पृथ्वीराज चव्हाण

कराड । खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू, असा विश्वास कराड येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यावर रोष दाखवला. त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झाला, असा त्यांनी आरोप केला. त्यांनी पक्षांतर केले आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, … Read more

‘खडसेंवर झालेल्या अन्यायाला पवार साहेब न्याय देतील’- धनंजय मुंडे

बीड । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया … Read more

‘डोन्ट वरी! त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’; राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा

मुंबई । राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. ४० वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी याबाबत वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली, मात्र आजवर प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, … Read more

‘खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर मजा येईल’, शिवसेना नेत्याचे सुचक वक्तव्य

जळगाव । एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर ”खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल,” अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. गुलाबराव पाटील हे आज दुपारी जळगावात होते. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात … Read more

अखेर एकनाथ खडसेंनी बांधलं हातावर घड्याळ, ६८ जणांसह केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई । गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या … Read more

‘येत्या काळात उत्तर महाराष्ट्रात एकाही ठिकाणी भाजपा आमदार, खासदार दिसणार नाही’- अनिल पाटील

जळगाव । एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या येण्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत आहेत. ‘एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्याने आम्हाला बळ मिळेल. आम्ही भाजपमधून येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देवू’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे. ‘येत्या काळात उत्तर महाराष्ट्रात एकाही ठिकाणी भाजपा आमदार, खासदार दिसणार नाही’ असं … Read more