Satara News : जोतिबा यात्रेला निघालेल्या वारकऱ्यांना ट्रकची धडक; तीनजण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूरला जोतिबा देवाच्या यात्रेसाठी निघालेल्या वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील दिंडीतील वारकऱ्यांना कराड हद्दीत ट्रकने धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून, त्यातील एक जण गंभीर आहे. त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीतील ब्रीजवर रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा … Read more

उत्तर कोरेगावमध्ये औद्योगिक वसाहतीच्या मुद्यांवरून समर्थक व विरोधी गट आमनेसामने

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व माण खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्यामध्ये वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये मुंबई- बंगलोर औद्योगिक वसाहत होण्याच्या मुद्द्यावरून दोन गट निर्माण झाले आहेत. यामध्ये ही औद्योगिक वसाहत व्हावी म्हणून एक समर्थक गट उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे. तर … Read more

अनैतिक संबधातून पुरूषाचा खून करणाऱ्या महिलेस जन्मठेप

Satara Court

सातारा | नांदवळ (ता. कोरेगाव) येथे शेतकऱ्याच्या खूनप्रकरणी महिलेस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सीमा नामदेव चव्हाण (वय- 30, रा. नांदवळ, ता. कोरेगाव) असे संबंधित महिलेचे नाव आहे. अनैतिक संबधातून होणाऱ्या वादावादीतून महिलेने शैलेश अशोक भोईटे (रा. वाघोली, ता. कोरेगाव) यांचा खून केला होता. याबाबतची माहिती अशी, नांदवळ येथे हुपळी नावाच्या शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये 19 जुलै … Read more

भाडळेत वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू

कोरेगाव | भाडळे (ता. कोरेगाव) येथे काळवट नावाच्या शेत शिवारात वीज पडून संभाजी सीताराम निकम (वय- 60) या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. कोरेगाव तालुक्यात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळला. भाडळे गावात दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वीज कोसळली होती. भाडळे येथे जोरदार आलेला पाऊस थांबल्यानंतर काळवट नावाच्या शिवारात संभाजी निकम यांचा मृतदेह नागरिकांना दिसून आला. या घटनेची … Read more

शिंदे सरकारच्या पहिल्याच निर्णयाला विरोध : भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना पाठिंबा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिंदे- फडणवीस सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिलाच घेतलेला निर्णय आणि आ. महेश शिंदेंचा ड्रिम प्रोजक्ट असलेल्या कोरेगाव एमआयडीसीला स्थानिकांनी विरोध केला आहे. बंगळूर- मुंबई औद्योगिक काॅरिडाॅरसाठी जमीन हस्तांतरणास सहा गावातील लोकांनी विरोध केला आहे. त्या संदर्भातील पत्र आज जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, भाजप आ. जयकुमार गोरे आणि आ. महेश शिंदे यांना … Read more

मृतदेह ग्रामपंचायतसमोर दहन करण्याचा प्रयत्न : स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही फडतरवाडीत स्मशानभूमी नाही

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशनजवळ असलेल्या फडतरवाडी या गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गावातील एक मृतदेह ग्रामपंचायत कार्यालया समोर दहन करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून पर्यायी जागेची पाहणी करून स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला. कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी येथे देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा … Read more

आ. महेश शिंदेच्या पुढाकारातून फिल्टरेशन प्लांट सुरू : कोरेगावातील 40 हजार नागरिकांना मिळणार शुध्द पाणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आ. महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरातील 40 हजार नागरिकांना पावसाळ्यात देखील शुद्ध पाणी मिळणार आहे. रेल्वे स्टेशन येथे आणि एमआयडीसीत जलशुद्धीकरण केंद्र (फिल्टरेशन प्लांट) उभारण्यात आले असून याद्वारे नागरिकांना आता स्वच्छ पाणी मिळणार आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षाचे कोरेगावकरांवरील पाणी संकट दूर झाले आहे. कोरेगाव … Read more

तहसिल कार्यालयातील कारकूनास सक्तमजुरी, शेतकऱ्याकडून 10 हजारांची लाच

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील तहसील कार्यालतील कारकूनाला लाच घेतल्याप्रकरणी सातारा न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सुलतानवाडी येथील जमिनीसंदर्भात सुरू असणारी कायदेशीर प्रक्रिया निकाली काढण्यासाठी 10 हजारांची लाच घेतली होती. प्रवीण रघुनाथ कुंभार (रा. कोरेगाव) असे शिक्षा झालेल्या कारकूनाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, कोरेगाव तहसीलदार कार्यालयात प्रवीण कुंभार महसूल कारकून … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पहिला निर्णय जन्मभूमीसाठी : कोरेगाव तालुक्यात लवकरच भूसंपादन होणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके बंगळूरू- मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे जागा देण्यात येणार असून यासाठी भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येईल. दिघी बंदराच्या परिसरात बल्क ड्रग पार्कची सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या अ‍ॅपेक्स अ‍ॅथॉरिटीच्या पहिल्या बैठकीतच त्यांनी निर्णय घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर … Read more

शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा | शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर आज भोसे (ता. कोरेगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली. शहीद विपुल इंगले यांचे बंधू विशाल यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत … Read more