रोहित पवारांना मोठा धक्का!! राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर युवा नेते प्रशांत शिंदे यांनी आमदार राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. रविवारी प्रशांत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजप नेते माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या ताब्यात गेल्यामुळे याचा मोठा धक्का रोहित पवारांना बसला होता. त्यानंतर आता आमदार शिंदे … Read more

राम शिंदेंना प्रत्युत्तर देताना रोहित पवारांचा नेम तानाजी सावंतांवर; म्हणाले ज्याला हाफकिन संस्था…

pawar shinde sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत याना मतदारसंघात येऊ नका म्हणत १० वेळा फोन केले असा आरोप आमदार राम शिंदे यांनी केल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत जशास तस प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी रोहित पवारांनी राम शिंदे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना तानाजी सावंत यांचा मात्र शेलक्या शब्दात समाचार घेतला … Read more

भाजपचे मिशन बारामती, 2024 ला गड सर करणारच; राम शिंदेंना विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 ला जसे अमेठीचा गड सर केला त्याचप्रमाणे 2024 ला बारामती जिंकणार असा निर्धार भाजप नेते राम शिंदेंनी केला आहे. बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु आहे. त्यामुळे बारामतीचा गड सर करणार असं राम शिंदे म्हणाले. भाजपनं राम शिंदे यांच्याकडे बारामतीच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. भाजपचे केंद्रातील मंत्री बारामतीला येणार … Read more

दबाव, दडपशाही, पैशाचा उतमात अन् सत्तेची मस्ती; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडला येऊन मेट्रो स्थानकांची पाहणी करून मेट्रोतून प्रवासही केला. पवारांच्या या दौऱ्यावरून भाजपाने निशाणा साधला. त्यानंतर आता भाजप नेते राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. “दबाव, दडपशाही, पैशाचा उतमात आणि सत्तेची … Read more

जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपमधील नेत्यांकडून टीका केली जात आहे. सध्या पवार कुटुंबांवर विरोधकांकडून टीका केली जात असल्याने जामखेड येथील एका कार्यक्रमात माजी मंत्री तथा भाजप नेते राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. “कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं झालंय. कुणाला सांगताही येईना, बोलताही येईना, … Read more

हे तर आरक्षणावर पडदा टाकण्याचे कारस्थान; राम शिंदे यांचा आघाडी सरकारवर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीतील नुकसानीतील मदतीवरून आज कोल्हापुरात दौऱ्यावेळीही मुख्यमंत्री ठाकरे व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलेबाजीही झाली. त्यांनतर आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी भाजपवर आरोप केला आहे. “मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आतापर्यंत वेळकाढूपणा केला आहे. आता पूरग्रस्तांच्या मदतीचे निमित्त मिळाले आहे. मात्र, त्या आडून मराठा … Read more

पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही- राम शिंदे

ram shinde pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आलं नसून पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जातं होत. त्यातच राज्यभर त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीवर भाजप नेते आणि माजी मंत्री … Read more

रोहित पवारांचे कट्टर विरोधक राम शिंदेंसोबत अजित पवारांची गुप्त बैठक; चर्चांना उधाण

ajit pawar ram shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप माजी मंत्री आणि रोहित पवारांचे कट्टर विरोधक असलेले राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. पण साखर कारखान्यावरच चर्चा करायची असेल तर भेटीबाबत गुप्तता का? असा सवालही चर्चिला जातोय. अंबालिका साखर कारखाना हा … Read more

महाराष्ट्रातही मोफत कोरोना लस द्यावी ; राम शिंदे यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात करोनाची लस आता येत आहे. केरळ, मध्यप्रदेश, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही मोफत करोना लस देणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेला देखील करोना लस मोफत मिळावी, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसं निर्णय जाहीर करावा,’ अशी मागणी भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. आपले पालकमंत्री कोल्हापूरचे … Read more

एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार, म्हणून राष्ट्रवादीने त्यांना फोडले – राम शिंदेंचा दावा

Ram Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर जोरदार टीका केली. एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्यानेच त्यांना राष्ट्रवादीने फोडलं, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरला कर्जत इथे ते पत्रकारांशी बोलत होते.या दरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी सध्या … Read more