भारतात Google Pay फ्री असेल, मात्र अमेरिकेत फंड ट्रान्सफरसाठी आकारले जाईल शुल्क

नवी दिल्ली । गुगलने बुधवारी स्पष्ट केले की, भारतात त्यांच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पे (Google Pay) च्या माध्यमातून फंड ट्रांसफरसाठी (Money Transfer) यूजर्सना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आणि ही फी फक्त अमेरिकेतील यूजर्ससाठीच आहे. वेब ब्राउझरद्वारे Google Pay सेवा पुढील वर्षी बंद केल्या जातील गेल्या आठवड्यात गुगलने जाहीर केले की, पुढच्या वर्षी ते … Read more

कॉन्फिडन्स! ‘विरोधकांना दिवसातून 5 वेळा चंद्रकांत पाटील नावाची गोळी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही’

सोलापूर । ‘चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून ५ वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही असाही टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. याशिवाय शिवसेनेनं (Shivsena) धमकीची भाषा वापरू नये. मी सुद्धा चळवळीतील कार्यकर्ता आहे,’ असा इशारा पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला दिलाय. सांगोला इथं चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा संपन्न … Read more

आम्ही सुपारी घेणारे,मग तुम्ही काय हप्ता घेणारे आहात का?? ; मनसे -शिवसेनेत रंगला कलगीतुरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे मध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. याच दरम्यान मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करु शकत नाही, त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्ययांना घ्यावी लागेल, अशी टीका  शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी केली होती. अनिल परब यांच्या या टीकेवर मनसेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही सुपारी … Read more

प्रताप सरनाईकांचे बिझनेस पार्टनर अमित चांदोळेंना ईडीकडून अटक, सलग 12 तास चौकशी

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे बिझनेस पार्टनर अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. अमित चांदोळे यांच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टॉप्स सिक्युरिटी या खासगी कंपनीशी संबंधित अमित चांदोळे यांना … Read more

‘मी मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झालीय’- देवेंद्र फडणवीस

पुणे । मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली असं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ”आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं,” असंही ते म्हणाले आहेत. आम्ही शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या … Read more

सेना नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून भाजप महाराष्ट्रद्रोही का?- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

पुणे । शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी समजू नये, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. आम्ही पण महाराष्ट्रातीलच नेते आहोत, आम्हालाही राज्याच्या अस्मितेचे भान आहे. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला … Read more

उद्धव ठाकरे पक्ष चालवण्यासाठीच जन्मले, प्रशासनासाठी नाही; चंद्रकांत पाटलांनी सोडली पातळी

मुंबई । महाविकास आघाडीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. प्रशासन चालवणं हा वेगळा विषय आहे. उद्धव ठाकरे यांनी उभं आयुष्य पक्ष चालवण्यात घालवलं. त्यांचा प्रशासनाशी काय संबंध? उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत. त्यांना प्रशासनाशी संबंधित … Read more

‘… तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही’; अजित पवारांचं महाविकास आघाडीबाबत मोठं विधान

Ajit Dada

सातारा । आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना ठणकावून … Read more

ईडीची कारवाई कशासाठी याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, कायदेशीर लढाई लढणार – प्रताप सरनाईक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीने छापेमारी केल्यानंतर अखेर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीने का कारवाई केली याची मला माहिती नाही. हीच माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. तसेच कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. खरं तर प्रताप सरनाईक हे भारताबाहेर नव्हते. ते मुंबईतच … Read more

सुरुवात आणि शेवट जनताच करते ; दरेकरांचा संजय राऊतांना टोला

Raut and Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीचा छापा टाकण्यात आल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण तापलं असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लक्ष केले. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे त्यांच्या या इशाऱ्याला विरोधी पक्षनेते प्रवीण … Read more