राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे-भाजप सरकारची जादू चालणार का?

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ग्रामपंचायत निवडणुकीमुळे अगदी स्थानिक गाव पातळीवर राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 80.14 टक्के मतदान झाले असून आता प्रत्यक्ष मतमोजणीस थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात शिंदे-भाजप सरकारची जादू चालणार का? हे निकालानंतर … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही; संजय शिरसाठांचा नितेश राणेंना सल्ला

Nitesh Rane Sanjay Pawar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना सल्लासुद्धा दिला आहे. संजय शिरसाठ म्हणाले नितेश राणे आता मोठे नेते होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक राजकारण असतं. तिथं धमकी देणं योग्य नाही. आपण लोकांना जिंकायचं असतं. आपण लोकांना आपलसं … Read more

काय मग गोगावले कसं वाटतंय आता?

bharat gogavale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विविध ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यामध्ये शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले आमदार भरत गोगावले यांच्या गावची काळीज खरवली ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार चैतन्य महामुणकर हे सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. गोगावले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पराभवांनंतर काँग्रेसने त्यांना टोला लगावला … Read more

ग्रामपंचायत निकाल : भाजप- शिंदे गटाची सरशी; ‘मविआ’ ला मोठा झटका

mahapolitics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. त्यातील ६१ ग्रामपंचायतींवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर ५४७ ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यातील आत्तापर्यन्त ३५२ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाला सर्वाधिक विजय मिळाल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निकालात भाजप १०४ , … Read more

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या 185 जागांसाठी पोटनिवडणूक

औरंगाबाद – जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतीमधील 185 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी 21 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सदस्यांचे आकस्मिक निधन, राजीनामा, अपात्र ठरल्याने रद्द झालेले सदस्यत्व आणि अन्य कारण रिक्त झालेल्या सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील पोटनिवडणूक होत असलेल्या 128 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात निवडणुक आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी … Read more

मी दारुही पाजली नाही अन् पैसेही वाटले नाहीत पण मी निवडून आले; 22 वर्षांच्या संध्याला ग्रामस्थांनी का मतदान केले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नायगाव जामखेड मधून निवडून आलेली २२ वर्षीय तरुणी संध्या सोनावणे राजकारणात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक उदाहरण बनली आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांशिवाय ती तब्बल १२३ मतांनी निवडून आली आहे. मी दारुही वाटली नाही अन् मी पैसेही वाटले नाहीत पण मी निवडून आले असं सोनवणे यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. तिच्या या यशाच्या निमित्ताने हॅलो महाराष्ट्रने तिच्याशी संवाद … Read more

21 वर्षांचा ऋतुराज देशमुख ठरला सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य; स्वत:चं पॅनल उभं करुन जिंकून दाखवलं

सोलापूर |  गावाचं राजकारण म्हटलं तर शहाणी माणसं त्यापासून स्वत:ला चार हात दूर ठेवणंच पसंत करतात. चारचौघांत सरकारवर टीका करत असताना स्वत: मात्र मतदान करण्यातही त्यांचा उत्साह अनेकदा नसतो. अशा एका तरुणानं गावच्या राजकारणात उडी घेत स्वत:चं पॅनल उभं करुन ते निवडून देखील आणण्याचा विक्रम केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोल तालुक्यातील घाटणे या गावात ऋतुराज … Read more

आ. शशिकांत शिंदे गटाला मोठा धक्का ; कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या 5 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

सातारा | सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल हाती येत असून राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना कोरेगाव तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे. कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या 5 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. कोरेगाव तालुक्यातील मंगळापूर,किन्हई पेठ, कटापूर,ल्हासुर्णे आणि देऊर या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. गतवर्षी शशिकांत शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. आणि … Read more

ग्रामपंचायत निवडणूक | काले गावात पुन्हा एकदा भीमराव दादांचा करिष्मा ; तब्बल 14-3 ने ग्रामपंचायत ताब्यात

कराड | कराड तालुक्यातील सर्वात महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या काले या गावात पुन्हा एकदा जेष्ठ नेते भीमराव दादा पाटील यांचे वर्चस्व दिसून आले. भीमराव दादा पाटील गटाच्या व्यंकनाथ ग्रामविकास पॅनल ने तब्बल 14 – 3 असा दणदणीत विजय मिळवून काल्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे. काले गावात विरोधकांना केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. … Read more