अमित ठाकरे यांच्यावर मनसेने सोपवली ‘हि’ मोठी जबाबदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील राजकारणात आता माणसेही सक्रिय झालेली पहायला मिळत आहे. त्यात आता आगामी काळात मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने मोठा निर्णय घेतला असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. अमित ठाकरे यांची निवड महाराष्ट्र … Read more

मनसेचा वर्धापनदिन प्रथमच मुंबईबाहेर; ‘या’ शहरात पार पडणार सोहळा

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे अर्थातच मनसेचा 16 वा वर्धापनदिन मुंबईत नसून पुण्यात साजरा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यंदा पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात मनसेचा वर्धापन दिन सोहळा होईल. या सोहळ्याला मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती आहे. मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदाच … Read more

मनसेच्या शिवजयंती कार्यक्रमावेळी स्टेज कोसळले; राज ठाकरे सुखरूप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवजयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते साकीनाका तसेच गोरेगाव येथील येथे मनसे शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोरेगाव येथील कार्यक्रमावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना अचानक कार्यक्रमाचे स्टेज कोसळले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून राज ठाकरे सुखरूप बचावले आहेत. शिवजयंतीनिमित्त मुंबईतील गोरेगाव परिसरातील साकीनाका येथे … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी – राज ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवजयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते साकीनाका येथे मनसे शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी महत्वाचे विधान केले. “मी हारतुरे घालायला आलो नाही. आज शिवजयंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवजयंती तिथीने साजरी करते. याचा अर्थ आज शिवजयंती साजरी करायची असे नाही. आपल्या छत्रपतींचा जयजयकार आणि जयंती 365 दिवस साजरी केली पाहिजे .मनसे म्हणून आपण शिवजयंती साजरी करतो,” असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

शिवजयंतीनिमित्त मुंबईतील साकीनाका येथे मनसेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, आजही शिवजयंती सर्वत्र साजरी केली जाते. आपल्या शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी, अशी आम्ही मागणी आहे. महाराजांची जयंती आजही साजरी केली तरी काही हरकत नाही. तिथीनं का साजरी करावी याचे कारण आपल्याकडे जेवढे सण येतात हे सर्व तिथीने साजरे करतो.

आपल्याकडील इतर सणही आपण तिथीने साजरे करतो, दिवाळी आणि गणपती वेगवेगळ्या दिवशी साजरी करतो. महापुरुषांचा जन्मदिवस हा आपल्यासाठी सण, तिथी प्रमाणेच आहे. त्यामुळे जल्लोषात शिवजयंती साजरी करुयात, असे ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट; मुंबईतील बॅनरने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक बॅनर ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईतील घाटकोपर येथे राज ठाकरेंचा भलामोठा बॅनर उभा करत त्यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला आहे. विशेष म्हणजे हिंदुहृदयसम्राट हे फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनाच म्हंटल जात होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या या बॅनर वरून शिवसेना काय प्रत्युत्तर … Read more

आम्ही किंगमेकर नाही, किंग बनणार; बाळा नांदगावकर यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्यावतीने आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठे विधान केले आहे. आम्ही किंगमेकर नाही किंग बनणार आहोत, असे विधान नांदगावकर यांनी केले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी … Read more

लतादीदींची तब्बेत खालावताच राज ठाकरे ‘ब्रीच कॅंडी’त दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना आणि न्यूमोनिया याची एकत्र लागण झालेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. याच दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने ब्रीच कॅंडीत रुग्णालयात दाखल झाले आहे. राज ठाकरे आणि मंगेशकर कुटुंब यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामूळेच लता दीदींची तब्बेत खालावताच … Read more

महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत महापालिका निवडणुकीच्या कामाला लागावे. मनसैनिकांनी युतीच्या चर्चेत पडू नये. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश ठाकरे यांनी यावेळी दिले. मुंबईत आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. … Read more

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महानगरपालिकेतील नवी वॉर्डरचना जाहीर झाल्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. मुंबईसह इतर ठिकाणी असलेल्या महापालिकांच्या प्रभागरचना जाहीर … Read more

संजय राऊतांना आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?; मनसे नेत्याची टीका

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकावर टीका केली जाऊ लागली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. त्यांच्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यशिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर टीका केली. मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर कोरोनाच्या काळात टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या … Read more