मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटला!! जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुप्रीम कोर्टाची मंजूरी

Jayakwadi Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अखेर मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर तोडगा निघाला आहे. कारण की, इथून पुढे उत्तर महाराष्ट्रच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाणार आहे. जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्रातील विविध धरणातून सोडले जाईल. त्यामुळे आता मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर होणार आहे. मुख्य म्हणजे, जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या … Read more

शहराचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत, ‘हे’ आहे कारण

Water supply

औरंगाबाद – शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या 56 व 100 दलली योजनेवरील नवीन व जुने जायकवाडी उद्भव पंपगृहास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत जोडणी करण्यात आलेल्या दोन्ही स्वतंत्र 33 के. व्ही. उच्च दाब विद्युत वाहिनीवर बिघाड झाल्याने दोन्ही पंपगृहाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे मनपा प्रशासनाने एका प्रसिद्धि … Read more

ऐन सणासुदीच्या काळात शहरवासीयांना पाणीटंचाईचा शॉक

Water supply

औरंगाबाद – जायकवाडी धरणात महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनची केबल जळाल्याने दुरुस्तीसाठी सुमारे सहा तास लागले. यामुळे पाण्याचा उपसा बंद होता. तसेच दोन तास जुनी पाणीपुरवठा यंत्रणाही बंद पडली. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. पर्यायाने आज होणारा पाणीपुरवठा विस्कळित होण्याची शक्यता आहे. महावितरणच्यावतीने दोनच दिवसांपूर्वी शुक्रवारी (ता.22) पैठण क्षेत्रातील चितेगाव परिसरात 220 … Read more

जायकवाडीचे आपात्कालीन दरवाजे तिसऱ्यांदा उघडले

jaykwadi dam

औरंगाबाद – स्थानिक पाणलोट क्षेत्रातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मंगळवारी दुपारनंतर स्थानिक नाथसागरात येणारी आवक वाढत गेल्याने दिवसभरात जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवावा लागला. काल रात्री धरणाचे आपत्कालीन दरवाज्यांसह सर्व दरवाजे चार फुटांपर्यंत वर उचलून गोदापात्रात 80 हजार 172 क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला. धरणात येणारी आवक लक्षात घेऊन विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल … Read more

जरी भरला नाथसागर, तरी आमची रिकामी घागर; सोशल मीडियावर औरंगाबादकर संतापले

jayakwadi

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेले जायकवाडी धरण पूर्णपणे भरल्याच्या वृत्ताने काल मराठवाड्यात आनंदी आनंद होता. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याआधी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याहस्ते जलपूजनदेखील करण्यात आले. मात्र धरणातील पाण्याचा संचय करणारा नाथसागर भरला तरीही शहरातील नळांना सहा दिवसांनीच पाणी येते, या भावनेने औरंगाबादकरांनी समाज माध्यमांवर … Read more

जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडले ! पैठण शहराला पुराचा धोका

jayakwadi

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी ख्याती असलेले जायकवाडी धरण सलग तिसऱ्या वर्षी भरत आले आहे. या वर्षी हे धरण तब्बल 98.40 टक्के भरले आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असते. मात्र, दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण निर्माण … Read more

सलग तिसऱ्या वर्षी भरले जायकवाडी धरण; 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

jayakwadi

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी ख्याती असलेले जायकवाडी धरण सलग तिसऱ्या वर्षी भरत आले आहे. या वर्षी हे धरण तब्बल 95 टक्के भरले आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असते. मात्र, दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण निर्माण … Read more

जायकवाडी धरण 75 टक्क्यांवर !

jayakwadi damn

औरंगाबाद – औरंगाबाद शहराची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या धुवाधार पावसाने नाथसागरात 17 हजार 937 क्‍युसेक अशी आवक सुरू आहे. बुधवारी दुपारनंतर नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून गोदावरीत विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी रात्री धरणाचा जलसाठा 75 टक्के … Read more

जायकवाडी धरण पूर्ण भरण्याच्या दिशेने मात्र पावसाच्या विश्रांतीमुळे पाण्याची आवक घटली

jayakwadi damn

औरंगाबाद – नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणे जवळपास भरली असल्याने जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र यात आता मोठी घट झाली आहे. त्यामुळे जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. मात्र तरी देखील धरणाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहचला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने गुरूवारी दुपार नंतर अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग जवळपास … Read more

नाशिक, नगर जिल्ह्यातून पाण्याची आवक वाढली; जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात वाढ

Koyana Dam

औरंगाबाद – अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मागील दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने काल सकाळपासून जायकवाडी धरणात 57 हजार 457 क्‍युसेक अशा मोठ्या क्षमतेने पाण्याची आवक सुरू आहे. 12 तासात धरणाचा जलसाठा 75 टक्के अशी भरघोस वाढ झाली असून, गेल्या 24 तासात नाशिक व नगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने धरण समूहातून … Read more