राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा : सातारा जिल्हा काॅंग्रेसची मागणी

Satara District Congress

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्वर, खटाव, कराड या पाच तालुक्यांच्या 77 गावांमध्ये 600 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान जाहीर करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी … Read more

साताऱ्याचे नवे एसपी समीर शेख

Satara SP Sameer Shaikh

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पदोन्नतीने सातारचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. यापूर्वीही साताऱ्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून समीर शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती. तर सध्याचे एसपी अजय कुमार बन्सल नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गृहमंत्रालयाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या आदेशानुसार राज्यातील 24 आयपीएस पोलिसांच्या अधीक्षकांच्या बदल्याचे आदेश … Read more

पाचगणीत वीज पडली अन् मालक बचावले परंतु 3 घोडे जागीच ठार

Lightning strikes

पाचगणी | विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे झाडाच्या आडोश्याला थांबलेल्या घोड्यांवर वीज पडून तीन घोडी जागीच ठार झालीत. ही घटना पाचगणी टेबल लँन्ड पठारावर दुपारच्या सुमारास घडली. यावेळी सुदैवाने घोडे व्यावसायिक झाडापासून दूर असल्याने बचावले. परंतु घोड्याच्या मृत्यूमुळे घोडे मालक हवालदिल झाले होते. पाचगणी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून … Read more

साताऱ्यात ‘तरस’ रात्री रस्त्यावर तर सकाळी घरात घुसले, गोंधळ उडाला

Satara Taras

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे- सातारा महामार्गावरून सातारा शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश करताना लिंब फाट्यावरून मोळाच्या ओढ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री 8.30 वाजता हा तरस प्राणी प्रवाशांना दिसला होता. त्यानंतर चक्क सातारा शहरातील मंगळवार पेठेतील एका घरात तरस घुसला होता. त्यामुळे नागरिकांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरचा तरस एक आहे की अनेक याबाबत आता चर्चांना … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीचा सातारा जिल्ह्यातील 82 हजार 435 शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Mahatma Jyotirao Phule farmer loan waiver

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरण शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मंत्री मंडळातील इतर सदस्य, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे … Read more

सातारा जिल्हा परिषदेचे कंत्राट मिळाल्याचे सांगून 38 लाखांची फसवणूक

ZP Satara

पुणे | सातारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेत लागणार्‍या वस्तूंचा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाल्याचे सांगून व्यावसायिकाला तब्बल 38 लाख 20 हजाराला गंडा घातला आहे. या प्रकरणी साताऱ्यातील एकासह पुण्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल वसंत क्षीरसागर (वय- 38, रा. … Read more

गोटे गावच्या सरपंचपदी रईसा देसाई बिनविरोध

Gote Sarpanch Unopposed

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गोटे (ता. कराड) गावच्या नवनिर्वाचित सरपंचपदी सौ. रईसा मुजिब देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात सिंहांचा वाटा असणारे लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माहिती व … Read more

PFI संघटनेशी संबधितांची चाैकशीसाठी हिंदू एकताचे जिल्हाभर निवेदने

Hindu Ekata PFI

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी काही लोकांचा PFI शी संबंध असल्याबाबतच्या शक्यतेवरून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील रेठरे बु, वडगाव हवेली, खंडाळा, फलटण, भुईंजसह जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या पोलिस स्टेशनमध्ये याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. कराड येथे हिंदू एकता आंदोलन समितीकडून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, … Read more

साताऱ्यात दांडिया कार्यक्रमातील गोळीबार करणारे जेरबंद

Satara Shooters Arrested

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सेंट पॉल हायस्कृल येथे दांडिया कार्यक्रमात झालेल्या बाचाबाचीवरुन पिस्तुलांमधून एकावर गोळीबार करत दहशत माजवून पळून गेलेल्या तिघांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. एका संशयिताच्या घरी ते लपून बसले होते. पोलिसांनी छापा मारून त्यांना अटक केली. अमिर सलिम शेख, अभिषेक उर्फ अबू राजू भिसे आणि साहिल विजय सावंत अशी … Read more

दुचाकीसह पूरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह निरा नदीत सापडला

Nira River

शिरवळ | खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील मांड ओढ्यावरील पुलावरुन एक युवक दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. अविनाश उर्फ पप्पू शिवाजी जगताप (वय २७, रा.केदारेश्वर काँलनी, शिरवळ ता.खंडाळा) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. निरा नदीच्या पात्रालगत मंडाई कॉलनी जवळ मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानाना अविनाशचा मृतदेह सापडला. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, अविनाश उर्फ पप्पू … Read more