तुर्की: घरी ठेवली कोरोना व्हायरस पार्टी,११ जण ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्तंबूलमध्ये कोरोना विषाणूबद्दल घरी पार्टी केल्याच्या आरोपाखाली टर्की पोलिसांनी आयोजक आणि डीजे यांच्यासह ११ जणांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक अधिकारी म्हणाले की, काही पाहुणे डॉक्टरांसारखे कपडे घालून पार्टीत आले. शनिवारी रात्री पार्टी बायकोसेकेम्स जिल्ह्यातील व्हिला येथे आयोजित करण्यात आली होती आणि ती सोशल मीडियावर थेट शेअर केली गेली. तथापि,शोषलं डिस्टेंसिंगसाठी करण्यात … Read more

अन्यथा..राज्यात ‘कर्फ्यू’ लावावा लागेल- गृहमंत्री अनिल देशमुख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनामुळे जमावबंदी असून सुद्धा लोकांमध्ये त्याचे गांभीर्य दिसत नाही आहे. जनता कर्फ्यू उठताच अनेक लोकांनी जमाव बंदीच्या आदेशाला धाब्यावर बसवत आपल्या खासगी वाहनाने रस्त्यावर गर्दी केली आहे. मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरिकांना कडक इशारा दिला … Read more

दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ७ दिवसांच्या आत फाशी द्या! केंद्राची सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती

निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याबाबत होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे फाशी देण्यासाठी कालमर्यादा ठरविण्याबाबत विनंती केली आहे. दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना ७ दिवसांच्या आत फाशी देण्यात यावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

‘तुकडे-तुकडे गँग’ आम्हाला माहितीचं नाही; आरटीआय अर्जाला गृहमंत्रालयाचे उत्तर

२०१६ साली जवाहरलाल नेहरु विद्यापिठामध्ये देशविरोधी नारे लावण्याचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप नेत्यांनी तेथील विद्यार्थ्यांचा तुकडे-तुकडे गॅंग असा उल्लेख करायला सुरुवात केली. भाजपच्या प्रत्येक प्रचारसभेत जेएनयुतील त्या कथित घटनेचा उल्लेख करत येथील विद्यार्थ्यांची तुकडे-तुकडे गँग कशी देशविरोधी हे ठसवण्याचा प्रयन्त भाजपचे शीर्ष नेते नेहमीच करताना दिसतात. मात्र, याच तुकडे-तुकडे गॅंगच्या अस्तित्वाबद्दल सरकारने घुमजाव केला केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे देशातील ‘तुकडे-तुकडे गँग’बद्दल कोणतीही माहिती नाही, असं स्पष्टीकरण आरटीआय अर्जाला उत्तर देताना सरकारने दिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत गोखले यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली.

राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती- गृहमंत्री अनिल देशमुख

महाविकास आघाडीच्या गृहविभागाने पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने मेगा पोलीस भरती करण्याचे सूतोवाच केलं आहे. गृह विभाग लवकरच ७ ते ८ हजार पदांवर पोलीस भरती करणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दिवंगत जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते

सीएएच्या समर्थानात आतापर्यन्त ५२ लाख मिस कॉल नोंदवले गेले आहेत- गृहमंत्री अमित शहा

सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) पाठिंबा मिळावा म्हणून भाजपाने टोल फ्री क्रमांक जारी करत मोहिम चालवली आहे. त्यानुसार आतापर्यन्त तब्बल ५२ लाख लोकांनी दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल देत आपला पाठींबा या कायद्याला नोंदवला आहे अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज लोहगाव विमानतळावर आगमन झाले. वायुसेनेच्या विशेष विमानाने शहा आज पुण्यात पोहचले. देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषद पुणे येथे होणार आहे. या परिषदेला देशाचे गृहमंत्री यानात्याने शहा हजेरी लावणार आहेत.

Breaking | भविष्यात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार, सुशिलकुमार शिंदेंचे मोठे वक्तव्य

एकमेकांना सहकार्य केलं तरच ते आघाडी धर्माचं पालन होईल असं म्हणत येत्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष ताकदीने उभे राहतील असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

अवैद्य धंद्यांना बसणार चाप, गृह राज्यमंत्र्यांचे पोलीसांना सरप्राइज चेकिंगचे आदेश

Dipak Keskar

मुंबई | राज्याच्या ग्रामीण भागातील असामाजिक तत्व व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षकांना त्या त्या भागात अचानक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. येत्या आठवडाभरात प्रत्येक पोलीस परिक्षेत्रात पोलीस महानिरीक्षकांनी ही अचानक भेटी देऊन प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय बंद … Read more