नवाब मलिकांचा जामीन मंजूर; 17 महिन्यानंतर येणार तुरुंगाच्या बाहेर

navab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने वैद्यकीय आधारावर नवाब मलिक यांना दोन महिन्यांच्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य म्हणजे, ईडीनेही नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यामुळे ते 17 महिन्यांनंतर तुरुंगाच्या … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला बेवकूफ बनवू नये; मुस्लिम आरक्षणावरून खासदार जलील आक्रमक

Imtyaj jalil

औरंगाबाद – केंद्र सरकार जोपर्यंत आरक्षरणासाठीचा कोटा वाढवत नाही, तोपर्यंत मुस्लिम समाजाला आरक्षण देणे कठीण आहे, असे वक्तव्य राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले. मलिक यांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आधी मुस्लिमांना बेवकूफ बनवणे सोडून द्यावे. सरकारने मनात आणलं तर एका दिवसात आरक्षण देऊ … Read more

नवाब मलिकांवर ॲट्रॉसिटी दाखल करा

nawab malik

औरंगाबाद – राज्याचे अल्पसंख्यांक आणि वफ्फ मंत्री नवाब मलिक यांच्यावर ॲट्रोसिटी दाखल करण्यात यावी, असा तक्रार अर्ज डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांनी काल विशेष सत्र न्यायाधीश एस के कुलकर्णी यांच्या न्यायालयात केला आहे. वानखेडे व त्यांच्या परीवाराला विरुद्ध नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांवर वक्तव्य केले होते. समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई यांनी नवाब … Read more

ईडीच्या कारवाईला घाबरत नाही, ईडी आली तर..; मलिकांचं खुलं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ईडीच्यावतीने पुन्हा कारवाईचा धडाका सुरु करण्यात आलेला आहे. दरम्यान ईडीच्यावतीने आज ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट ईडीवर निशाणा साधला. “काहीजण म्हणत आहेत कि मलिक यांच्या घराजवळ ईडी येणार आहे. त्यांना एवढंच सांगतो कि, माझ्या घरापर्यंत ईडी आली तर आम्ही स्वागत करू, असे खुले … Read more

देवेंद्र फडणवीस लेखी माफी मागा, अन्यथा…; निलोफर मलिक खान यांची कायदेशीर नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून मलिक यांची कन्या व समीर खान यांची पत्नी निलोफर मलिक खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना आता कायदेशीर नोटीस पाठवले आहे. “आपल्या पतीवर केलेला आरोप चुकीचा असून अब्रू नुकसानीची दावा करत आहे. त्यामुळे … Read more

…तर मग घाबरता कशाला?; निलोफर खान यांचा अमृता फडणवीसांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला जात असल्याने यावरून फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मलिक यांच्यावर टीका केली होती. अमृता फडणवीस यांच्या टीकेला मलिक यांची कन्या निलोफर मलिक खान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “सत्य तुमच्या बाजूने आहे तर घाबरता कशाला? असा … Read more

क्रांती चौकात नवाब मालिकांचा पुतळा जाळला; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

bjp

औरंगाबाद – नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरु आहेत. औरंगाबादमध्येही नवाब मलिक यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. भाजपचे शेकडो कार्यकर्ते आज क्रांती चौकात दाखल झाले. त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. औरंगाबादमधील भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करताचा मलिक यांचा पुतळा जाळला. … Read more

नवाब मलिकांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करा; समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांचे मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अर्ज

sameer wankhede

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपांचे प्रकरण आता औरंगाबाद येथे येऊन पोहोचले आहे. समीर वानखेडे यांच्या हत्या गुंफाबाई भालेराव यांनी नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या जातीवर टिप्पणी केल्याने आमची समाजात नातेवाईकांमध्ये बदनामी होत असून प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मलिक … Read more

अजितदादांच्या नावे दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन कारवाईचे कारस्थान; नवाब मलिकांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली. या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवरनिशाण साधला आहे. राज्यात आघाडी सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे. अशात केंद्रसरकार सत्तेचा गैरवापर करुन राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्याची मालमत्ता जप्त करून … Read more

जावयावरील कारवाईमुळेच मलिकांकडून वानखेडेंवर बेछूट आरोप – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर आरोप केले जात आहेत. याबाबत वानखेडे यांची पत्नी तथा अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. “नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्याविरोधात टीका केली जात आहे. त्यामागचे खरे कारण मलिकांचा जावई 8 महिने तुरुंगात … Read more