कारभारीण लै भारी! निवडणूक जिकंलेल्या पतीला खांद्यावर उचलत पत्नीकडून विजय साजरा

पुणे । ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयाची मिरवणूक आणि जल्लोषाचा गुलाल उधळायला सर्वचजण सज्ज होते. मात्र, कोरोनामुळे मिरवणुकीला बंदी घालण्यात आली होती. पण पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीतील एका उमेदवाराच्या विजयाची अनोखी मिरवणूक लक्षवेधी ठरली. कारण, येथे कार्यकर्त्यांऐवजी चक्क पत्नीनेच आपल्या विजयी उमेदवार पतीला चक्क खांद्यावर उचलून घेतले होते. गावातील जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी … Read more

वंचितने दिला ‘फॉरेन रिटर्न’ उच्चशिक्षित महिला उमेदवार; मतदारांनी दिले पॅनलला भरघोस मतदान

हिंगोली । हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवाणी ह्या गावात वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलद्वारे ९ उमेदवारांचे सर्वसमावेशक पॅनल उभे करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे या स्वीडनमधून पॉलिटिकल सायन्समधील पीएचडी प्राप्त उमेदवार होत्या. मतदारांनी प्रस्थापित पक्षांचे उमेदवार डावलून डॉ. चित्रा यांच्यासह त्यांच्या पॅनलला भरघोस मतदान केले असून ८ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. … Read more

राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा

यवतमाळ | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. ग्रामिण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचे जाळे आहे. मात्र मनसे पक्षाचा त्यामानाने इतका विस्तार झालेला नाही. अशात राज्यातील तीन ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. https://t.co/kOE0dJICVn?amp=1 यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत मनसेचे ०७ पैकी ०६ उमेदवार विजयी … Read more

सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्यांची आता खैर नाही! निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ कडक आदेश

मुंबई । राज्यात काही ठिकाणी होत असलेल्या सरपंचपदाच्या लिलावाबाबतच्या तक्रारींची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगानं घेतली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगानं कडक पाऊल उचललं आहे. त्यानुसार सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली … Read more

लज्जास्पद! बीडमध्ये बलात्कार पीडितेलाचं गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेचा ठराव

rape

बीड । बीडमध्ये (Beed) एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील (Georai) पाचेगावमध्ये अजब प्रकार घडला आहे. बलात्कार पीडितेला (Rape Victim) गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेत (Gram Panchayat) चक्क ठराव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठरावावर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तबही केले आहे. यापेक्षाही आणणारी बाब म्हणजे, गावकऱ्यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडेही या महिलेला … Read more