आघाडीतील बिघाडी टळली, राष्ट्रवादी युवक अध्यक्षाने घेतली प्रणिती शिंदेंविरुद्ध माघार

दरम्यान जुबेर बागवान यांच्या माघार घेण्याने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पंढरपुरात भाजपची धूर्त खेळी; आवताडेंना नाकारून पंतांना मित्रपक्षाकडून उमेदवारी

भाजपने मित्रपक्षाकरवी विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांचे काका आणि माजी आमदार सुधाकर परिचारक यांना उमेदवारी दिल्याने आवताडे समर्थकातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सोलापुरात दोन पोलिसांना लाच घेतांना रंगेहात पकडले, गुन्हा दाखल

सोलापुर प्रतिनिधी। सोलापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पोलिसांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. विभागाला मिळालेल्या माहितीनुसार विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित दोघा पोलिसांवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संतोष राठोड आणि महेश दराडे अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. या दोन लाचखोर पोलीसांवर 5 हजाराची लाचेची मागणी तसेच 3 हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत … Read more

आदिनाथ कारखान्याच्या कामगारांचा ‘रास्ता रोको’

सोलापूर प्रतिनिधी। करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आज थकित पगारासाठी आपल्या कुटुंबांसह रस्ता रोको आंदोलन केले आहे. आदिनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे 41 महिन्यांचे वेतन थकले आहेत. वारंवार मागणी करूनही कारखान्याचे संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे. कारखान्याचा कारभार पारदर्शक नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. कारखान्यास वेतन मंडळाच्या शिफारशी लागू आहेत. 25 वर्षात अनेकांच्या … Read more

सोलापूर जिल्ह्यात कॅनॉल फुटल्याने ४०० एकर शेतजमीन पाण्यात

सोलापूर प्रतिनिधी। उजनी धरणाच्या डाव्या कालव्याच्या मोहोळ शाखेवरील सय्यद वरवडे येथील काळे वस्तीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास कॅनॉल फुटल्याने सुमारे ४०० एकर शेतजमिनीमध्ये कॅनालचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे. उजनी धरणातील पाणी पातळी वाढल्यामुळे अतिरिक्त पाणी नदी आणि कालव्यामार्फत सोडले जात आहे. उजनीच्या सय्यद वरवडे गावाजवळून वाहणाऱ्या मोहोळ शाखा किलोमीटर तिसरा सय्यद वरवडे … Read more

मी तुरुंगात गेलो नाही ; शरद पवारांचा अमित शहांना टोला

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अमित शहा यांनी सोलापूरच्या सभेत त्यांनी काय केले असा सवाल केला होता. त्या सवालाचे शरद पवार यांनी सोलापूरातच उत्तर दिले आहे. मी अनेक चांगली वाईट कामे केली मात्र मी तुरुंगात गेलो नाही असे शरद शरद पवार म्हणाले आहेत. त्यांनी नाव नघेता अमित शहा यांच्यावर संधान साधले … Read more

माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिदें भाजपत प्रवेश करण्याचे संकेत..

सोलापुर प्रतिनिधी | राज्यात राष्ट्रवादी आणि काॅग्रेसाला सोडून सेना भाजपत प्रवेश करण्यासाठी अनेक आमदार आणि नेत्यांची चढाओढ सुरू असतानाच सोलापूर जिल्हयातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत हातात शिवबंधन बांधले आहे. त्यानंतर माढ्याचे आमदार बबन शिंदेनी ही राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. आमदार बबन शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांचे सलोख्याचे … Read more

चिन्ह बदलल्याशिवाय मी निवडूनच येत नाही – दिलीप सोपल; व्हीडीओ वायरल

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील जुन्या आणि नव्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मनोमिलनानाचा ‘निर्धार शिवशाहीचा’ हा मेळावा नुकताच पार पडला.  आणि या मेळाव्यात चर्चा रंगली ती बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची. ऍड.दिलीप सोपलांची आमदारकीची ही सहावी टर्म. ‘पक्ष आणि चिन्ह बदलल्या शिवाय मी निवडूनच येत नाही’, म्हणून घड्याळ सोडल असं सोपल म्हणाले. आधीच सोपल त्यांच्या खुमासदार भाषणाने महाराष्ट्रभर … Read more

माझा राजकीय वारस कार्यकर्ता देखील असू शकतो : दिलीप सोपल

बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणारे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. सोलापूर येथे आयोजित शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्यानंतर सोपल पत्रकारांना ही माहिती दिली . दरम्यान, आपला राजकीय वारसदार हा सोपल कुटुंबातीलच असेल असे नसून तो सामान्य कार्यकर्ताही असू शकतो, असेही सोपल म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यामध्ये … Read more