गर्लफ्रेंडने लग्नासाठी तगादा लावला; लिव्हइनमध्ये राहणार्‍या बाॅयफ्रेंडने खून करून मृतदेह भिंतीत गाडला

पालघर | माथेफिरू लोक काय आणि कसे कांड करतील याचा काही नेम नाही. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडत नसेल तर ते कुठल्याही थराला जाऊन ती गोष्ट मिटवण्याचा प्रयत्न करू शकतात. अशीच एक घटना पालघर येथील वानगाव मध्ये घडली आहे. येथील तीस वर्षाच्या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडचा ती लग्नाचा तगादा लावते म्हणून खून केला आणि तिचा मृतदेह … Read more

रस्त्याअभावी आदिवासी भोगतायत मरणयातना; रुग्णांना उपचारासाठी डोलीने 7 किमीचा डोंगर करावा लागतोय पार

पालघर प्रतिनिधी । संदीप साळवे राज्याची राजधानी मुबंईपासून 100 किमी अंतरावर आणि पालघर जिल्ह्यातील जव्हारपासून 25 ते 30 किमी अंतरावर डोंगर दरी खोऱ्यात वसलेले दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाड, मनमोहाडी भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे आजही नागरी सोयीसुविधांपासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्याची 70 वर्ष उलटूनही अद्याप या गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्याचा सामना करावा … Read more

खळबळजनक! पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी अटकेत असलेले ११ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

पालघर । पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकांच्या मॉब लिंचिंग प्रकरणी अटकेत असलेल्या आणखी ११ आरोपींना कोरोनाने गाठल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात अटकेत असलेल्या या सर्व आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, यातील ११ आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वाडा पोलीस ठाणे व बाजूलाच असलेले तहसीलदार … Read more

पालघर लिंचिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, राज्याला नोटीस

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील पालघर येथे हिंसक जमावाकडून दोन साधूंच्या हत्येच्या चौकशीची मागणी करण्याता आली आहे. साधुंच्या हत्याप्रकरणी सीबीआय किंवा एनआयएमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेनंतर आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारसह अन्य पक्षांना नोटीस बजावली आहे. सर्व पक्षांना जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात जबाब नोंदविण्यास सांगितले गेले … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळाची रायगड किनारपट्टीकडे वेगवान कूच 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. या वादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले असून  खात्याने सॅटेलाईट द्वारे काढलेले छायाचित्र प्रसिद्ध  केले आहे. हे वादळ हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे ताशी ११० ते १२० किमी वेगाने रायगड च्या किनारपट्टीवर दुपारी १ ते ४ च्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.  भूपृष्ठावर आल्यानंतर … Read more

पालघर हत्या प्रकरण सुप्रीम कोर्टात; राज्याला दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली । महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात गेल्या महिन्यात १६ एप्रिल रोजी दोन साधूंची आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमाकडून मारहाण व हत्या करण्यात आली होती. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहचलं आहे. एका याचिकेद्वारे या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्रात न होता दिल्लीत व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं या याचिकेची दखल घेत राज्य … Read more

धक्कादायक! पालघरनंतर उत्तर प्रदेशातही दोन साधूंची हत्या, मंदिरात झोपलेल्या अवस्थेत धारदार हत्यारानं हत्या

उत्तर प्रदेश । महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधुंची जमावाकडून झालेल्या हत्येची घटना ताजी असतांना उत्तर प्रदेशातही दोन साधुंची हत्या झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. बुलंदशहराच्या अनुपशहर भागात मंदिरात झोपलेल्या अवस्थेत २ साधुंची धारदार हत्यारानं हत्या करण्यात आली. ही हत्या गावातीलच एका नशेच्या आहारी गेलेल्या मुरारी नावाच्या तरुणानं केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची … Read more

ही घ्या यादी! पालघर घटनेत एकही मुस्लीम नव्हता- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । राज्यात करोनाचं मोठं संकट आहे. या संकटाचा एकजुटीने सामना करण्याचं सोडून काही लोक पालघरच्या घटनेचं जातीचं राजकारण करून मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत, असा असा चिमटा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांना काढला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटर लाइव्हवरून जनतेशी संवाद साधत पालघर मॉब लिंचिंग प्रकरणावर भाष्य केलं. पालघरमध्ये दोन साधूंची … Read more

पालघर प्रकरणात चंद्रकांतदादांची उडी म्हणाले,गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा द्या!

मुंबई । पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्हं निर्माण झाले असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून ही मागणी केली … Read more

पालघर घटनेचं कोणीही राजकारण करू नका; शरद पवारांनी दिला विरोधकांना दम

मुंबई । पालघरमध्ये झालेलं हत्यांकांड अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. अशी घटना घडायला नको होती. या घटनेचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. काही लोक आता या घटनेचं राजकारण करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं चित्रं निर्माण केलं जात असून हे चुकीचं आहे, असं सांगतानाच सध्याच्या परिस्थितीत नकारात्मकता कमी करणं आवश्यक आहे. तसेच पालघरच्या घटनेचं राजकारण … Read more