आता आळंदीही कंटेन्मेंट झोन म्हणुन जाहीर; वारकर्‍यांत चिंता

पुणे । संत ज्ञानेश्वर यांचे समाधीस्थळ अर्थात आळंदी हे तीर्थक्षेत्र होय. आळंदी येथे कोरोनाने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वरांच्या पादुकांच्या प्रस्थान सोहळ्याला आता दोनच दिवस राहिले आहेत. दिनांक १३ जुनला ज्येष्ठ वद्य अष्टमीला हा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीतही धर्मशाळा, मठ आणि लॉजमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यात आला आहे. … Read more

पुणे जिल्ह्यात दिवसभरात १७६ रुग्ण

पुणे । पुणे जिल्ह्यात आज दिवसभरत १७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यात एकूण ७ हजार २६५ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. ही माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मिळून इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे नियम शिथिल केले असले तरी प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाय राबविले जात … Read more

पुण्यात पुढचे २४ तास काळजीचे; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पुणे । गेले दोन दिवस चर्चेत असणारे ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ आज महाराष्ट्रात येऊन धडकले आहे. अरबी समुद्रातून आलेले हे चक्रीवादळ आज दुपारी महाराष्ट्रातील अलिबाग पासून ५० किमी असणाऱ्या किनारपट्टीवर धडकले. शहर आणि परिसरात गेल्या २४ तासात संथ सारी कोसळत आहेत. दुपारी जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. पुढच्या २४ तासात वादळी वाऱ्यासह संततधार कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान … Read more

पुणेकरांनो लाॅकडाउनमध्ये घरमालकांवर गुन्हे दाखल करताय? हे वाचा

पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन … Read more

धक्कादायक! पुण्यात दूध डेअरी मालकासह ११ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

पुणे । पुण्यातील हडपसर येथे एका प्रसिद्ध दूध डेअरीच्या मालकासह तेथील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे मगरपट्टा व हडपसर परिसरात एकच खळबळ पसरली आहे. सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. मागील ४ दिवसांपासून संबंधित डेअरीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानं डेअरीच्या मालकासह ११ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात … Read more

सत्यशील शेरकर यांनी बंदूक दाखवून माती चाटायला लावली; तरुणाचा गंभीर आरोप

पुणे । जिल्ह्यातील ओझर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना माझे काम बोचत असून ते बंद करण्यासाठी यांनी मला बंगल्यावर बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथे मनोरुग्णांसाठी संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या अक्षय मोहन बोऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काहीतरी चांगले काम करता … Read more

अजित दादांचं सगळीकडे बारकाईनं लक्ष असतं; रोहित पवारांकडून काकांचे कौतुक

पुणे । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे त्यांच्या तडफदार स्वभावामुळे सर्वांनाच परिचित आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या संदर्भातील अनुभवाचे एक ट्विट केले आहे. ज्याला मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री कोरोना काळात सतत विविध बैठका घेऊन आढावा घेत आहेत. विविध उपाययोजनांसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. याबाबतीतच रोहित पवार … Read more

शाळा सुरु कधी होणार? शिक्षण आयुक्त म्हणतात…

पुणे । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राने देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. याला आता दोन महिने उलटून गेले आहेत. संचारबंदीत सर्व उद्योग व्यासायांसोबत, शाळा, महाविद्यालये तसेच उत्तर शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात १५ जून पासून शाळा सुरु होतील अशा चर्चा होत्या. मात्र महाराष्ट्राची सद्यस्थिती संक्रमणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असली … Read more

पुण्यातील मार्केट यार्ड सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

पुणे । पुणे मार्केट यार्डमधील भुसार बाजार हा संचारबंदी जाहीर झाल्यानंतरही सुरु होता. मात्र येथील काही व्यापाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने बाजार प्रशासनाने काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे बाजार बंद ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठक घेऊन तातडीने बाजार सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. बाजार प्रशासकांनी यावर विचार करून निर्णय घेऊन … Read more

पुणे जिल्ह्यातील ‘हि’ गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर; पहा यादी

पुणे । पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पुण्यातील वातावरण चिंतादायक झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने महत्वाचे काही निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येकास विलगीकरणात ठेवणे, सामाजिक अलगाव च्या नियमांचे पालन करणे इत्यादींचा समावेश आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्यातील ११ तालुक्यातील काही गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत. … Read more