देशभरात NRC लागू करण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही; केंद्रीय गृहमंत्रालयाची संसदेत माहिती

संसदेत सुधारित नागरिकत्व विधेयक मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वारंवार सरकार आधी नागरिकत्व कायदा आणणार आणि त्यानंतर एनआरसी असं सांगितलं होतं. यानंतर देशभरात तसंच अनेक विद्यापीठांमध्ये आंदोलन सुरु झालं होतं. दिल्ली आणि इतर काही भागांमध्ये गेल्या महिन्यापासून सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरु आहे. देशभर एनआरसी लागू करण्याबाबत अनिश्चितता असतांना आज लोकसभेत गृहमंत्रायाने याबाबत लेखी उत्तर दिलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवकसंघावर कायदेशीर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्या!- राजरत्न आंबेडकर

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे संविधान वाचवण्यासाठी मागील ६ वर्षापासून मी देशात व विदेशात लढत आहे. जर देशाचे संविधान वाचले तरच हा देश शांततेत राहिल, त्यासाठी केंद्राच्या सत्तेतुन फक्त नरेंद्र मोदी व अमित शाहांना हटवून चालणार नाही तर या पाठीमागे असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायदेशीर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी संविधान प्रिय सर्व जाती, … Read more

जामिया विद्यापीठाजवळ अज्ञात माथेफिरू युवकाकडून मोर्चेकऱ्यांवर गोळीबार; विद्यार्थी जखमी

दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळ अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला असून, या गोळीबारात विद्यार्थी एक जखमी झाला आहे. नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राजघाटकडे मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान एका माथेफिरू युवकाने गोळीबार केला, अशी माहिती मिळाली आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असून गोळीबार करणाऱ्या संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  

शाहीन बागेत आंदोलन करणारे पाकिस्तानी आणि बांगलादेशी- भाजप खासदार राहुल सिन्हा

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू झाली आहे. एकीकडे मतदानाची तारीख जवळ येत आहे, तर दुसरीकडे नेत्यांच्या जीभा सारख्या घसरू लागल्या आहेत. असंच एक वादग्रस्त वक्तव्य भाजपाच्या नेत्यानं केलं आहे. “दिल्लीतील शाहीन बागेत सीएए, एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात बहुतांश लोक पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहे,” भाजपाचे नेते खासदार राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील, विश्वजित कदमांवर गुन्हा दाखल करा! सांगली भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांत धाव

एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात सांगलीमध्ये २५ जानेवारी रोजी भाजप वगळता काढण्यात आलेल्या सर्व पक्षीय मोर्चामध्ये जलसंदमंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज थेट जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीकरत शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्याकडे तक्रार दाखल केली.

”मी CAA ला समर्थन दिलेलं नाही”- राज ठाकरे

मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी घुसखोरांना हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.मात्र, आता राज यांनी याबाबत आता नवीन खुलासा करत मी सीएएला कधीही समर्थन दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे.

CAA विरोधात ठराव मंजूर करणारे पश्चिम बंगाल ठरले पाचवे राज्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोलकाता केरळ, पंजाब आणि राजस्थानानंतर आता पश्चिम बंगाल सरकारने नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात प्रस्ताव पास केला आहे. दरम्यान, सीएएविरोधातील ठरावावर ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत आपल्या भाषणात म्हटले आहे की, ‘क्षुल्लक मतभेद बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी एकत्र करण्याची वेळ आली आहे. सीएए हा लोकविरोधी आहे, हा कायदा त्वरित रद्द करावा. ममता बॅनर्जी … Read more

महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात अल्प प्रतिसाद, अनेक ठिकाणी दैनंदिन कामकाज सुरुच

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद मिळला.

बंदला परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद; CAAच्या विरोधात सर्वत्र निदर्शनं

वंचित बहुजन आघाडी व परिवर्तनवादी संघानेच्या वतीने, आज NRC आणि CAA ला विरोध करत पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला परभणी जिल्ह्यातही संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील काही भागात बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालूक्यांमध्ये बंदमुळे जनजीवन विस्कळीत आहे. आरोग्य सेवा वगळता सर्वच दुकाने यावेळी सकाळपासूनच बंद आहेत. रस्त्यावरही दुपारपर्यंत शुकशुकाट दिसत आहे.

भारत – ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान CAA, NRC विरोधात निदर्शने

हॅलो महाराष्ट्र टीम : भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सुधारीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. वानखेडे स्टेडियमवरील सामन्यादरम्यान काही प्रेक्षकांनी सीएएला विरोध केला. त्याचबरोबर निषेधाच्या भीतीमुळे काळ्या कपड्यांना बंदी घातल्याची माहितीही मिळाली आहे. पण सामन्यादरम्यान बरीच प्रेक्षक ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसले. स्टेडियममधील एका स्टँडमध्ये, काही प्रेक्षकांच्या टी शर्टवर … Read more