अर्थव्यवस्था आयसीयूत; असक्षम डॉक्टरांकडून उपचार – पी. चिदंबरम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारताच्या चालू आर्थिक परिस्थितीवर पी. चिदंबरम यांनी भाष्य केलं आहे. अर्थव्यवस्था आयसीयूत नाही, परंतु आयसीयूत ढकलले जाण्याची वाट पाहत आहे. ती अजूनही आयसीयूच्या बाहेरच आहे व असक्षम डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहे असा सणसणीत टोला भारताचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारला लावला आहे. तसेच, रिझव्‍‌र्ह बँकेचे … Read more

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2020 रोजी सादर करणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2020 रोजी आपले दुसरे बजेट सादर करणार आहेत. अर्थसंकल्प तयार करण्याच्या टीममध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजीवकुमार यांच्या नेतृत्वात ही टीम अर्थसंकल्प बनवेल. सुब्रमण्यम, मुख्य आर्थिक सल्लागार जुलैमध्ये सुब्रमण्यमच्या पहिल्या आर्थिक सर्वेक्षणात लाख कोटी रुपयांचे अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी 8 टक्के व्याधी दर साध्य करण्यासाठी आणि राखण्यासाठी अनेक निराधार … Read more

आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला आणखी एक धक्का, जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील

सर्वसामान्यांना धक्का देणाऱ्या रिझर्व बँकेने मोदी सरकारलाही धक्के दिले आहेत. या आर्थिक वर्षात विकास दर वाढीचा वेग ६.१ टक्के राहील असा अंदाज वर्तवणाऱ्या रिझर्व बँकेन आता त्यात १.१ टक्क्याची कपात केली आहे. या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील, असा अंदाज रिझर्व बँकेने व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारवरच आर्थिक मंदीचं संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सीतारामन यांच्या पतीची आर्थिक धोरणांवरून सरकारवर टीका; शरद पवारांकडूनही अकलूजच्या सभेत कानउघाडणी

“नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत असं भाजपनं ठरवून टाकलं आहे. अर्थव्यवस्था संकटात आणायला हे एक प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय म्हणून काय धोरणं राबवायची, याचं उत्तर सरकारकडे नाही हे प्रभाकर यांनी खेदानं नमूद केलं. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर मनमोहन सिंग यांच्या मॉडेलचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही असं मतही प्रभाकर यांनी व्यक्त केलं.

खूशखबर! रिझर्व बँकेचा मोठा निर्णय, या कर्जावरील हप्ता होणार कमी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | बाजाराची जोरदार मागणी व सरकारच्या दबावात, अखेर रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारच्या कर्जाचा हफ्ता कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदरात (रेपोरेट) १८ महिन्यानंतर पहिल्यांदा पाव टक्का कपातीचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे वाहन कर्जपासून ते गृह कर्ज व व्यावसायिक कर्जापासून ते वैयक्तिक कर्जावरील हफ्ता कमी होणार … Read more

अर्थसंकल्पाच्या तोंडावर शेअर बाजार कोसळला

मुंबई प्रतिनिधी | अर्थसंकल्प सादर होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना मुंबई स्टाॅक एक्जेंज मधील बाजार आज घसरला. सेन्सेक्समध्ये ३६८ अंकांची घसरण झाली. तर निफ्टी १०,७०० च्या खाली गेला आहे. अर्थसंकल्पात नेमके काय असेल याबाबतच्या संभ्रमा मुळे शेअर बाजार कोसळल्याचे बोलले जात आहे. निवडणूक तोंडावर असल्याने यंदाच अर्थसंकल्प रोजगारभिमूख असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात … Read more