पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर जनशक्ती शेतकरी संघटनेने उगारले आसूड

औरंगाबाद : शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासाठी बँका सतत टाळाटाळ करत आहेत. त्यात अजून भर म्हणजे पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक हा तर गंभीर विषय होत चालला आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँकांवर जनशक्ती शेतकरी संघटना आसूड उगारणार असल्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांनी पत्रकार परिषदेत दिला. शिवसेनेचे राज्य असतांना, त्यांच्या राज्यातही शेतकरी व … Read more

खूषखबर! कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार नवे कर्ज 

मुंबई । राज्याची खरीप हंगाम आढावा बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन बैठक झाली. राज्यात महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ न मिळालेले ११ लाख १२ हजार शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी नवे कर्ज देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच कोरोना मुळे जगभरातील अन्नधान्याची … Read more

८ करोड शेतकर्‍यांना सरकारचा दिलासा; खात्यात २ हजार जमा! तुमवे नाव आहे का इथे पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे.त्याचा सर्वाधिक परिणाम गरीब, शेतकरी आणि मजुरांवर झालेला आहे. या कारणास्तव मोदी सरकार त्यांना सतत दिलासा द्यायचा प्रयत्न आहे.अर्थमंत्री मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,पंतप्रधान किसान सन्मान निधी यांच्या अंतर्गत ८ कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात १६,१४६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाठविला गेला आहे.या योजनेंतर्गत दरवर्षी सरकार २०००-२००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये … Read more

शेती करणार्‍यांनाही मिळते पेन्शन, जाणुन घ्या पंतप्रधान किसान मानधन योजनेबाबत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण शेती करत आहात का ? तर मग शेतकरी या नात्याने आपण आपले रिटायरमेंट पण प्लॅन करू शकता आणि वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळवू शकता.पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत खाते उघडून आपण याचा लाभ घेऊ शकता.१८ ते ४० वय वर्षे असलेले लोकं या योजनेत सहभागी होऊ शकतात. … Read more

पीक नुकसानीचे तत्काळ पंचनाम्यांच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; जिल्हा कृषी अधीक्षकांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, यात रब्बीतील पिकांसह फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी आता आक्रमक झाले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करत आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये सडलेली फळे फेकून आणि खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध आंदोलन … Read more

…तर हे सरकार ५ वर्ष टिकणार नाही; रघुनाथ पाटील यांचा इशारा  

अभ्यास करतोय, माहिती घेतो. अस सांगत राहिले तर त्याचं सरकार पाच वर्ष टिकणार नसल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

‘शेतकरी संघटना’ २८८ जागा लढवणार- रघुनाथ दादा पाटील

सातारा प्रतिनिधी। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी आपआपल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘शेतकरी संघटने’चे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी देखील शेतकरी संघटना पक्षाची विधानसभेसाठी आपली भूमिका मांडली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व २८८ जागा लढवणार लढवणार असल्याची महत्व पूर्ण माहिती त्यांनी आज दिली. कराड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये … Read more

राजू शेट्टींना दणका : स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर करणार भाजपात प्रवेश

मुंबई प्रतिनिधी |  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय रविकांत तुपकर भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात तुपकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे देखील बोलले जाते आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तरुण चेहरा होते. त्याच प्रमाणे त्यांचा … Read more

‘४ हजार दर दिल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही’ – रघुनाथदादा पाटील

सोलापूर प्रतिनिधी | राज्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला ४ हजार रुपये दर जाहीर केल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शेतकरी परिषदेमध्ये राज्य सरकारला दिला. आज पंढरपूर इथे संत तनपुरे महाराज मठामध्ये शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातून हजारो शेतकरी संघटनेचे नेते, पदाधिकारी … Read more

पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जन आक्रोश मोर्चा’

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुराने शेतीसह छोटे मोठे उद्योग – व्यवसाय अशा विविध घटकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. नागरिकांना महापुराच्या विळख्यातून लवकर सावरण्याची गरज आहे. महापुरामुळे फटका बसलेल्या नागरीकांचा आक्रोश सुरू आहे. हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज शेकडो शेतकऱ्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला आला होता. ऑगस्ट महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी … Read more