जर सरकारने काहीच चुकीचे केलेले नाही, तर मीडियावाल्यांची अडवणूक का ?? संजय राऊतांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका मुलीवर सामहिक बलात्कार झाल्याने सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी देशभरातुन निषेध व्यक्त होत आहे. याशिवाय, या प्रकरणी इतर राजकीय पक्षांनी योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. येथील स्थानिक पोलिसांच्या कार्यशैलीवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा … Read more

रामराज्य नव्हे हे तर जंगलराज ; सामनातून योगी सरकारवर जळजळीत टीका

shivsena and yogi adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील अयोध्येत राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली आहे, पण उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत. असं म्हणत शिवसेनेनं योगी सरकारवर निशाणा साधला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटायला गेलेल्या राहुल … Read more

आता हाथरस प्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांना यूपीला पाठवा ; शिवसेनेचे मागणी

shivsena and yogi adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. इतर राजकीय पक्षांनी या प्रकरणावरून योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील केला आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई व्हावी अस आवाहनही जनतेतून व्यक्त होत आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही या प्रकरणाचा तपास … Read more

नटीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी आता रस्त्यावर बसून पीडित मुलीच्या न्यायाची लढाई लढावी- संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईत एका नटीची बाजू घेऊन तिच्या बेकायदा बांधकामासाठी आमच्या विरोधात उभे राहिलेल्यांनी आता हाथरसला जाऊन मृत झालेल्या पीडित मुलीसाठी रस्त्यावर बसून तिच्या न्यायाची लढाई लढावी, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more

हाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक!! थेट राष्ट्रपतींना लिहिलं पत्र

shivsena and yogi adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. देशभर या घटनेचा निषेध केला जात असून अनेक राजकिय पक्षांनी या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकार वर निशाणा साधला आये. त्यातच आता या घटनेनंतर शिवसेना कमालीची आक्रमक झाली असून थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना साकडे घातले आहे. … Read more

‘पुढील साडेचार वर्षे तरी पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात नाही’, शिवसेनाचा भाजपाला सणसणीत टोला

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच एक भेट झाली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात ‘वन फाइन मॉर्निंग’ म्हणजेच एका सकाळी काही तरी घडेल असं म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग … Read more

व्यक्तिगत स्वार्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करत असेल तर आम्ही.. ; राऊतांचा कंगनाला सूचक इशारा

मुंबई । मुंबईतील जुहू येथील कंगनाच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आलं असून बाजू मांडण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी आपण बाजू मांडणार असून कोणी महाराष्ट्राची बदनामी करणार असेल तर षंढासारखं गप्प बसणार नाही असा इशाराही दिला आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. … Read more

महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार – संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष पूर्ण करणार, असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चेला पूर्णविराम बसला आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात होती.परंतु संजय राऊत यांनी या सर्व शक्यतेणा आता … Read more

शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंची ऑफर

मुंबई । शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. ‘शिवसेनेनं चक्रव्यूहात अडकू नये. त्यांनी ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावं. रिपाईंला सोबत घ्यावं आणि राज्यात सरकार स्थापन करावं,’ अशी ऑफर आठवलेंनी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार ५ वर्षे चालणार नाही. कामं होत नसल्यानं अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरीची … Read more

शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल नसलेल्या आघाडीला मी ‘एनडीए’ मानत नाही – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर, आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपासह एनडीए आघाडीवर निशाणा साधला आहे. ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही मी त्याला ‘एनडीए’ मानत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. “शिवसेना व अकाली दल … Read more