राज ठाकरेंशी संवाद साधण्यास उद्धव ठाकरेंनी दाखवली तयारी?; चर्चांणा उधाण

raj thackray uddhav thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात पक्षांमध्ये फुटाफुटी सुरू असताना दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीत दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा पार पडणार आहे. कारण, आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत याविषयावर चर्चा … Read more

ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी मनसेचे हॉर्न वाजवा आंदोलन

मुंबई । कोरोना संकट आणि त्यात लॉकडाऊमुळे डबघाईला आलेल्या वाहतूक व्यवसायाला पुन्हा उभारी मिळावी यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेने दंड थोपटले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरुन एका अभिनव आंदोलनाने राज्य सरकारला जागे करायचे आहे. शुक्रवार १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने फक्त १ मिनिट हॉर्न … Read more

कॉमेडियन कुणाल कामराने राज ठाकरेंना ‘वडापावची’ लाच देऊ केली; जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा नेहमीच आपल्या विनोदी उचपात्यांमुळं नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर कुणाल आपल्या शेरेबाजीतून तर कधी मिम्सच्या माध्यमातून अनेकांशी पंगा घेत असतो. याचबरोबर आपल्या ‘ Shut Up Ya Kunal’ या युट्यूबवरील टॉक शोमध्ये तो पाहुण्यांना बोलावून त्याची नेहमीच टांग खेचण्याचा प्रयन्त करताना दिसतो तर पाहुणेही त्याच्या शो दरम्यान एन्जॉय करताना … Read more

”मी CAA ला समर्थन दिलेलं नाही”- राज ठाकरे

मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी घुसखोरांना हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.मात्र, आता राज यांनी याबाबत आता नवीन खुलासा करत मी सीएएला कधीही समर्थन दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे.

झेंड्यावर राजमुद्रा वापरल्यामुळे संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंच्या विरोधात सोनपेठ पोलिसांत तक्रार

मनसेच्या नव्या झेंड्यांवरून वादाला तोंड फुटले असून, झेंड्यावर वापरण्यात आलेल्या राजमुद्रेवर आक्षेप घेत आता शिवप्रेमींकडून विरोध होऊ लागला आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज ठाकरेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सर्वांच्या नजरा

शिवसेनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जंगी सत्कार होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

महाअधिवेशनात राज ठाकरेंचा फुसका बार; माध्यमांतील फुटेज खात, जुन्याच गोष्टी सांगत केली ‘महानिराशा’

२३ जानेवारी २०२० बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती. याच दिवशी महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी करत माध्यमांची फुटेज सकाळपासूनच खायला सुरुवात केली होती. एक होते अपघाताने राज्याचे मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नरंजन करत धुव्वाधार भाषणं देणारे राज ठाकरे. यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडा बदलणे, महाअधिवेशन घेणे, अमित ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवणे आणि विधानसभा निवडणुकीनंतर आपली काय भूमिका आहे ते मांडणे हे सांगण्यासाठी मजबूत खटाटोप केला.

‘मी झेंड्याचा रंग बदलला, रंग बदलून सरकारमध्ये गेलो नाही!’; राज ठाकरेंनी लगावला शिवसेनेला टोला

राज ठाकरे यांनी आज मनसेच्या महाधिवेशनाची सुरुवात मराठी बांधवानो अशी न करता माझ्या तमाम हिंदू बंधुनो अशी केली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना झेंडा आवडला का असा प्रथम सवाल केला. कार्यकत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळताच राज ठाकरे यांनी अधिवेशनाला झेंड्याचा रंग बदलला म्हणून मी रंग बदलणार नाही. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसल्याचा टोला शिवसेनेला लगावला.

मनसेनं झेंडा का बदलला? राज ठाकरेंनी दिलं हे उत्तर

मनसेच्या महाअधिवेशनातं राज ठाकरे यांनी झेंडा बदलण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. मराठी बांधवानो अशी सुरवात करणाऱ्या ठाकरे यांनी या भाषणाची सुरवात माझ्या तमाम हिंदू बंधुनो अशी केली. झेंडा आवडला का असा सवाल करून सभेला सुरवात केली. यावेळी नवीन त्यांनी नवीन झेंड्याबाबत आपले विचार मांडले.

मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा; मनसे हिंदुत्वाच्या वाटेवर..

मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा लावण्यात आली. मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा दिसून आल्यानं राज ठाकरे उजव वळण घेत हिंदुत्वाच्या वाटेवर आपली राजकीय वाटचाल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.