उस्मानाबादमध्ये पायाला मोबाईल बांधून भाजप कार्यकर्ते मतदानकेंद्रात; पोलिसांकडून हकालपट्टी

उस्मानाबादमध्ये मतमोजणीला जाताना भाजप कार्यकर्त्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे काँग्रेसचं काही खरं नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी पक्षात आता कुणी थांबायलाच तयार नसल्याचा शालजोडाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

उल्हासनगरमध्ये मनसे राष्ट्रवादीसोबत; ज्योती कलानींना मोठा दिलासा

कलानींच्या प्रचारात आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे.

हिंगोलीतील राष्ट्रवादीचा नेता भाजपात; निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराव वडकुते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

लातूर ग्रामीणमधील शिवसेनेचा उमेदवारच ‘गायब’ !! धीरज देशमुख बिनविरोध निवडून येणार?

निवडणूक एका आठवड्यावर आलेली असताना उमेदवाराचा अजून प्रचारच सुरु नसल्याने इथल्या लढतीला बिनविरोध लढतीचं स्वरूप आलं आहे. धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचच चित्र आहे.

मोहोळमध्ये रस्ता दुरुस्तीच्या कारणास्तव ४ गावांचा मतदानावर बहिष्कार

पंढरपूरकडे येण्यासाठी सदरच्या चार गावांना एकच रस्ता आहे. गावातील १५०० विद्यार्थ्यांना माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सुस्ते व पंढरपूरला जाव लागतं. मात्र हा रस्ता खराब असल्याने एसटी वेळेत येत नाही. तसेच घरी परत येण्यास वेळ होत असल्याने या भागातील तरुणांना उच्च शिक्षणापासून वंचित रहाव लागतं.

मतदारांनो जादूचे प्रयोग बघा; बसपाकडून वाशिममध्ये अनोखा प्रचार

मतदारांच्या दारोदारी जाऊन त्यांना आवाहन करणं तसेच गावागावात सभा घेणं हे प्रकार आपल्याला अनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र वाशीममध्ये बसपाकडून होत असलेल्या जादूच्या प्रयोगाचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष वेधून घेत आहे.

निवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार

देशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका

भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या समस्या सोडवायलाही येत जा असा खोचक संदेश राज ठाकरेंनी दिला.

पवारांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहेच – दिलीप सोपल

“आजही मला शरद पवार यांच्याविषयी आदर असून ते माझे थोरले बंधू आहेत, त्यांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहे