पाचगणीत वीज पडली अन् मालक बचावले परंतु 3 घोडे जागीच ठार

Lightning strikes

पाचगणी | विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे झाडाच्या आडोश्याला थांबलेल्या घोड्यांवर वीज पडून तीन घोडी जागीच ठार झालीत. ही घटना पाचगणी टेबल लँन्ड पठारावर दुपारच्या सुमारास घडली. यावेळी सुदैवाने घोडे व्यावसायिक झाडापासून दूर असल्याने बचावले. परंतु घोड्याच्या मृत्यूमुळे घोडे मालक हवालदिल झाले होते. पाचगणी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून … Read more

फलटण- बारामती मार्गावर पूरात कार वाहून गेली : बापलेकीचा गुदमरून मृत्यू

Car Washed Flood

फटलण | फलटण शहर व तालुक्याला काल मध्यरात्री मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. फलटण- बारामती या मार्गावर सोमंथळी गावाच्या नजीक ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. या कारमध्ये असलेल्या बापलेकीचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेत छगन उत्तम मदने (वय- 38) व त्यांची मुलगी प्रांजल छगन मध्ये (वय- 12, रा. वारुगड, ता. माण) … Read more

कोयना धरणाचे दरवाजे चाैथ्यांदा उघडले : परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण क्षेत्रात काल सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आज सकाळी 8 वाजता धरणातून 2 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून 3 हजार 154 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या धरणात 104.90 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. तर पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. चालू वर्षात कोयना धरण … Read more

सातारा जिल्ह्यात सकाळपासून अनेक भागात पावसाला सुरूवात

सातारा | सातारा जिल्ह्यात आज गुरूवारी दि. 29 रोजी सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर माण, कोरेगाव, सातारा, खटाव व फलटण तालुक्यातील काही ठिकाणी मध्यम, तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. नवरात्र उत्सव सुरू असून पावसाचाही अंदाज वर्तविला असल्याने दांडिया खेळण्याचा हिरमोड होवू शकतो. आज … Read more

कोयना धरण 100 टक्के भरले, पाणी सोडले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण अखेर 100 टक्के भरले असून आज दुपारी 2 वाजता धरणातून 6 वक्र दरवाजे 1 फुट उघडून 9 हजार 463 क्युसेक्स विसर्ग सोडणेत आले आहे. सध्या धरणात 105.25 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. कराड व पाटण तालुक्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाने शंभरी गाठली … Read more

कोयना धरण भरले : तांबवे व निसरे बंधारे पाण्याखाली तर मूळगाव पुलाला पाणी टेकले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण अखेर भरले असून सध्या धरणातून 42 हजार 331 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात 105.03 इतका टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 44 हजार 966 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. काल शुक्रवारी सकाळी 10 वाजता 42 हजार 331 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोयना व … Read more

नदीकाठी सावधान : कोयना धरणातून 3 दिवसात चाैथ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढणार

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 104.71 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 29 हजार 24 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. काल गुरूवारी रात्री 11 वाजता धरणातून 27 हजार 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला होता. आता यामध्ये वाढ … Read more

केळघर घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मेढा- महाबळेश्वर दरम्यान असलेल्या केळघर घाटात आज गुरूवारी दि. 15 रोजी पहाटे दरड कोसळली. त्यामुळे काही प्रमाणात घाटात वाहतूक ठप्प झाले होती. मात्र स्थानिक व वाहन चालकांनी कोसळलेली दरड व छोटे दगड हाताने बाजूला करत दुचाकी वाहतूक सुरू केली आहे. मात्र, अद्याप या रस्त्यावर मोठ- मोठे दगड हलविण्यासाठी कोणीही पोहचलेले … Read more

कोयना, कृष्णा नदीकाठी सावधान : धरणातून 32 हजार 581 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 103. 84 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 38 हजार 10 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. काल कोयना धरणातून 13 हजार 941 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला होता. आता यामध्ये वाढ करून 32 … Read more

कोयनेला पाऊस वाढला : धरणाचे आज दुसऱ्यांदा दरवाजे उचलणार

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे आज मंगळवारी धरणात 101.57 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 8 हजार 573 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तर आज मंगळवारी दि. 13 रोजी दुपारी 2 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रदरवाजे … Read more