फाशी देण्यापूर्वी विचारल्या जाणाऱ्या इच्छेवर, निर्भयाचे दोषी म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील निर्भयाच्या चारही दोषींना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून निर्भयाची आई गेली सात वर्षे सातत्याने कोर्टात भांडत होती. दोषींना फाशी मिळावी म्ह्णून त्यांनी न्यायालयीन लढाई लढली. या लढाईला अखेर यश येत ७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवावे … Read more

निर्भया प्रकरण: दोषी मुकेशचा फाशी टाळण्यासाठी आणखी एक कांगावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निर्भया सामूहिक बलात्कार खून प्रकरणातील दोषी मुकेश सिंग यांनी आता दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. घटनेच्या वेळी दिल्लीत नसल्याची मुकेशची याचिका खालच्या कोर्टाने याचिका फेटाळली होती. आता मुकेशने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून खालच्या कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. मुकेशने दावा केला आहे की 16 डिसेंबर 2012 रोजी तो दिल्लीत नव्हता. … Read more

फायनल! निर्भयाच्या दोषींना २० मार्चला फाशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येईल. याबाबतचा नवीन डेथ वारंट जारी न्यायालयाने जारी केला आहे. पवन गुप्ता, अक्षय ठाकरू, विनय शर्मा आणि मुकेश या चारही जणांना फासावर लटकावण्यात येणार आहे. त्यापूर्वी कोर्टाच्या नियमानुसार सर्व दोषी आपापल्या वकिलांची भेट घेऊ शकतील. निर्भया प्रकरणातील … Read more

निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली; आता तरी फाशी होणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका केली होती. ही याचिका राष्टपतींनी फेटाळून लावली आहे. दोषींच्या दया याचिकांमुळं आतापर्यंत ३ वेळा दोषींची फाशी लांबवणीवर पडली आहे. त्यामुळं आता अजूनही न्यायाच्या उंबरठ्यावरच असलेल्या निर्भयाला आता तरी न्याय मिळणार का हा सवाल … Read more

निर्भयाच्या आईचा आक्रोश; म्हणाली ‘हा अन्याय आहे, कोर्ट आरोपींना आणखी किती वेळ देणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केंद्र सरकारच्या वतीनं दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकणातील चौघा नराधमांना फाशी देण्याची तारीख द्यावी अशी याचिका दाखल केली आहे. आज याचिकेवर सुनावणी करताना आरोपींना जोपर्यंत जगण्याचा अधिकार आहे तो पर्यंत जगू द्यावं असं सांगत न्यायालयाने फाशीची तारीख देण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे आजही या नराधमांना फाशी कधी होणार … Read more

‘अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात!’ कंगना राणावतने घेतला इंदिरा जयसिंग यांच्याशी ‘पंगा’

निर्भयाच्या आईने निर्भयाच्या बाबतीत जे काही घडलं ते विसरुन जायला पाहिजे, तिच्या अत्याचाऱ्यांना माफ करायला पाहिजे जसं सोनिया गांधी यांनी राजीव गांधींच्या खुनानंतर खुन्यांना माफ केलं होतं असं वादग्रस्त विधान सरकारी वकील इंदिरा जयसिंग यांनी केलं होतं. त्यावर अभिनेत्री कंगना रणावतने टीकेची झोड उठवली आहे. पंगा या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी कंगना बोलत होती.

इंदिरा जयसिंह यांच्या सल्ल्यावर निर्भयाच्या आईने सुनावले खडे बोल

निर्भयाच्या आईनं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं अनुकरण करून दोषींना माफ करावं, असा अजब सल्ला ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी आशा देवी यांना दिला होता. त्यावर आशादेवी चांगल्याच भडकल्या. तुमच्या सारख्यांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही. अशा शब्दांत निर्भयाच्या आईने इंदिरा जयसिंह यांना खडे बोल सुनावत राग व्यक्त केला आहे. 

निर्भया प्रकरण: दोषी पवन कुमारची सुप्रीम कोर्टात धाव; ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला कायम

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याचा दयेचा अर्ज शुक्रवारी राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर त्याने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळं या गंभीर प्रकरणातील तारीख पे तारीखचा सिलसिला अजूनही कायम आहे. गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन असल्याचा दावा करत पवन याने स्पेशल लीव पिटीशन (एसएलपी) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

निर्भया सामूहिक बलात्कारः राष्ट्रपतींनी दोषीची दया याचिका फेटाळली

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या चार दोषींपैकी मुकेश सिंगने काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाने निर्भया प्रकरणातील एका आरोपीची दया याचिका शुक्रवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडे पाठविली मंत्रालयाने ही याचिका नाकारण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली होती. त्यावर आज निर्णय घेत राष्ट्रपती राम नाथ कोविंद मुकेश याची दया याचिका फेटाळली आहे.