म्हणून मी अभाविप सोडली; अभिनेत्रीनं शेअर केला फेसबुकवर अनुभव

‘प्रिय मित्रांनो, एबीव्हीपी, आरएसएस, भाजपा किंवा कोणतेही हिंदू शक्ती प्रेमी.. मी तुमच्यापैकी अनेकांना समजू शकते. मी ही अशा कुटूंबातली आहे, ज्यातील मुलांना संघाच्या शाखेत पाठवण्याची प्रथा आहे.’

”बिहारमध्ये NRC राबविण्याचा प्रश्नच नाही” – नितीश कुमार

NRC ची चर्चा फक्त आसामशी संबंधित होती असं म्हणत त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NRC बद्दल केलेल्या विधानाचा आधार घेतला. त्यामुळे अमित शहा यांनी घेतलेल्या युटर्नला नितीश कुमारांकडून दुजोरा मिळाला आहे.

विरोधी पक्षांच्या बैठकीला ममता, मायावती गैरहजर, विरोधकांच्या एकीचे तीनतेरा

काँग्रेसने पुढाकार घेऊन नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी जनमत बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असताना ममता आणि मायावती मात्र त्यासाठी अनुकूल दिसत नाहीत.

सरकारच्या दमनशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे – शरद पवार

मुंबई । जेएनयूमध्ये जे घडले ते योग्य नव्हते, म्हणून त्याचा सर्वत्र विरोध होत आहे. लोक सरकारवर संतप्त आहेत म्हणून देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. सरकारी दडपशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई येथे आज शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदी … Read more

भाजपच्या आंदोलनात अभिनेत्री जुही चावला सहभागी; म्हणाली, कलाकार प्रतिक्रिया देण्याची घाई करतात

मुंबई | फ्री काश्मीर’च्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ मुंबईतील सावरकर स्मारकात भाजपने आयोजित केलेल्या आंदोलनात अभिनेत्री जुही चावला सहभागी झाली. कलाकार विषय समजून न घेता कुठल्याही विषयावर प्रतिक्रिया देण्याची घाई करतात, असं जुही माध्यमांशी बोलताना म्हणाली. मुंबई येथे जेएनयू येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात फ्री काश्मीर असे पोस्टर वापरले होते. त्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन आयोजित … Read more

CAA विरोधातील आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौरा रद्द

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ईशान्य भारतात होणारा तीव्र विरोध आजही कायम आहे. या विरोधाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुवाहाटी येथे खेलो इंडिया युथ गेम्सचे उदघाटन करण्यास जाणार होते मात्र मोदींचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. सध्याचे वातावरण पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी योग्य नाही, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. आसामधील … Read more

एनआरसी,सीएए कायद्याला विरोध करणारे देशद्रोही – संभाजी भिडे

नागरी सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी नागरी सुधारणा कायद्याला विरोध करणारे हे देशद्रोही आहेत अशी टीका संभाजी भिडे यांनी यावेळी बोलताना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार – मल्लिकार्जुन खर्गे

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. काँग्रेसच्या वतीने आज ‘भारत बचाओ-संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न … Read more

देशामध्ये अराजकता माजवण्याचा RSS, भाजपचा कट – प्रकाश आंबेडकर

मुंबई : NRC, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि NPR च्या माध्यमातून देशामध्ये अराजकता माजवण्याचा कट RSS, भाजपच्या सरकारने रचला असल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीने नागरिकत्व दुरुस्ती कायदा व NRC च्या विरोधात दादरमध्ये मोर्चाचे आयोजन केले होते. तेव्हा झालेल्या सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या … Read more