धक्कादायक! मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार; ४ आरोपींना अटक

देशातील विस्तारात चाललेली महानगर महिलांसाठी किती सुरक्षित आहेत यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाची धग आजही कायम असताना मुंबईत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील आपल्या घराकडे निघालेल्या एका प्रवासी महिलेवर मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे.

लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ४ नराधम शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेत पीडित विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून, ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात ४ नराधम शिक्षकानंविरुद्ध पॉक्सो कायदा, तसेच कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जत तालुक्यातील राजोबाचीवाडी येथील २१ वर्षीय किरण उर्फ केराप्पा ढेमरे या तरुणास जत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने पोक्सो, बलात्कार, अट्रासिटीचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. गुडडापूर येथील केराप्पा ढेमरे याची फेसबुकवरून शेगाव येथील अल्पवयीन मुलीची ओळख झाली.

गुजरात गँगरेप प्रकरणी रितेश देशमुखनं ट्विटवरून व्यक्त केला राग

दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर देशात सरकार बदलेले, कायदे बदलेले, नवीन कायदे आणले गेले तरी बलात्काराच्या घटना थांबत नाही आहेत. दिल्ली, बदायू, उना, हैद्राबाद या दरम्यानच्या अनेक बलात्काराच्या घटना देशातील महान समाजाच्या चेहऱ्यावर ओरखडे ओढत राहिल्या पण परिस्थितीत काही बदल झाला नाही आहे. यात आणखी भर पडली आहे ती गुजरातमध्ये घडलेल्या घटनेची. गुजरातमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार करून तिचे शव झाडावर लटकवण्यात आले होते. या १९ वर्षीय तरूणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या संतापजनक प्रकारावर अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करून न्यायाची मागणी केली आहे.

धामणगाव रेल्वेमध्ये ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, अमरावती जिल्ह्यातील सलग दुसरी घटना

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एका चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. या ६ वर्षीय चिमुकलीला घराबाहेर बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपी नागेश कुरील असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

दिल्ली निर्भया प्रकरणातील आरोपींची याचिका फेटाळली; चौघांचीही फाशी कायम

या खटल्याच्या मूळ निकालात त्रुटी नसल्याने त्याचा फेरविचार करण्याचा प्रश्नच नाही. हे प्रकरण ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ या प्रकारात मोडत असल्याने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात येत असल्याचं न्यायमुर्ती आर. बानुमती, अशोक भूषण आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं .

बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग महिला बलात्कार-हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी

हैद्राबाद येथील पाशवी बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असताना बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एका ५० वर्षीय दिव्यांग महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले.

महिलांच्या मनातील भयमुक्त वातावरणासाठी निर्णय घ्या! औरंगाबादमधील तरुणाईचे पंतप्रधानांना पत्र

हैद्राबाद बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील अटकेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी सर्व स्तरातून समोर येत आहे. यावर आता शहरातील तरुणाईने सुद्धा कणखर भूमिका घेत देशातील महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात यावे. अशा मागणीचे पत्र विद्यार्थ्यांनी थेट प्रधानमंत्र्यांना लिहिले आहे. तसेच यावर लवकर निर्णय घेण्यात यावा, आम्ही तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत असेही म्हटले आहे. हे पत्र तरुणांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले आहे. हे पत्र सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे.

बलात्काऱ्यांना जनतेसमोर ठेचून मारले पाहिजे! जया बच्चन राज्यसभेत हैदराबाद घटनेवर संतापल्या

चार दिवसांपूर्वी झालेल्या हैदराबाद मधील पशुवैद्यक असलेल्या तरुणीच्या बलात्काराच्या घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली. सर्व माध्यमातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. देशातील अनेक मान्यवर , सेलेब्रिटी यांनी देखील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

कन्नड तालुक्यात तरुणीचा मृतदेह आढळला, बलात्कार करून खून केल्याचा संशय

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असणाऱ्या आठेगाव येथे १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह चापानेर शिवारातील शेतात आढळून आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीचा खून करण्यात आला, की बलात्कार करून तिला मारण्यात आले, हे अजून स्पष्ट झालं नाही.