विनायक मेटेंच्या ‘त्या’ मागणीवर काँगेस संतापली; केला जोरदार पलटवार

मुंबई । मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवून एकनाथ शिंदे किंवा दुसऱ्या सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी विनायक मेटेंनी यांनी केली आहे. विनायक मेटेंच्या मागणीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार पलटवार केलाय. सचिन सावंत यांनी ट्विटवर विनायक मेटेंचा चांगलाच समाचार घेतला. सचिन स्वतः म्हणाले कि, ‘मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

‘भाजप, महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक’; काँग्रेसची घणाघाती टीका

मुंबई । अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या तपासावरून सातत्यानं मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे”, अशा शब्दात सचिन सावंत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. याशिवाय ‘बिहार निवडणुकीच्या राजकारणापायी तेथील पोलिसांचं गुणगाण करून मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या भाजप नेत्यांचा … Read more

अहो शेलार! मोदींच्या जन्माआधीपासून पॅसेंजर ट्रेन सबसिडीवरच चालतात- सचिन सावंत

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा ८५ टक्के खर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा भाजपनं केला होता. मात्र, मजुरांच्या तिकिटाचे पैसे राज्य सरकार देत असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर भाजपची पंचाईत झाली. अशा वेळी राज्यातील सत्ताधारी भाजपला घरात आहेत. त्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मैदानात उतरत शुक्रवारी बचाव करण्याचा … Read more

‘त्या’ ट्विटमधून फडणवीसांची मनातील भावना बाहेर आली बस..एवढंच- काँग्रेस

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वादाला निमंत्रण दिले आहे. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा यांच्या स्मृतीदिन. यानिमित्तानं फडणवीस यांनी राजर्षि शाहू महाराज यांना ट्विट करून अभिवादन केलं. मात्र, या ट्विट मध्ये फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. त्यावरून नवा वाद सुरू झाला … Read more

जवाब दो! उत्तरप्रदेशातील साधूंच्या हत्येनंतर आता काँग्रेसचे भाजपाला जळजळीत १० सवाल

मुंबई । भारतीय जनता पक्ष बुलंदशहरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडाबाबत ‘कानठळ्या बसवणारे मौन’ धारण करून बसला आहे. यातून त्यांचा दुतोंडीपणा आणि कोरोनासारख्या संकटकाळातही राजकारण करण्याची निंदनीय प्रवृत्ती चव्हाट्यावर आल्याची जळजळीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली आहे. पालघरच्या मॉब लिंचिंगच्या दुर्दैवी घटनेमध्ये २ साधूंसह तिघांची हत्या झाली होती. या … Read more

पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात अटक झालेले बहुसंख्य लोक भाजपचे

मुंबई । पालघरमधील मॉब लिंचिंगच्या घटनेवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणी भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात गुरुवारी रात्री झालेल्या साधूंच्या हत्याकांडावरून भाजपने रान उठवलं असताना सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. पालघरच्या घटनेवरून भाजप धार्मिक राजकारण करण्याचा हीन … Read more

#YesBank crisis: बडोद्याप्रमाणेच पिंप्री-चिंचवड महापालिकेचे सुद्धा ९३५ कोटी वाचवता आले असते..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘येस’ बँकेतील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करताना मोदी-शहांवर निशाणा साधला आहे. ‘येस बँकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच बडोदा महानगरपालिकेच्या बडोदा स्मार्ट डेव्हलमेंट कंपनीचे २६५ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेलाही याची कल्पना दिली गेली असती तर … Read more

अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा- सचिन सावंत

सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली होती. राऊत यांच्या माहितीवर सचिन सावंत यांनी काँग्रसेची भुमिका मांडत शिवसेनेला उपरोधक टोला लगावला.

बुलेट ट्रेन मोदींची प्राथमिकता असू शकेल, देशाची नाही! काँग्रेसने साधला मोदींवर निशाणा

बुलेट ट्रेन ही मोदींची प्राथमिकता असू शकेल देशाची नाही, असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. महाविकास आघाडीचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.