राहुल गांधी पंतप्रधान झालेले पाहायचं होतं; दीपिकाचा जुना व्हिडीओ व्हायरल

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जेएनयु) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून देशभरात निदर्शन पाहायला मिळत आहेत. या निदर्शनात सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,साहित्य,कला अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती या निदर्शनात सामील होऊन किंवा सोशल मीडियावर व्यक्त होत या हल्ल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांसोबत उभी राहताना दिसत आहेत. यासर्वामध्ये आता बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण सुद्धा सामील झाली आहे.

जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे इंदिरा गांधींना कुलपतीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) हिंसाचारामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. डावे आणि एबीव्हीपी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. जेएनयू हिंसाचारावरून देशातील बर्‍याच ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. त्याचबरोबर दिल्ली पोलिस गुन्हे शाखेच्या प्रकरणाचा तपास करत आहेत. जेएनयूमध्ये हा वाद उद्भवला असला तरी हा पहिला नाही, तर यापूर्वीही विद्यापीठाचे अनेक वादंग होते. जवाहरलाल नेहरू … Read more

औरंगाबादमध्ये जेएनयू हल्ल्याचा विद्यार्थी काँग्रेसकडून तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी काँग्रेसतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तोंडाला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करण्यात आले.

कराडमध्ये विद्यार्थी काँग्रेसतर्फे जेएनयु हल्ल्याचा निषेध;संघ-भाजपवर केला तुफान हल्लाबोल

जेएनयू विद्यार्थी हल्ल्याप्रकरणी देशभर या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. रविवारी काही तोंड झाकलेल्या गुंडांनी जेएनयूमधील विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती. या भ्याड हल्ल्याबाबत अनेक स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. यायचं भाग म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे कराडमध्ये निदर्शने करण्यात आली.

नव्या लढ्यासाठी मी सज्ज, आता एक इंचभरही मागे हटणार नाही – आयशे घोष

तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद..!! आता मी सुरक्षित असून परत आले आहे. नवीन लढ्यासाठी पुन्हा सज्ज होऊन..!! या लढ्यात आता एक इंचभरही मागे हटणार असं मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची प्रमुख आयशे घोष हिने व्यक्त केलं आहे.

जेएनयूचा हल्ला पाहून मला २६/११ ची आठवण झाली – उद्धव ठाकरे

जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनावेळी पोलीस प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये खडाजंगी

औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थांनी मानवी साखळी करीत निषेध रॅली काढली. या निषेध रॅली दरम्यान काही ठिकाणी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. विद्यार्थी उद्धट असल्याचा शेरा पोलिसांनी मारला तर विद्यार्थ्यांकडून संघ आणि भाजपच्या लोकांना टार्गेट करण्यात आलं.

जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ मराठवाडा विद्यापीठात मानवी साखळी

देशातील विद्यापीठ ही आंदोलनाची केंद्र का बनलीत याचा विचार करणं सध्या गरजेचं बनलं आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन विरोध झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी चेहरे झाकलेल्या गुंडांकडून जेएनयूमधील विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात येत असून औरंगाबादमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थांनी मानवी साखळी करीत निषेध रॅली काढली.

जेएनयूवरील हल्ला वेदनादायी, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर यांची खंत

जेएनयूमधील अनेक विद्यार्थ्यांवर शनिवारी सायंकाळी काही गुंडांकडून जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर आलं. देशभरात या घटनेचे संतप्त पडसाद उमटत असून समाजकारण, राजकारण यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींकडून निषेधाच्या प्रतिक्रिया बाहेर येत आहेत. जेएनयूचे माजी विद्यार्थी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी झालेला प्रकार वेदनादायी असल्याची भावना व्यक्त केली आहे.

भारतीयांनी आता गुंडगिरी खपवून घेऊ नये – आनंद महिंद्रा

बुद्धीमंतांचा गढ समजल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांना क्रूर पद्धतीने मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. फी वाढ, नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयांवर वातावरण तापलेलं असताना आधी जामिया मिलिया आणि आता जेएनयूमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.