देशात कांदा २२ रुपये किलो दराने विकला जात आहे-केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

टीम हॅलो महाराष्ट्र । कांद्याच्या दराने गेल्या काही महिन्यापासून उचांक गाठला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या डिसेंबरमध्ये महागाई दरात वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीनुसार सांगण्यात आलं. दरम्यान कांद्याच्या वाढलेल्या दरापासून सामन्यांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारच्या वतीने आयात करण्यात आलेला कांदा नाफेड आणि राज्य सरकारांमार्फत विशेष स्टॉल लावून कमी किंमतीत कांदा विकला जात आहे. देशातील मागणी … Read more

कांदा दरवाढीचा भजी व्यापाऱ्यांवर देखील परिणाम; ग्राहकांची आवड पुरवणं हल्ली दुकानदारांना मुश्किल

कांदा भजी हा तसा महाराष्ट्रातील सर्व जनतेचा जिव्हाळ्याचा विषय. अन ते जरी भजी हे सोलापूरचे असतील तर त्यांची ‘बात काही औरच’! संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूर चे कांदा भजी हे विशेष प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून केवळ कांदा भजी खाण्यासाठी लोक सोलापुरात येत असतात. कांदा भाज्यांसहित भज्यांचे विविध प्रकारही येथील अनेक दुकानात उपलब्ध असतात. मात्र सर्वांच्या आवडीचे कांदा भजी सध्या ग्राहकांवर रुसल्याचे चित्र सोलापुरात पाहायला मिळत आहे. कांद्याचे दर मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात कांद्याचे भाव उतरले; १०० चा कांदा आला ५० ते ६० रुपयांवर

संपूर्ण देशाच्या बहुतांश भागात यंदा पावसाने उशिरापर्यंत जोरदार हजेरी लावली. तसेच उशिरा झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याचा सर्वात मोठा परिणाम कांद्याच्या उत्पनावर झाला. घाऊक बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. राज्याप्रमाणे औरंगाबाद मध्ये देखील कांद्याचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता काही प्रमाणात कांद्याचे दर झाल्याचे पाहण्यात येत आहे.

कांद्याची उणीव केंद्र सरकार लवकरच भरून काढणार; १२ हजार मेट्रिक टन कांदा करणार आयात

केंद्र सरकारने अतिरिक्त १२ हजार ६६० मेट्रिक टन कांदा आयातीसाठी करार केला आहे. हा कांदा २७ डिसेंबर पासून भारतात येण्यास सुरूवात होणार आहे. याचबरोबर आता आयात केल्या जाणाऱ्या एकुण कांद्याचे प्रमाण हे जवळपास ३० हजार मेट्रिक टन पर्यंत पोहचले आहे.ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून गुरूवारी ही माहिती देण्यात आली.

कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत तब्बल ११ हजार शेतकरी; सातबारावर नोंद नसल्याने अडचण

अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हाता तोंडाशी आलेले पीक गेल्याने त्यांचे कंबरडे मोडले. याचा परिणाम म्हणून आवक नसल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा राहिला त्यांना उच्चांकी भाव मिळाला. मात्र असंख्य शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. मात्र मागील वर्षी कांद्याचे उत्पादन चांगले आले होते.

ग्रामीण भागातील हॉटेलमधून कांदा भजी गायब! सर्वसामान्यांना कांद्याचे भाव सोसवेनात

मराठमोळ्या खाद्यपदार्थाच्या मांदियाळीत कांद्याची स्थान अनन्यसाधारण आहे. त्यात कांदा भजी कोणाला आवडत नाहीत ? असा अन्नपदार्थांची चव वाढवणारा कांदा काही दिवसापासून मात्र स्वयंपाक घरातील आपले स्थान ही गमावून बसला आहे. एरवी 15 ते 20 रुपये किलोप्रमाणे मिळणारा कांदा आता शंभरी पार केल्यामुळे हॉटेलमध्ये कांदा भजी व कांदा पोहे विकणे हॉटेल चालकांना परवडत नसल्यामुळे कांदा-भजी ग्रामीण भागातील हॉटेलमधून गायब झाली आहेत. तर सर्वसामान्यांनाही कांद्याचे भाव सोसवेनासे झाले आहेत.

कांद्याचे भाव तब्बल ५ हजारांनी घसरले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याला २० हजार रुपये देण्याची विक्रमी घोषणा केल्यानंतर शनिवारी जवळपास ५०० ते ७०० ट्रक कांदा बाजार समितीत दाखल झाला. मात्र हा कांदा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने कांद्याचा दर सरासरी ५ हजाराने कोसळला आहे. साठवणूक केलेला कांदा व्यापारी पुन्हा बाजारात आणत असल्याने आवक वाढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आज सरासरी कांदा ३ हजार ते १० हजार प्रति क्विंटल दराने गेला आहे.

देशातील सर्वात महाग कांदा सोलापुरमध्ये !

सोलापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्यातील नव्हे तर चक्क देशातील सर्वात उच्चांकी दर कांद्याला मिळाला आहे. सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याला चक्क २०,००० हजार रूपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. प्रति क्विंटल ला इतका दर मिळाल्यामुळे सर्वांच्या नजरा सध्या कृषी सोलापूरकडे वळल्या आहेत. कांद्याला मिळालेला आजवरचा हा विक्रमी दर आहे.

कांदे कमी खायला सांगणारं सरकार गेलेच पाहिजे – पी. चिदंबरम

कांद्याच्या भावाबाबत देशात खळबळ उडाली आहे, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे म्हणणे आहे की मी कांदा खात नाही. म्हणून मला काही फरक पडत नाही. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आक्रोश वाढला आहे. त्यामुळे १०६ दिवसांनंतर तुरूंगातून बाहेर आलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. पी. चिदंबरम म्हणतात की ज्या सरकारने कमी कांदा खाण्यास सांगितले आहे. ते सरकार गेले पाहिजे.