वंचित च्या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई । अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून राजीनामा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हा रीतसर पक्ष प्रवेश झाला आहे. मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असतानाच हे राजकीय वादळ ही … Read more

जवळपास अडीच महिन्यांनी टीव्ही कोरोना मुक्त झाला – संजय राऊत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  गेले अनेक दिवस देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्या, कोरोनामुळे होणारे मृत्यू, कोरोना उपचार, कोरोनासंबंधी राजकीय लोकांचे आरोप-प्रत्यारोप, कोरोना बचावासाठीचे उपाय, दक्षता असे अनेक विषय माध्यमांमधून झळकत आहेत. टीव्ही लावला असता टीव्ही वर सतत कोरोनाचे अपडेट्स दिले जात आहेत. आज मात्र या बातम्यांची जागा ‘निसर्ग’ चक्रीवादळाने घेतली आहे. सकाळपासून टीव्हीवर … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळापासून बचावासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला ‘या’ विशेष सूचना

मुंबई । ‘निसर्ग’ चक्रीवादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले आहे. हळूहळू ते किनारपट्टीकडे सरकत आहे. ते भूपृष्ठावर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने बचावासाठी काय केले काय नाही याची यादी जाहीर केली आहे. घराबाहेर असलेल्या सैल वस्तू  बांधा किंवा घरात हलवा, महत्वाचे दस्तऐवज आणि दागदागिने प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा, बॅटरीवर चालणाऱ्या तसेच राखीव … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळाची रायगड किनारपट्टीकडे वेगवान कूच 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. या वादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले असून  खात्याने सॅटेलाईट द्वारे काढलेले छायाचित्र प्रसिद्ध  केले आहे. हे वादळ हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे ताशी ११० ते १२० किमी वेगाने रायगड च्या किनारपट्टीवर दुपारी १ ते ४ च्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.  भूपृष्ठावर आल्यानंतर … Read more

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खडखडीत सवाल; म्हणाले…

मुंबई । राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मुंबईत निदान होते आहे. तसेच अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. या रुग्णांच्या मुतदेहांना पीएफआय या संघटनेला देण्याचा निर्णय १८ मे रोजी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशविरोधी कृत्य करणाऱ्या पीएफआय ला काम देणे कितपत योग्य? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना विचारला आहे. १८ मे रोजी काढण्यात … Read more

लाॅकडाउनमध्ये ‘ही’ अभिनेत्री युट्यूबवरुन देतेय मुंबईतील घडामोडींचे अपडेट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतभरात संचारबंदीमुळे सर्व जण घरामध्ये बसून आहेत. चित्रपट, मालिका यांचे शूटिंग बंद आहे तसेच मालिकांचे जुने भाग पुप्रक्षेपीत केले जात आहेत. काही सेलिब्रिटी मात्र विविध व्हिडीओ बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सोबत मुंबईतील घडामोडींचे अपडेट्स देते आहे. असे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. आर्या वोरा या अभिनेत्रीने स्वतःचे … Read more

परीक्षा रद्द पण बॅकलाॅग राहिलेल्यांचे काय? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं काय हा प्रश्न आता मिटला आहे. त्याबाबत परीक्षा रद्द केल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि मागील परीक्षांमधील गुंणानुसार श्रेणी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे मागील परीक्षेत विषय राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्न अद्याप शासनाने सोडविला नाही. … Read more

निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांना धोका? जाणुन घ्य‍ा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात आणि लक्षद्विपजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची भीती होती. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे जे चक्रीवादळ निर्माण होईल त्याला … Read more

निसर्ग चक्रीवादळाची भीती: मुंबईसह इतर भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात 

वृत्तसंस्था। अरबी समुद्रात ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी दिली होती. केरळ किनारपट्टीवरचा कमी दाबाचा पट्टा ज्यावर महाराष्ट्रातील मान्सून अवलंबून होता. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होता. या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे गेल्या १०४ … Read more

सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा; शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरु

मुंबई । भाषिक तत्त्वानुसार मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. या भाषेनेच राज्याला सांस्कृतिक, सामाजिक ओळख निर्माण करून दिली आहे. म्हणून या भाषेचे जतन तसेच विकास करणे ही शासनाची जबाबदारी आहे. यादृष्टीने राज्य शासनाने राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये किमान इयत्ता ८ वी पर्यंत मराठी भाषा अध्यापन व अध्ययन अनिवार्य व्हावे या दिशेने … Read more