नाट्यमय हालचाली नंतर झाले महाक्षय आणि मदालसा शर्मा यांचे लग्न.

thumbnail 1531228654704

मुंबई : मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय याच्या मागे काही दिवसापूर्वी पोलिसांची ससेमिरी लागली होती. एका मुलीवर सतत बलात्कार करून तिला गर्भपात करण्यासाठी मजबूर करण्यात आल्याचा आरोप महाक्षय आणि त्याची आई योगिनी हिच्या वर ठेवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटक पूर्व जामीन फेटाळला होता. परंतू नंतर दिल्लीच्या रोहिणी सत्र न्यायालयाने त्यांना जमीन … Read more

समलिंगी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

thumbnail 15312232757161

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज समलिंगी प्रकरणावर सुनावणी सुरु झाली आहे.समलिंगी संबंधांना बेकायदेशीर ठरवणारे भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ रद्द करण्यात यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या गेलेल्या दोन खटल्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. याचिकाकर्त्याच्या वतीने आज बाजू मांडण्यात आली. अरविंद दातार यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली. तर सरकारच्या बाजूने तुषार मेहता यांनी … Read more

अजितदादांनी विधानसभा अध्यक्षांनाच धरले धारेवर

thumbnail 1531150762725

नागपूर : विधान भवन परिसरात साचलेल्या पाण्याची पहाणी करण्यासाठी गेलेल्या विधानसभा अध्यक्षांचा फोटो काल प्रचंड व्हायरल झाला. नेमका हाच मुद्दा पकडून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी अध्यक्षांना धारेवर धरले. अजितदादांनी चक्क अध्यक्षांनाच घेरल्याने सभागृहात हसावं की रडावं अशी स्थिती झाली होती. ‘ कोणीतरी आपला असा फोटो काढेल याचे भान ठेवून तुम्ही वागायला पाहिजे होते. तुमचा … Read more

आता सर्वोच्च न्यायालयाचे थेट प्रक्षेपण

thumbnail 1531143592175

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कसे चालते आणि कोर्ट नेमके करते काय असा प्रश्न नेहमीच सर्वसामान्य लोकांना पडत असतो. या प्रश्नांची उत्तरे आता मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज आता लाइव्ह होणार आहे. न्यायालयात चालणाऱ्या कामकाजाचे आता थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. न्या.चंद्रचूड यांनी एका खटल्याचा निकाल देताना “न्यायालय हे खुले आहे” असे मत व्यक्त केले … Read more

राहुल गांधीमुळे निर्भयाचा भाऊ झाला वैमानिक

thumbnail 1531112006248

दिल्ली : निर्भयावर १६ डिसेंबर २०१२ मध्ये क्रूरातीक्रूर पध्द्तीने बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. बलात्कार्यांनी तिला अर्धमेले करून रस्त्यावर फेकले असता उपचारादरम्यान तिचा २९ डिसेंबर २०१२ रोज मृत्यू झाला. या प्रकारानंतर निर्भयाचे कुटूंब अक्षरशः कोलमडून गेले होते. तेव्हा तिच्या कुटूंबातील सदस्यांना आधार देण्याचे महत्वाचे काम कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. २०१३ … Read more

झारखंडमधे नक्षली हल्ला, ६ जवान शहीद

thumbnail 1530038652435

रांची : नक्षली हिंसेमुळे नेहमी चर्चेत असणारे झारखंड पुन्हा एकदा नक्षल्यांच्या रडावर आले आहे. झारखंड मधील गढवा जिल्ह्यातील छिंजो भागात नक्षली हल्ला झाला आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या भुस्फोटामधे सशस्त्र दलाचे ६ जवान जागीच ठार आहेत तर ૪ जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी यावेळी बेछुट गोळीबार केल्याचेही बोलले जात आहे. जखमी जवानांना तातडीने रुग्नालयात दाखल करण्यात आले … Read more

पंतप्रधान नरेंन्द्र मोदींच्या सुरक्षेत वाढ

thumbnail 1530021438094

दिल्ली : पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या सुरक्षेमधे वाढ करण्यात आली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एस.पी.जी.) कडे पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. एस.पी.जी. च्या परवानगीशिवाय आता मत्र्यांनाही मोदींना भेटता येणार नसल्याचे बोलले जात आहे. २०१९ च्या निवडणुक प्रचारांत रोड शो एवजी जनसभा घेण्यावर भर देण्याचा सल्लाही एस.पी.जी. ने मोदींना दिला आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदीं यांची … Read more