राज्यातील वीज ग्राहकांचे मीटर बदलणार!! त्याजागी येणार नवीन ‘स्मार्ट मीटर’

meter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वीज ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच महाराष्ट्रामधील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार आहेत. त्याजागी अदानी ग्रुप कंपनीकडून नवीन मीटर बसवले जातील. गुरूवारी या संबंधित सहा टेंडर्सना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, भांडुप, कल्याण, कोकण, बारामती, पुणे या भागात नवीन मीटर अदानी कंपनीकडून बसवण्यात येतील. हे सर्व मीटर्स स्मार्ट … Read more

महाराष्ट्रातील जनतेला शॉक!! आजपासून वीज बिलात वाढ होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 1 एप्रिल असून आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. मात्र आजच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. आजपासून वीज दर महाग झाले आहेत. त्यामुळे आजपासून दर महिन्याला वीज वापरासाठी तुम्हांला अधिक रक्कम भरावी लागणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजेच MERC ने 1 एप्रिल 2023 पासून नवीन दर … Read more

साताऱ्यात भाजपचे कंदील पेटवून लोडशेडिंग विरोधात निषेध आंदोलन

BJP Satara Candles March

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात महावितरण कडून वारंवार केल्या जात असलेल्या लोडशेडिंग विरोधात भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या वतीने सातारा येथील पोवई नाका परिसरात कंदील आणि मेणबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधही करण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. … Read more

लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांचा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके धामणेर गावच्या शेतकऱ्यांनी रहिमतपूर येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठाबाबत जाब विचारला. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या एक महिन्यापासून धामणेर गावातील शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्याचं जगणं मुश्किल झाले आहे. विजेचा कमी दाबाने वीज पुरवठा होत असून कधी … Read more

विद्युत महावितरण कंपनीच्या कृषी संजीवनी योजनेकडे दोन लाख शेतकर्‍यांनी फिरवली पाठ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कृषी पंपाची वाढत चाललेली थकबाकी कमी करण्यासाठी महावितरण कंपनीकडून कृषी संजीवनी योजना राबविण्यात आली. शेतकर्‍यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्तीसाठी जुन्या थकबाकीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली होती. जिल्ह्यात दोन लाख 40 हजार कृषीपंप ग्राहक आहेत, त्यापैकी केवळ 36 हजार 795 शेतकर्‍यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख शेतकर्‍यांनी योजनेकडे पाठ फिरवली असल्याचे … Read more

वाईत महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

कराड प्रतिनिधी । शुभम बोडके केंद्र सरकारने महावितरणचा खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात देशभरातील विविध संघटनांनी कालपासून संप सुरु केला आहे. या संपात वाई तालुक्यातील महावितरणमधील कंत्राटी अधिकारी तसेच कामगारही सहभागी झाले असून त्यांनी आज दुसऱ्या दिवशी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. कालपासून केल्या जात असलेल्या देशव्यापी … Read more

साताऱ्यात महावितरण कंत्राटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार निदर्शने

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके आजपासून केंद्र वि राज्य सरकारच्या विरोधात महावितरणच्या संघटनाच्यावतीने दोन दिवसीय आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने तसेच कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या वतीने महावितरण सातारा मंडल कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत मार्गदर्शनही करण्यात आले. “केंद्र … Read more

विट्यात महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा, महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध शेतकरी आक्रमक

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट करणे तसेच मुख्य डीपी बंद करणे तसेच दिवसा वीजपुरवठा न करता रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू ठेवणे, असा महावितरणच्या अन्यायकारक भूमिकेविरोधात महावितरणच्या कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी धडक मोर्चा काढला. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या वीज कनेक्शन संदर्भात अनेक तक्रारी आहेत. शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट करणे … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज बिलासंदर्भात आक्रमक पवित्रा घेत इस्लामपुरातील वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन पुकारले होते. तासभराच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांची वीज पूर्ववत सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन … Read more

शेतकरी आंदोलनाचा उडाला भडका, संतप्त शेतकऱ्यांनी पेटवले महावितरणचे कार्यालय

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यातूनच सांगली जिल्ह्यातील कासबेडीग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले. ही घटना सोमवारी पहाटे घडली. आंदोलनाची तीव्रता वाढत असून शासनाने तत्काळ दखल … Read more