पुण्यात कोरोनाचा तिसरा बळी

पुणे प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात आत्तापर्यंत ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता पुण्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला असल्याची माहिती आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ६३५ वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत एकुण ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील एकट्या पुण्यात ८२ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आहेत. आज पुण्यातील ससुन … Read more

मुंबई ते गुलबर्गा | ५५० किलोमीटर अंतरावरील आपल्या लहान मुलांपर्यंत पोहचण्याचा बिगारी कामगारांचा प्रवास पुण्यातच थांबतो…तेव्हा…???

लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर रोजंदारीवर जगणाऱ्या अनेक बिगारी कामगारांची आबाळ झाली. अनेक मजूर रस्त्यावर आले. गुलबर्ग्याच्या बेनकीपली या गावातून ५ कुटुंब बांद्र्याच्या खेरवाडीमध्ये बिगारी कामासाठी आले होते. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांचे काम बंद पडले. त्यानंतर २ दिवस कसेबसे मुंब‍ईत काढून आपल्या गावाचा रस्ता पकडून ते चालत निघाले.

वडारवस्तीतील घरे जळाल्याने रस्त्यावर आलेल्या ४५ कुटुंबांना सरकारचे रेशन कधी मिळणार?

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असणार्‍या वडार वस्तीत १९ मार्चला अचानक लागलेल्या आगील ४५ कुटुंब घरा जळाल्याने रस्त्यावर आली. डोक्यावरचं छत्रच हरपल्याने यातील अनेकांसमोर जगण्यामरण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. आगीत सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याने सरकारी योजनांचा लाभ घ्यायला अडचणी येत आहेत. शासनाकडून अद्याप रेशन मिळालेले नसल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली … Read more

…आणि बार्टी संस्थेनं ५०० बेघरांना रोज जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला

लढा कोरोनाशी | कुणाल शिरसाठे कोरोना विषाणूंचा सामूहिक फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक-एक करून पाऊले उचलली आणि देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संचारबंदीची घोषणा केली. घराच्या बाहेर पडायचे नाही, सर्व कामे ठप्प आणि ज्यांचे पोट हातावर आहे त्यांचे तर जगणंच ठप्प. पण हे संकट जास्त वाढू द्यायचे नसेल तर ही पाऊले आपण टाकली … Read more

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता ३०२ वरुन ३२१ वर पोहोचला आहे. मुंबईत १६ तर पुण्यात २ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिथे जिथे कोरोनाचे पोझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत तो भाग बृहमुंबई महापालिकेकडून सील करण्यात आला आहे. तसेच मुंबईत … Read more

पुण्यात दुपारी ३ नंतर खाजगी वाहनांना रस्त्यावर यायला बंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे प्रतिनिधी | पुण्यात १४४ लागू आहे. पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही शहरातील अनेक भागांत लोक रस्त्यांवरुन फिरताना दिसत आहेत. यापार्श्वभुमीवर पुण्यात दुपारी ३ नंतर खाजगी वाहनांना रस्त्यावर यायला बंदी घालण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. Vehicle movement will be stopped completely in the evening … Read more

पुण्यात जमावबंदीला हरताल, रस्त्यांवर वाहनांची गर्दी

पुणे प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ७४ वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्रात सर्वत्र कलम १४४ लागू केल्याची घोषणा केली. घराबाहेर न पडण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. मात्र तरीही शासनाच्या जमाबंदी आदेशाला हरताल फासत पुणेकरांनी रस्त्यांवर गर्दी केली आहे. #पुणे : जमावबंदी असताना पुण्यातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी#HelloMaharashtra #COVIDー19 #COVID19outbreak #GoCoronaCoronaGo … Read more

खबरदारी! पुण्यातील सर्व रेस्तराँ, परमीट रूम, बार, क्लब ३१ मार्चपर्यंत बंदचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरवात केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हद्दीतील सर्व परमीट रूम, बार आणि रेस्टॉरंट, क्लब ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 तसेच … Read more