ट्विटरवर मुलीचा फोन नंबर मागणं तरुणाच्या आलं अंगलट; पुणे पोलिसांनी दिलं तरुणाला हे पुणेरी उत्तर

पोलिसांचे हे ट्विटर हँडेल बरेचदा नियम तोडणाऱ्यांना किंवा अपप्रकार करणाऱ्यांना मिश्कीलपणे समज देतात. असाच काहीसा अनुभव देणार पुणे पोलसांचे ट्विट सध्या व्हायरल झालं आहे.

महाराष्ट्र केसरी; इंदापूरच्या सागर मारकडची सुवर्ण कामगिरी, पुण्याचा अभिजीत कटके ६ सेकंदात चीतपट विजयी

पुणे प्रतिनिधी | ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज ६१ किलो वजनी गटातील माती विभागात पुणे जिल्हयाच्या सागर मारकडने व पुणे शहराचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या निखिल कदमवर चीतपटीने मात करीत सुवर्ण पदकावर कब्जा केला. सागर हा मारकड कुस्ती केंद्र, इंदापूर येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या … Read more

पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

पुणे प्रतिनिधी | यंदाची महाराष्ट्र केसरी विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुण्यात भरली आहे. म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवार पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे. पुणे शहरातील निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा दावेदार अभिजित कटके तर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत आदर्श गुंडची निवड झाली आहे. गतविजेता बाला रफिक शेखने निवड चाचणी पूर्ण केली … Read more

आमदार संग्राम थोपटेंना मंत्रिपद नाकारल्याचे तीव्र पडसाद; कार्यकर्त्यांकडून काँग्रेस भवनात तोडफोड

पुणे : काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी न दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड केली. आमदार संग्राम थोपटे यांना मंत्री पद मिळणार नाही हे स्पष्ट होताच काल काँग्रेस पक्षाचा फलक जाळून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. आज कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस भवनालाच लक्ष्य केले. काँग्रेस भवनातील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आहे. … Read more

 महिलांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा; पुणे विद्यापीठ व सातारा जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

स्त्री शिक्षणाचा पाय रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सातारा जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ व १८ डिसेंबर रोजी महिलांसाठी उद्योजगता प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा पार पडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील घटना

स्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनांची धडक बसून एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील पिंपरीपेंढारा गावात घडली आहे. हि घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

कल्पनेचे उद्योगधंद्यामध्ये रूपांतर करणे आवश्यक – डॉ. जेरे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व उपक्रम केंद्राद्वारे आयोजित क्लस्टर लेव्हल ‘इनोव्हेशन 2 एंटरप्राईज’ (आय २ ई) स्पर्धेचे उद्घाटन केंद्र सरकारच्या मानव विकास मंत्रालयाचे चीफ इनोव्हेशन ऑफीसर डॉ. अभय जेरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

अखेर फिरोदिया करंडक साठी विषय निवडीचे निर्बंध मागे

स्पर्धेच्या आयोजकांकडून जात, धर्म व्यवस्था, काश्मीर ३७०, भारत-पाक, हिंदू-मुस्लीम, राम मंदिर-बाबरी मशीद या विषयांवर एकांकिका सादर न करण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. 

चिखलीत पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या गस्तीवर प्रश्न चिन्ह

एटीएम फोडण्याचे दोन प्रकार उघडकीस आल्यानंतर, सर्व पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी एटीएम सेंटरची पाहणी करण्यासाठी संयुक्त पथक नियुक्त केले. मात्र तरी देखील शहरात सहा एटीएम फोडण्याचे प्रकार घडले आहेत. 

मुलीच्या लग्नाच्या आदल्यादिवशी बापाचं घर जळून खाक; लग्नाच्या साहित्याची झाली राख

अवघ्यां २ दिवसांवर मुलीचे लग्न आल्याने सयाजी मधे यांनी सर्व साहित्य खरेदी करून घरात आणून ठेवले आणि नियतीने घाला घातला. या लागलेल्या आगीत लग्नाचे सर्व साहित्य जाळून खाक झाले आहे.