देशात रामराज्यचा दावा केला असताना हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली; उमा भारतींचा घरचा आहेर

नवी दिल्ली । हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे.  नुकतंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन केलं आहे. देशात रामराज्य आणण्याचा वचन दिलं आहे. मात्र हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर … Read more

सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन क्रूरतेवर उतरलंय ; व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी साधला निशाणा

rahul gandhi and yogi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने देशभर खळबळ उडाली आहे. देशभरात या घटनेचा निषेध केला जात आहे. तर विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच पीडितेच्या कुटुंबीयांवर प्रशासनाकडून इतरांना भेटण्यासाठी रोखलं जात असल्याचं वृत्त असून, याविषयी राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट करून निशाणा साधला आहे. UP … Read more

हाथरस प्रकरणी योगी सरकार बघ्याची भूमिका घेत आहे ; शरद पवारांचा आरोप

Sharad Pawar Pm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस येथील घटना दुर्दैवी असून पीडित तरुणीच्या मृतदेहाची उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर विल्हेवाट लावली. असा प्रकार देशात कधीच घडला नाही. उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटना घडल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असा होतो, असंही ते म्हणाले. उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदा हातात घेऊन केलेल्या कृत्याचा देशभरातून … Read more

‘त्यांना अशी शिक्षा करू कि…’ हाथरस प्रकरणावर योगी आदित्यनाथ यांनी अखेर सोडलं मौन

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. हाथरास प्रकरणात पीडितेच्या उपचाराबाबत हलगर्जीपणा आणि कारवाईत केलेली दिरंगाई यामुळं योगी सरकार टीकेचे धनी बनले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणामधील पीडित तरुणीच्या नातेवाईकांना तिच्यावर अंत्यसंस्कारही करुन … Read more

राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून FIR दाखल

नवी दिल्ली । हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना गुरुवारी यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले. मात्र त्याचवेळी राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 … Read more

हाथरस प्रकरणावरून राज ठाकरे संतापले ; केंद्र सरकारला केलं ‘हे’ आवाहन

Raj Thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेवरून देशभर निषेध केला जात आहे. अनेक राजकीय पक्षांनी यावरून उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हाथरसच्या घटनेवर निवेदन जारी केलं असून केंद्र सरकारलाही यात लक्ष घालण्याचं आणि उत्तर प्रदेशातील प्रशासनाला वठणीवर आणण्याचं आवाहन केलं आहे. ‘उत्तर प्रदेशातील … Read more

उत्तरप्रदेश पोलिसांची मनमानी, तृणमूल काँग्रेस खासदारांना धक्काबुक्की ; मिडियालाही गावात जाण्यास बंदी

TMC MP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाण्यास सर्वांनाच मज्जाव केला आहे. याठिकाणी नेते आणि मीडियाला सुद्धा तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यातच तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने शुक्रवारी पीडित कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी आम्ही पीडित कुटुंबीयांना भेटणारच यावर अडून राहिलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ … Read more

‘मी अन्यायासमोर झुकणार नाही, असत्यावर सत्यानं विजय मिळवेन’; गांधी जयंतीला राहुल गांधींचा निर्धार

नवी दिल्ली । हाथरस पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुरुवारी अटक करण्यात आल्यानंतर आज त्यांनी ‘अन्यायासमोर झुकणार नाही, असत्यावर सत्यानं विजय मिळवेन’ या शब्दांत गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती असून देशभरात साजरी केली जात आहे. अशा प्रसंगी राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही … Read more

आता हाथरस प्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांना यूपीला पाठवा ; शिवसेनेचे मागणी

shivsena and yogi adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. इतर राजकीय पक्षांनी या प्रकरणावरून योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील केला आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई व्हावी अस आवाहनही जनतेतून व्यक्त होत आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही या प्रकरणाचा तपास … Read more

योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस येथील बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे काही झालं ते पाहता उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याचं सिद्ध होत आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला … Read more