वाठारला महिला ग्रामसभेत दारू दुकान, बिअर बारला विरोध

Vathar women's village council

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वाठार येथे आज महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत देशी- विदेशी दारू, वाईन शाॅप आणि बियर बार दुकान यांना परवानगी देण्यावर चर्चा करण्यात आली. महिलांनी हातवर करत एकमुखाने परवाना नामंजूर केला. उद्या (दि. 17) रोजी पुरूषांची ग्रामसभा होणार आहे. वाठार ग्रामपंचायतीने आजच्या सभेत 10 विषयाची सभा … Read more

राज्यात दारुची दुकानं सुरु असताना, जिम बंद ठेवल्या जातात ही बाब दुर्दैवी – फडणवीस

मुंबई । दारूची दुकानं उघडली आणि जिम बंद आहेत हे दुर्दैवी आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी व्यायामशाळा उघडण्यास परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं पत्राद्वारे केली आहे. याशिवाय हळूहळू राज्यातील सर्वच क्षेत्रांचा विचार करुन अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्या-त्या क्षेत्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वं तयार करुन ती क्षेत्रं खुली करायला हवीत, अशीही मागणी या पत्रातून करण्यात … Read more

Swiggy आता ‘या’ राज्यातही करणार दारुची ‘होम डिलिव्हरी’

नवी दिल्ली । लोकप्रिय ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Swiggy ने झारखंड आणि ओडिशानंतर आता पश्चिम बंगालमध्येही मद्याची ‘होम डिलिव्हरी’ सुरू केली आहे. पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि सिलीगुडी या दोन शहरांमध्ये सुरुवातीला ही सेवा सुरू होत असून लवकरच राज्यातील अन्य शहरांमध्येही घरपोच मद्यविक्री सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दुकानांवरील गर्दी कमी … Read more

ऑनलाईन मद्य खरेदी करत असाल तर सावधान; नोंदणीसाठीच्या अनाधिकृत लिंकद्वारे फसवणुक होण्याची शक्यता

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाईन शॉप समोर मद्यप्रेमींची गर्दी होऊ नये म्हणून आजपासून ऑनलाईन मद्यखरेदी करण्यासाठी प्रशासनाकडून ऑनलाइन लिंक देण्यात आली आहे .आता या लिंकवरून नोंदणी करताच सशुल्क मद्य घरपोच मिळणार आहे. पण नोंदणी करताना मद्य प्रेमींनो सावधान ! तुम्ही ज्या लिंकवर नोंदणी करत आहात ती फेक असू शकते व … Read more

राज्यात ‘या’ तारखेपासून दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी

मुंबई । राज्यात दारुविक्री सुरु असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये १४ मेपासून दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, मुंबईसह दारुविक्री बंद असलेल्या ठिकाणीदारूची होम डिलिव्हरी मिळणार नाही. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यात दारुविक्री सुरु आहे तिथे रांगेत उभे राहण्यासोबत दारू घरपोचही केली जाईल. दारूची होम डिलिव्हरी कशी करायची याचे नियोजन वाईन शॉप्सनी … Read more

सर्व राज्यांनी दारू विक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’ चा विचार करावा – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | सर्व राज्यांनी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत कोणताही संपर्क न वाढवता दारूची ‘होम डिलिव्हरी’ करण्याचा विचार करावा,” अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राज्यांना केल्या आहेत. सरकारने लॉकडाउनच्या निर्णयाला मुदतवाढ दिली. तसेच दारू विक्रीला परवानगी दिली. मात्र, दारुविक्रीच्या आदेशात स्पष्टता नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती … Read more

औरंगाबादमध्ये बनावट देशी- विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद प्रतिनिधी | विदेशी दारू कंपनीचे लेबल लावून स्पिरिट आणि केमिकलच्या साह्याने बनावट दारू बनविणाऱ्या गल्लेबोरगाव शिवारातील एका कारखान्यावर औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. यात पोलिसांनी तब्बल पाऊण कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. महागड्या विदेशी कंपनीची दारू छुप्या पद्धतीने गल्लेबोरगाव शिवारातील एका शेतात असणाऱ्या कारखान्यात तयार केली जात … Read more

नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडणं हे दुर्दैव; अण्णा हजारेंची सरकारवर टीका

अहमदनगर । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आधी केंद्रनं आणि नंतर राज्य सरकारनं दारूची दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला आहे. सरकार नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडून देत आहे हे दुर्दैव आहे,’ अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अद्याप बरीच कामे करणे … Read more

तळीराम पावले! ३ दिवसांत १०० कोटींहून अधिक महसूल गोळा

मुंबई । केंद्र सरकारने ४ मेपासून कन्टेंन्मेंट झोन वगळता इतर भागात अटी-शर्तींसह दारु विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. महाराष्ट्रातही दारुची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची एकच झुंबड उडाली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली. तळीरामांच्या या … Read more

राज्यात मागील २४ तासात ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या दारूचा खप

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने दारू विक्रीला परवानगी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी तळीरामांची दिसून येत आहे. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. तळीरामांच्या या दारूवेडामुळे दारू विक्रीच्या आकड्यांनी उचांक गाठला आहे. महाराष्ट्रात दारूविक्री करणाऱ्या दुकानांची संख्या … Read more