भाजपच्या 2 मतदानांवर काँग्रेसचा आक्षेप; मतमोजणीला उशीर होण्याची शक्यता

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष आमदारांनी आपलं मत मतपेटीत टाकलं आहे. मात्र भाजपच्या २ मतांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे मतमोजणी लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप आहे. गुप्त मतदान असताना या दोन्ही … Read more

भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण … ; खडसेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान होत असून तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत पण पक्षाला सोडून ते मला मतदान करणार नाहीत असे खडसे म्हणाले. विधानभवनाकडे रवाना होताना खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजपचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत … Read more

मलिक- देशमुखांना मतदानाचा अधिकार नाहीच; राष्ट्रवादीचे समीकरण बिघडणार??

malik deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 20 जूनला विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान होणार असून त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख या राष्ट्रवादीच्या तुरुंगात असलेल्या नेत्यांना विधान परिषदेसाठी मतदान करता येणार नाही असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी देखील राज्यसभा निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्यांना मतदान करता आले नव्हते. … Read more

विधानपरिषद निवडणुक : भाजपकडून 6 व्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी

sadabhau khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने 6 व्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे. 20 जून ला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी काल 5 जणांना उमेदवारी देण्यात आली होती. आता 6 व्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सदाभाऊ खोत हे आज उमेदवारी … Read more

राष्ट्रवादीचे ठरलं!! एकनाथ खडसे, रामराजेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

ramraje khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 20 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जेष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि भाजप मधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. दोन्ही नेते आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. जयंत पाटील यांनी ट्विट करत … Read more

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य निवड रखडण्याची शक्यता, कारण..

मुंबई । राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेतील एकूण १२ जागांसाठी असलेला कालावधी जूनच्या पहिल्या आठवड्यात संपला. तोपर्यंत १२ नव्या नावांची यादी राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे जाणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप ही यादी राज्यपालांकडे गेलेली नाही. कारण या जागांसाठी असलेल्या निकषांवरतीचं राज्यपाल आग्रही असल्याचं समजतं आहे. यामुळे राज्यपाल नियुक्त असलेल्या विधानपरिषदेच्या १२ जागांची नियुक्ती आता रखडणार असल्याचं … Read more

तर मग ही विधान परिषदेची ब्याद नकोच; राजू शेट्टींनी ऑफर नाकारली

कोल्हापूर । राज्यपाल कोट्यातून मिळणाऱ्या विधान परिषद जागेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी भलतेच कोंडीत सापडल्याचे दिसत आहेत. एकीकडे दुरावलेल्या विरोधकांनी चालवलेले टीकेचे प्रहार आणि स्वकीयांनीच केलेले घाव, यामुळे राजू शेट्टी व्यथित झाले आहेत. त्यातून त्यांनी गुरुवारी विधान परिषदेची ब्यादच नको, असे म्हणत यावर चर्चा करायचे नाही असे स्पष्ट केले आहे. विधान परिषदेच्या एका … Read more

मी उद्धव ठाकरे.. अखेर उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर आठही नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनीही आमदारकीची शपथ घेतली. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास विधानभवनात उद्धव … Read more

खडसे-भाजपा वादावर नितीन गडकरी, म्हणाले..

नागपूर । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारी न दिल्यानं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ यांनी राज्यातील पक्ष नैतृत्वावर जाहीर टीका आहे. राज्यातील नेत्यांमुळे तिकीट मिळालं नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. निष्ठावंतांना डावलून भाजपानं उपऱ्यांना संधी दिल्याचा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली. यावरून बराच कलगीतुरा … Read more

अखेर उद्धव ठाकरे आमदार झाले! विधान परिषदेवर बिनविरोध निवड

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत होती. त्यानंतर सर्व उमेदवारांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, … Read more