सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा नाबार्डकडून उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्काराने सन्मान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हा बँकेने सातत्याने बँकिंग व नॉन बँकिंग क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे बँकेस उत्कृष्ठ कार्यक्षमतेबद्दल नाबार्डच्यावतीने उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण ऑनलाईन पद्धतीने केंद्रिय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने, बँकेचे जेष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आत्तापासूनच नियोजन करा ः रामराजे नाईक निंबाळकर

Ramraje Nibalkar Faltan

सातारा | कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या अंदाजानुसार लहान मुलांना तात्काळ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आत्तापासूनच नियोजन करा, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या. कै. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. यावेळी … Read more

गोंदवले बु. येथे चैतन्य कोविड सेंटरचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन

सातारा | महाराष्ट्रात शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेले रुग्ण जागेअभावी त्यांच्याकडून नियम पाळले जात नाहीत. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटरची संख्या वाढवावी, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सांगितले. गोंदवले बु. येथील चैतन्य कोविड सेंटरचे उद्घाटन … Read more

खोडजाईवाडी तलावामुळे परिसराचा विकास होईल – सभापती रामराजे नाईक निंबाळकर

सातारा (जिमाका) : खोडजाईवाडी येथे झालेल्या साठवण तलावामुळे येथील परिसराचा विकास झाला आहे. ज्यांनी या साठवण तलावाला जमिन दिली आहे. त्यांचे अभिनंदन करुन येथील पाण्याचा शेतकऱ्यांनी योग्य तो उपयोग करावा असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. साठवण तलावाचे भूसंपादन निधीचे वितरण व विविध विकास कामांचे भूमीपुजन व उद्घाटन विधान परिषदेचे सभापती … Read more

उदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक भेट; अन्…

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक – निंबाळकर व राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले   सातारच्या शासकीय विश्रामगृहामधील कक्ष क्रमांक १ मध्ये रामराजे थांबले होते. त्यावेळी उदयनराजे यांनी तेथे जाऊन त्यांची भेट घेतली व दोघांमध्ये दिलखुलास गप्पा झाल्या. रामराजे व उदयनराजे यांच्यामध्ये गेली अनेक महिने वितुष्ट होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमधील … Read more

या तीन अटीवर रामराजे निंबाळकर करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याच्या विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनाउत आला आहे. राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहत नाही. उदयनराजे भोसले यांच्या सोबत असलेल्या वादात नेहमी राष्ट्रवादी उदयनराजेना पाठीशी घालते आणि रामराजे बाबत पक्षपात करते ही करणे पुढे करून रामराजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली … Read more

सुभाष देशमुखांच्या लोकमंगलमुळे विधान परिषद तहकूब

मुंबई प्रतिनिधी | सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री  सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीमधील गैरव्यवहारप्रकरणी  राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी क्लीन चीट दिली आहे. महत्तावाचं म्हणजे  लोकमंगल सोसायटीच्या गैरव्यवहारा बाबत पोलीस फिर्याद दाखल असून चौकशी सुरु असतानाच राज्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली असल्याचे विधान परिषदेत स्पष्टीकरण दिले. लोकमंगल सोसायटीने कोणताही गैरव्यवहार केला नाही,उलट सरकारकडून घेतलेले अनुदान परत देण्याचा … Read more

मुख्यमंत्री आहेत थकबाकीदार ; ‘एवढ्या’ लाखांची भरली नाही पाणीपट्टी

मुंबई प्रतिनिधी |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थळाला मुंबई महानगर पालिकेने डिफॉल्ट घोषित केले आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरची पानपट्टीच भरली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीच थकबाकीदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्याची थोडी थिडकी नव्हे तर ७ लाख ४४ हजार ९८१ रुपये मुख्यमंत्र्यांनी थकवले आहेत. पाणीपट्टी थकवल्यास महानगर पालिका सर्व … Read more

वर्धापन दिनी मुख्यमंत्री शिवसेनेला देणार ‘हि’ खुशखबर

मुंबई प्रतिनिधी | आज शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात सांयकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने आमंत्रित केले आहे. आज पर्यतच्या शिवसेनेच्या इतिहासात पक्षा बाहेरील व्यक्तीला वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला कधीच आमंत्रित करण्यात आले नव्हते. मात्र या वर्धापन दिनी शिवसेनेने हा मान … Read more

दोन राजांचा वाद शिगेला ; रामराजेंचा पुतळा जाळल्याच्या निषेदार्थ फलटण बंद

फलटण प्रतिनिधी | भोसले आणि निंबाळकर घराण्याचा वाद हा ऐतिहासिक वाद म्हणून गणला जातो. याला साताऱ्याचे उदयनराजे भोसले आणि फलटणचे रामराजे निंबाळकर आफवाद ठरू शकणार नाहीत. कारण मागील दोन दिवसापासून रंगलेला दोघांमधील वाद आता शिगेला गेला आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी रामराजेंचा पुतळा जाळल्याने रामराजेंच्या समर्थकांनी फलटण बंद पाळला आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांना मिळणार … Read more