भाजपाचा उद्या नांदगावात धनगर समाजाचा भव्य मेळावा

Chandrasekhar Bawankule

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी (ता. 11) कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव (ता. कराड) येथील श्रीराज मंगल कार्यालयात सायंकाळी 6.30 वाजता कराड दक्षिणमधील धनगर समाजबांधवांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांनी दिली … Read more

सातारा लोकसभा व कराड दक्षिणमध्ये कमळ निवडून येणारच : बाळा भेगडे

Karad BJP Bala Bhegade Press

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपाला विजय मिळविता आला नाही, त्या सर्व जागांवर येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य पक्षाने निश्चित केले आहे. यासाठी भाजपाने आखलेल्या लोकसभा प्रवास योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, सातारा लोकसभा व कराड दक्षिण मतदारसंघात यावेळच्या निवडणुकीत कमळ निवडून येणारच, असा विश्वास माजी राज्यमंत्री … Read more

शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश रविवारी सदस्य राष्ट्रवादीत स्वगृही परतले

कराड | पाटण मतदारसंघातील वसंतगड (ता. कराड) या गावातील ग्रामपंचायतच्या सदस्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई गटातील पक्ष प्रवेशानंतर काही तासातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाटणकर गटात स्वगृही परतले आहेत. त्यामुळे पाटण व कराड तालुक्यात वसंतगड गावचे राजकारण चांगलेच चर्चेत आले आहे. गावातील स्थानिक राजकीय कुरघोडीतून हा प्रकार घडला होता. यामध्ये आर. वाय. नलवडे दादाच सदस्यांच्या पुनः पक्ष … Read more

संघर्ष समितीची मागणी : उसाची पहिली ऊचल 3 हजार 500 रूपये द्या

Sugarcane Sangharsh Committee

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी ऊस शेतीचे उत्पन्न घेण्यासाठी लागणारी खते- बियाणे, औषधे, मजुरी, मशागत व शेतीपंपाचे वीज बिल इत्यादी साधनांचा खर्च दुप्पट- तिप्पट झाला आहे. ऊस शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस शेती तोट्यात गेली आहे. आपल्या शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सरासरी 3 हजार रूपयांच्या पुढे पहिली उचल जाहीर केली आहे. … Read more

काॅलेजच्या विद्यार्थ्यांने कृष्णा पूलावरून नदीत उडी घेतली, शोध सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड- काॅलेज मार्गावर असलेल्या कृष्णा पूलावरून एका कॉलेज विद्यार्थ्यांने नदी पात्रात उडी घेतली आहे. आत्महत्या करण्यासाठी उडी घेतलेला विद्यार्थी अद्याप आढळून आलेला नाही. या प्रकारामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थींनी व पालकांच्यात खळबळ उडाली. अनेकांनी कृष्णा पूलावर धाव घेतली आहे. कृष्णा पूलाच्या खाली नदीपात्रात उडी घेललेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. … Read more

पाटणकर गटाला झटका : वसंतगड येथील विद्यमान 6 ग्रामपंचायत सदस्यांचा देसाई गटात प्रवेश

Vasantgad Gram Panchayat Members

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण मतदार संघातील वसंतगड (ता. कराड) ग्रामपंचायत मधील विद्यमान सहा सदस्य, तसेच ग्रामस्थांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे सुपने जिल्हा परिषद गट व पाटण मतदार संघात राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला मोठा धक्का मानला जात आहे. वसंतगड ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला सत्ता एकहाती … Read more

तुळसण येथे बिबट्या दुचाकीच्या आडवा : चालक जखमी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तुळसण येथे शुक्रवारी (दि.4) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दुचाकी चालकाच्या समोर आल्याची घटना घडली. यामध्ये दुचाकी चालक जखमीही झाला आहे. यावेळी दुचाकी चालक गाडीवरून खाली पडला असता, बिबट्यानेही भीतीने धूम ठोकली. या घटनेत नागनाथ भोमाजी गंडे असे जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, … Read more

शिक्षण क्षेत्राला भांडवलदारी हा रोग लागला : डाॅ. इंद्रजीत मोहिते

Dr. Shalaka Patil

कराड | शिक्षण क्षेत्रात भांडलवदारी, व्यावसायिकता आलेली आहे. स्वतंत्र भारतात पैशाचे वर्चस्व संपवून ज्ञानाचे वर्चस्व आणल्या शिवाय पर्याय नाही. शैक्षणिक क्रांती ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती, ती न होता ती व्यावसायिक स्वरूपाची झाली आहे. शिक्षण क्षेत्राला भांडवलदारी सारखा रोग लागलेला आहे. मुलीच्या प्रगतीचे काैतुक तेव्हाच होईल, जेव्हा प्रत्येक घरातील मुलींच्या शिक्षणावर भर दिला जाईल, असे … Read more

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना DYSP पदावर पदोन्नती

DYSP B. R. Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना पोलीस उपअधिक्षकपदी (DYSP) पदोन्नती मिळाली. त्याच्या निवडीबद्दल पोलिस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी आज दिवसभर पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. बी. आर. पाटील यांनी पोलिस दलात गेली 32 वर्षे काम केले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस उपअधिक्षक, सहाय्यक पोलीस … Read more

सलग 50 वर्षे बिनविरोध : कराड तालुका खरेदी- विक्री संघ उंडाळकर काकांचाच

Karad Taluka Kharedi Vikri Sangh

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुका खरेदी विक्री संघाच्या 2022-23 ते 2027-28 पंचवार्षिक निवडणुकीत 17 जागांसाठी 17 उमेदवारी दाखल झाले होते. अर्ज छाननीमध्ये सर्वच्या सर्व 17 अर्ज वैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली सलग 9 पंचवार्षिक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, रयत कारखान्याचे चेअरमन … Read more