कोणीही स्वतःला देव समजू नये – संजय राऊत

राज्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षामध्ये शिवसेनेने आज (सोमवारी) भारतीय जनता पक्षावर मोठा हल्ला चढवला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते स्वत:ला देव समजू लागले असून त्यांना वाटते की आम्ही काहीही करू शकतो, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांचं आजही एक हटके ट्विट

दररोज सूचक ट्विट करण्याऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एक ट्विट केलं आहे. बाळासाहेबांची पुण्यतिथी झाल्यानंतर आज सकाळी हे ट्विट केले आहे. दररोज काही ना काही हटके ट्विट करणाऱ्या राऊत यांनी आजही ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आजच ट्विट थेट दिल्लीतून केलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी संजय राऊत यांना दिल्या वाढदिवसाच्या सुरेल शुभेच्छा

मुंबई प्रतिनिधी । सत्तास्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादीचे सूर जुळताना दिसत आहेत. या नव्याने जुळणारणाऱ्या सुरांचा प्रत्यय आज संजय राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी सुरांचा सहारा घेतला. आव्हाड यांनी खास आपल्या शैलीत गाणे म्हणतं राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला. याबाबतचा एक विडिओ आव्हाड यांनी तयार … Read more

काँग्रेस नेत्याची संजय राऊत यांच्याशी ‘गहन’ चर्चा

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत तीन दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम हे लीलावती रुग्णालयात गेले आहेत.

किल्ला जोरदार लढवला ! अशोक चव्हाणांनी केलं संजय राऊतांचे अभिनंदन

शिवसेना खासदार संजय राऊत प्रकृती अस्वस्थामुळे लीलावती रुग्णालयात सध्या भरती आहेत . राऊत यांच्यावर हृदयविकार शस्त्रक्रिया केल्याने त्यांच्या तब्बेतीच्या चौकशीसाठी राजकीय नेते लिलावतीला दाखल झाले. आज काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण, विश्वजित कदम आणि माणिकराव ठाकरे यांनी राऊत यांची भेट घेत त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली.

सोनिया गांधींचा शरद पवारांना फोन, सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?

विशेष प्रतिनिधी | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन एकमत नसल्याचे घडामोडींवरुन दिसत आहे. अशात आता शरद पवार यांना सोनिया गांधी यांनी फोनवर चर्चा केल्याचे समजत आहे. सोनिया गांधी यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना चर्चेसाठी पाठवले आहे. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, … Read more

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात, काँग्रेसचा ‘हा’ नेता मांडणार बाजू

मुंबई प्रतिनिधी | राज्यात सरकार स्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग आला असून राज्यपालांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. मात्र आता शिवसेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या कडून सेनेने सदर याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी … Read more

संजय राऊत लिलावतीतूनच सोडतायत शब्दांचे बाण, कोणाला लिहितायत पत्र?

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी राऊत यांनी मागील आठवडाभर जबाबदारीची भुमिका घेत सेनेची बाजू लावून धरली आहे. मात्र सोमवारी छातीत दुखत असल्याने राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले होते. राऊत रुग्नालयात दाखल झाल्यानंतर राज्यभर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. आता शिवसेना पक्ष … Read more

‘हम होंगे कामयाब…’  संजय राऊतांचे हॉस्पिटल मधून ट्विट

मुंबई प्रतिनिधी ।  राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणखी गुंतागुंतीचा बनलेला असताना या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटलेली नाही असा विश्वास व्यक्त केला. संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना काल पासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं … Read more

Breaking | संजय राऊत लिलावती रुग्नालयात दाखल

दिल्ली | शिवसेना नेते संजय राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले आहेत. राऊत यांनी आज दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राऊत रुग्नालयात दाखल झाले आहेत. संजय राऊत मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील सत्तासमिकरणांबाबत देशभर चर्चा सुरु आहे. यामध्ये राऊत शिवसेनची बाजू मांडताना … Read more