दुः खद : आईच्या निधनानंतर मुलाची आत्महत्या

Karad Police

कराड | आईच्या निधनानंतर तेराव्या विधी नंतर दुसऱ्या दिवशी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवार पेठेत शनिवार दि. 21 रोजी ही घटना घडली. अजित प्रभाकर करंदीकर (वय- 34) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पिग्मी एजंट युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, कराड मधील एक नामांकित बॅंकेत अजित हा पिग्मी एजंट … Read more

दुर्देंवी घटना : आईचं दूध श्वसन नलिकेत अडकल्याने चिमुकलीचा मृत्यू

mother's milk

कराड | साताऱ्यात एका चिमुकलीच्या घशात चाॅकलेट अडकल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदरची घटना ताजी असताना आता कराड तालुक्यातील कवठे येथे आईच्या अंगावर दूध पिताना श्वसन नलिकेत दूध अडकून अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वाती कृष्णत यादव … Read more

साताऱ्यात चाॅकलेट घशात अडकल्याने चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

Chocolate Stuck Throat Girl Died

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून, जेली चॉकलेट घशात अडकल्याने एक वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. मुलीच्या आईने चिमुकलीला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच चिमुकलीने आपला जीव सोडला. शर्वरी सुधीर जाधव (रा. कर्मवीरनगर, कोडोली सातारा) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. साताऱ्यातील ही धक्कादायक घटना कर्मवीरनगरामध्ये रविवारी (दि. 25) … Read more

कराडमध्ये दुर्घटना : पालिका कर्मचाऱ्यांचा चेंबर साफ करताना गुदमरून मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराच्या वाखाण परिसर येथे मोठी दुर्घटना घडली. अंडरग्राउंड ड्रेनेज साफ करत असताना नगरपालिकेचा एका कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर मदतीला गेलेला दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. नगरपालिकेकडे अत्यावश्यक सोयी- सुविधा नसल्याने ही घटना घडल्याचे समोर येत आहे. अनिरूध्द लाड असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तर जखमींचे … Read more

शरद लेवे, पै. संजय पाटील खून प्रकरणातील वकील धैर्यशील पाटील यांचे निधन

सातारा | बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी चेअरमन, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा राज्याचे माजी चेअरमन, सातारचे निष्णात फौजदारी विधिज्ञ अ‍ॅड. धैर्यशील पाटील तथा डी.व्ही. पाटील यांचे आज निधन झाले. महाराष्ट्रातील अनेक गाजलेले खटले तसेच सातार्‍यातील नगरसेवक शरद लेवे खून खटला, पैलवान संजय पाटील खून खटला अशा महत्वपूर्ण खटल्यांचे काम त्यांनी पाहिले होते. तब्बल … Read more

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज भोसले यांचे दुःखद निधन

सातारा | शांत, संयमी, सुसंस्कृत व आपल्या साधेपणाने ओळखले जाणारे सातारचे राजे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले त्यांचा जन्म 23 एप्रिल 1947 साली झाला. साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होते. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. सन 15 मे 1985 ते 16 डिसेंबर … Read more

हृदयविकाराने धक्क्याने जीव जातानाही एसटी चालकाने 25 प्रवाशांना वाचविले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके एसटी बसच्या एका चालकाने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपले कर्तव्य बजावल्याचे चित्र पहायला मिळाले. लष्करातील जवान ज्या पध्दतीने आपल्या जीवाची बाजी लावतात, त्याचप्रमाणे एका एसटी चालकाने प्रवाशांचा जीव वाचविला आहे. वसई- म्हसवड या बसचे चालक जालिंदर रंगराव पवार असे या चालकाचे नाव आहे. बसमधील 25 प्रवाशांना सुरक्षित करत आपला जीव सोडला … Read more

शिंदे गटाचे आ. अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन

सांगली | खानापूर आटपाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी सौ. शोभा बाबर तथा काकी यांचे आज (वय- 62) निधन झाले. पुणे येथील दिनानाथ मंगशेकर हाॅस्पीटलमध्ये गेल्या दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सौ. शोभा बाबर यांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्‍याने काही दिवस त्‍यांच्यावर विट्यात एका खासगी … Read more

केळवली धबधब्यात बारावीचा विद्यार्थी बुडाला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यात शेवटच्या टोकावर असलेला प्रसिध्द केळवली धबधबा या ठिकाणी एक युवक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सातारा शहरातील वायसी काॅलेजचा बारावीत शिकत असलेला राहुल सुभाष माने (रा. विकासनगर, सातारा) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साताऱ्यातील चार मित्र केळवली धबधबा पाहण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गेले होते. राहूल … Read more

उरमोडी नदीपात्रातून युवक वाहून गेला

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा तालुक्यातील नागठाणे येथे नदीपात्रातून एक युवक वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोज सुधाकर गडकरी (वय- 28) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. अद्याप वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागठाणे येथे उरमोडी नदी आहे. या नदीपात्रातून एक युवक वाहून गेला. सध्या परिसरात मोठा पाऊस कोसळत … Read more