Gadchiroli Railway : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे थांबणार कोरबा एक्सप्रेस

Gadchiroli express

Gadchiroli Railway : संपूर्ण भारतामध्ये रेल्वेचे जाळे पसरलेले आहेत. कमी पैशांमध्ये सुलभ सेवा देणारी ही रेल्वे केवळ एका मार्गावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत नाही तर अनेकांना रोजगार देखील देते. कोरोना काळामध्ये रेल्वेच्या प्रवासावर मोठा फरक पडला होता काही मार्गावरील ट्रेन या बंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकीच एक गडचिरोली जिल्ह्यातील ट्रेन आहे. गडचिरोली जिल्ह्यामधील (Gadchiroli Railway) देसाईगंज … Read more

Gadchiroli News : सुरजागड इलाकाच्या दुर्गम तोडगट्टा गावात डॉ आंबेडकर जयंती ‘अशी’ झाली साजरी

एटापल्ली प्रतिनिधी । मनोहर बोरकर तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी बहुल व नक्षल प्रभावी सुरजागड इलाका पट्टीतील छत्तीसगड राज्य सीमेवरील तोडगट्टा गावात पहिल्यांदाच लोकशाहीचे जनक भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी जगातील अतिमागास समाजाच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या माडिया जमती समाजाकडून जयभीमचा गजर करून लोकशाहीचा जागर करण्यात आला. सुरजागड इलाका … Read more

सुरजागडसह विविध लोहखनिज खाणी विरोधी आंदोलनाची धग 3 आठवड्यांपासून कायम!

एटापल्ली प्रतिनिधी । मनोहर बोरकर एटापल्ली तालुक्यातील सुरजागडसह दमकोंडावाही, बेसेवाडा, वाळवी, मोहंदी, गुडजुर, नागलमेटा, व पुस्के अशा पहाडीवरून लोहखनिज उत्खनन केले जात आहे. उत्खननास तीव्र विरोध दर्शवून, मूलभूत सोयीसुविधाच्या मागणीसाठी स्थानिक आदिवासींनी गेल्या तीन आठवड्यांपासून ठिय्या आंदोलन पुकारलेले आहे. सदरच्या आंदोलनाच्या समर्थनात गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीगड राज्याच्या आदिवासी व पारंपरिक निवासी भागातील नागरिक हिरीहीरीने सहभाग नोंदवत … Read more

मुख्यमंत्री शिंदेंचं गुजरात प्रेम; गडचिरोलीतील 3 हत्तींना मध्यरात्री गुजरातला पाठवलं

gadchiroli elephants

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऐन गणेशोत्सव काळातच गडचिरोली जिल्ह्यातील पातानाल येथील तीन हत्तींना गुजरातला हलवण्यात आले आहे. जामनगर मधील अंबानी यांच्या कंपनीकडे देखभाल करण्यासाठी या हत्तींना नेण्यात आले. हिंदू धर्मात गणराजाला देव मानतात, त्यातच गणेशोत्सव काळातच अशा प्रकारे हत्तींना गुजरातला पाठवण्यात आल्याने या भागातील नागरिकांसह पर्यावरण प्रेमींनीही संताप व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून येथील हत्ती … Read more

कार- ट्रॅक्टरच्या अपघातात भाजप नेत्याचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गडचिरोली जिल्ह्यात कार आणि ट्रॅक्टर मध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये भाजपाचे जिल्हा सचिव तथा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की यात ट्रॅक्टरचे 2 तुकडे झाले. अतुल गण्यारपवार व आनंद गण्यारपवार हे चामोर्शी … Read more

सुरजागड खणीत विस्फोटासाठी जिल्ह्याभरातील आदिवासींचा आक्षेप

गडचिरोली | लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांनी १८/०८/२०२१ रोजी सुरजागड लोह अहस्क खाणीत विस्फोटा करिता जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे नाहरकत प्रमाणात करिता अर्ज केला पंरतु याच्या विरोधात स्थानिक आदिवासींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे १८ सप्टेंबर २०२१ रोजी आक्षेप नोंदवला आहे. पेसा कायदा १९९६ चे उल्लंघन करत बळजबरीने या उत्खनन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे आणि त्यासाठी मोठे … Read more

चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा गडचिरोलीतील 500 गावांनी केला निषेध, गडचिरोलीतील व्यसनाधीनतेचेही वाढणार प्रमाण

गडचिरोली | महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयाचा गडचिरोली जिल्ह्यातील ५०० गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूरची दारू सुरु झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातीलही व्यसनाधीनतेच्या प्रमाणात वाढ होणार असल्याची भीती या गावांनी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध असून दारू विक्रेत्याच्या फायद्याचा आहे. मागच्या २७ … Read more

चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय गडचिरोलीतील जनतेच्या हिताविरुद्ध, 250 गावांनी केला निषेध

गडचिरोली |  महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. हा निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध असून दारू विक्रेत्यांच्या फायद्याचा आहे, असे मत व्यक्त करीत, गडचिरोली जिल्ह्यातील गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. दारूमुळे अन्याय झालेल्या लक्षवधी महिलांची व्यथा तत्कालीन सरकारने लक्षात घेऊन २०१५ मध्ये चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू केली. मात्र यावर पाणी … Read more

भामरागड : गरोदर महिलांच्या आरोग्य सुविधेच्या प्रश्नांबाबत राज्य मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल

गडचिरोली | भामरागड तालुक्यातील तुरेमर्का गावातील रोशनी पोदाळी या महिलेला प्रसूतीसाठी २३ किलोमीटर घनदाट जंगलातून डोंगर- नदी- नाले पार करत जावे लागले. तसेच बाळंतपण झाल्यानंतर पाच दिवसाच्या बाळासह त्याच मार्गे परत चालत गावी जावे लागले ही घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. तसेच वेळेवर आरोग्यसुविधा आभावी भामरागड तालुक्यातील गुंडेनूर येथील गरोदर महिला जया रवी पोदाडी … Read more

‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा एक हजार पार’-ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

गडचिरोली | जिल्ह्यात अनेक आंदोलनानंतर १९९३ मध्ये दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. सलग २७ वर्ष टिकून असलेल्या दारूबंदीला धक्का लागण्याची शक्यता बळावली असता जिल्ह्यातील १ हजार २ गावे दारूबंदीच्या समर्थनात उभी आहेत. या ऐतिहासिक दारूबंदीची अंमलबजावनी करा, असे पत्र देखील या गावांनी शासनाला लिहिले आहे. सद्या जिल्हा दारूमुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more