बुधगाव मध्ये तलाठी कार्यालयास ग्रामस्थांनी ठोकले टाळे,नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने शेतकरी झाले संतप्त

सांगली प्रतिनिधी । मिरज तालुक्यातील बुधगाव येथे अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे न झाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी तलाठी कार्यालयाला मंगळवारी टाळे ठोकले आहे. गत आठवड्यात जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील पूर्व भागासह पूर्ण जिल्ह्यातील काढणीला आलेले आणि फुलोर्‍यात असणार्‍या द्राक्षबागांचे पावसाने मोठे नुकसान झाले. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असून, द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहेत रब्बीच्या … Read more

दारु पिऊन करत होता थेट मंदिरातच चोरी; नागरिकांनी घडवली अद्दल

सांगली | मिरजेतील मंगळवार पेठेतील शनि-मारूती मंदिरात मद्यधुंद अवस्थेत एक इसम मंदिरात जावून मंदिराची काच फोडून देवाजवळ असलेली पितळी पंचपाळ चोरून नेण्याचा प्रयत्न करीत असताना नागरीकांनी त्याला पकडून चोप दिला. त्याच्याकडे इतर ठिकाणी चोरून आणलेले मंदिराचे पितळी कळस होते. मिरज शहर पोलिसांनी या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चोरट्यास ताब्यात घेतले आहे. तो इसम वेगवेगळी माहिती देत … Read more

खटावमध्ये लाळ खुरकत रोगाने 50 मेंढ्यांचा झाला मृत्यू

सांगली | मिरज तालुक्यातल्या बेडग येथील लाळ खुरकत रोगाने 40 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच आता खटाव येथे गेल्या आठ दिवसांत जवळपास 50 हुन अधिक मेंढी व त्यांच्या पिलांचे मृत्यू झाल्याने मेंढी पालकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील आठ दिवसांत खटाव परिसरातील पन्नासहून अधिक मेंढी व मेंढीचे पिले यांचा मृत्यू झाला असून … Read more

महिलेच्या गळ्यातील सोने चोरणे पडले महागात, गावकऱ्यांनी दिली ‘हि’ भयंकर शिक्षा

crime

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी एका चोराला जमावाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. संबंधित चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर तो पळून जात असताना गावातील लोकांनी पाठलाग करत त्याला पकडले. यानंतर गावातील संतप्त जमावाने चोरट्याचे हात … Read more

चिकन विक्रेत्याच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार; सांगलीमधील घटना

Rape

मिरज : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. असे असले तरी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सतत निर्माण होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना सांगलीतील मिरज याठिकाणी घडली आहे. यामध्ये एका 25 वर्षीय तरुणाने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपी युवकाने पीडित मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून अन् गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार … Read more

धक्कादायक! सरबत प्यायला देऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

सांगली प्रतिनिधी | मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरहान युसुब ढालाईत यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या घराजवळ ढालाईत याचे घर आहे. पिडीत मुलीशी ओळख करून तिला वारंवार माझ्याबरोबर चल असे म्हणून तो त्रास देत होता. पिडीत मुलीच्या घरासमोर ढालाईत … Read more

कोरोनाग्रस्त वृद्धाची मिरजेतील रुग्णालयात चाकूने गळा कापून आत्महत्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरज येथील शासकीय कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाने चाकूने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे घडला. ५८ वर्षीय हुसेन बाबुमिया मोमिन असे मृत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी मात्र याबाबत संशय व्यक्त केला असून, घाईगडबडीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी भूमिका घेतली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही … Read more

ऑनर किलिंगच्या ‘सैराट’ घटनेनं सांगली हादरले; बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मित्राचा खून

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ऑनर किलिंगच्या घटनेनं सांगली जिल्हा हादरला आहे. मिरज तालुक्यातील कवठेपिरान मध्ये बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या सख्या भावानं 22 वर्षीय मित्राचाच भोसकून खून केला. ओंकार माने असे मृत तरुणाचे नाव आहे. हल्ल्यानंतर निखील सुधाकर सुतार हा स्वतःहून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. शनिवारी रात्री उशिरा कवठेपिरान गावात घडलेल्या ’सैराट’ … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा १४ वा बळी : मिरजेतील अमननगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आज मध्यरात्री मिरजेतील कोरोनाचा पहिला गेला आहे. सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास मिरज – मालगाव मार्गावरील अमननगर येथील ५३ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील मालगाव येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी मध्यरात्री कोरोनाचा मिरज शहरात पहिला … Read more

मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागण; शहरात उडाली खळबळ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला आज कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मार्ग येथे असणाऱ्या या प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला. या डॉक्टरला त्रास जाणवू लागल्याने त्याने खाजगी लॅब मध्ये तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या डॉक्टरला सध्या मिरजेतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले … Read more