तालिबानी प्रवक्ता म्हणाला -“मी अमेरिकेच्या नाकाखाली अनेक वर्षे राहिलो, मात्र त्यांना पकडता आले नाही”

काबूल । अफगाणिस्तानात ताबा मिळाल्यानंतर तालिबानने तिथे आपले सरकारही स्थापन केले आहे. आता तालिबानचे नेतेही उघड्यावर येत आहेत. नुकतेच तालिबानचा मुख्य प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिदने एका मुलाखतीत सांगितले की,”काबुलमध्ये अमेरिकन सैन्याच्या मुक्कामाच्या काळातही तो दहशतवादी योजना राबवत असे.” जबीउल्ला मुजाहिद म्हणाला,”काबूलमध्ये मी अमेरिकन आणि अफगाण सैन्याच्या नाकाखाली माझे उपक्रम राबवत असे. मी केवळ काबूलमध्येच नाही तर … Read more

UNSC कडे आहे 2593 ठरावाची पॉवर, ज्याद्वारे अनेक तालिबानी दहशतवादी नेत्यांची खुर्ची हिसकावली जाऊ शकते

काबुल । तालिबानने आता अफगाणिस्तानवर पूर्णपणे कब्जा केला आहे. अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानात नवीन सरकारची घोषणाही केली. तालिबानच्या या नव्या सरकारमधील 33 मंत्र्यांपैकी 17 मंत्री हे दहशतवादी आहेत. खरं तर, या 17 दहशतवाद्यांची नावे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीच्या (UNSC) निर्बंध सूचीमध्ये समाविष्ट आहेत. तालिबान्यांनी या दहशतवाद्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान जरूर दिले असेल, … Read more

दहशतवादाच्या मुद्यावर भारताची कडक भूमिका, संयुक्त राष्ट्रात म्हंटले -“तालिबानने दिलेल्या आश्वासनांचे पालन केले पाहिजे”

वॉशिंग्टन । संयुक्त राष्ट्र (UN) मध्ये भारताने पुन्हा एकदा अफगाणिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तालिबानने अफगाणिस्तानची भूमी दहशतवादासाठी वापरली जाणार नाही या आपल्या वचनावर ठाम राहणे अत्यावश्यक असल्याचे भारताने गुरुवारी सांगितले. या व्यतिरिक्त, भारताने आशा व्यक्त केली आहे की, तालिबानच्या राजवटीत अफगाण लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतील. तालिबानने अलीकडेच अफगाणिस्तानमध्ये आपले अंतरिम … Read more

लॅपटॉपच्या बाजूला AK-47, ‘हा’ दहशतवादी बनला तालिबान सरकारमधील रिझर्व्ह बँकेचा प्रमुख

नवी दिल्ली । अफगाणिस्तानच्या रक्तरंजित ताब्यानंतर तालिबान्यांनी सरकार स्थापन केले. तालिबान सरकारने पंतप्रधानांपासून गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि कायदा मंत्रीपदी एकापेक्षा एक भयानक दहशतवादी बसवले आहेत. तालिबानने ब्लॅक मनीला व्हाईट करणाऱ्या हाजी मोहम्मद इद्रीस याची देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या ‘द अफगाणिस्तान बँक (DAB)’ चा प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. हाजी मोहम्मद इद्रिसचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर … Read more

पाकिस्तानविरोधातील आंदोलनाचे कव्हरेज केल्याबद्दल तालिबानकडून पत्रकारांना शिक्षा

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीसाठी पाकिस्तानने किती मदत केली आहे याची जगाला जाणीव आहे. पण तालिबान्यांना सत्य दाखवणे आवडले नाही. त्यामुळे काबूलमध्ये पाकिस्तानविरोधातील निदर्शने थांबवण्यासाठी गोळ्या झाडल्या गेल्या, तर आंदोलनाला कव्हर करणाऱ्या अफगाण पत्रकारांनाही शिक्षा झाली आहे. तालिबानने काबूलमध्ये पत्रकारांवर कहर केला आहे. तालिबान लढाऊंनी केवळ अनेक पत्रकारांना अटकच केली नाही, तर त्यांना कोठडीत ठेवून … Read more

तालिबानने अमेरिकेच्या या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला बनवले अफगाणिस्तानचा नवा गृहमंत्री

काबूल । संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर 22 दिवसांनी तालिबानने मंगळवारी त्यांच्या सरकारची घोषणा केली. तालिबानने अमेरिकेतील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानीची अफगाणिस्तानचे नवा गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. सिराजुद्दीन हक्कानीचे नावही जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आहे. त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी अमेरिकेने $ 50 लाख बक्षीस जाहीर केले आहे. तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत नवीन … Read more

तालिबानने पुन्हा सांगितले -“अफगाणिस्तान शरिया कायद्याने चालवले जाईल, आता कोणीही देश सोडू नये”

काबूल ।अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने आपल्या सरकारची घोषणा केली आहे. तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासोबतच तालिबानने अफगाणिस्तानबाबतची आपली आगामी धोरणेही सांगितली आहेत. तालिबानने पुन्हा स्पष्ट केले आहे की, अफगाणिस्तानमध्ये सरकार फक्त शरिया कायद्यानुसार चालणार आहे. जबीउल्लाह मुजाहिद यांनी लोकांना अफगाणिस्तान सोडू नये असे आवाहन केले. … Read more

अमेरिकेत अफगाणिस्तानच्या निर्वासितांना कडक तपासणी प्रक्रियेतून जावे लागणार, प्रत्येकाचा भूतकाळ शोधण्याची केली जात आहे तयारी

वॉशिंग्टन । अमेरिकेत जाणाऱ्या 80 हजारांहून अधिक अफगाण निर्वासितांना संपूर्ण तपासणी प्रक्रियेतून जावे लागेल. त्यांचे पुनर्वसन करण्यापूर्वी, वेगवेगळ्या देशांमध्ये स्थित पेंटागॉनच्या 4 लष्करी तळांवर त्यांची तपासणी केली जात आहे, जेणेकरून कोणताही दहशतवादी देशात प्रवेश करू शकणार नाही. 30 दिवस त्यांची सखोल चौकशी होईल. अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की,”या रिफ्यूजीजच्या संपूर्ण इतिहासाबरोबरच … Read more

काबुलमध्ये ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देणाऱ्या आंदोलकांवर तालिबानचा गोळीबार

काबुल । अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. येथे पाकिस्तानविरोधी रॅलीमध्ये जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी तालिबान लढाऊंनी गोळीबार केला. मात्र, या गोळीबारात सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 70 हून अधिक लोकं काबूलमधील पाकिस्तानी दूतावासाच्या बाहेर निदर्शने करत होते. यामध्ये मोठ्या संख्येने महिलांचाही सहभाग होता. या … Read more

पाकिस्तानमुळे तालिबान-हक्कानी नेटवर्कमध्ये सत्तेवरून सुरू झाला वाद

 काबुल । तालिबानने अफगाणिस्तानवर भलेही ताबा मिळवला असेल मात्र आतापर्यंत त्यांना सरकार बनवता आलेले नाही. सरकार स्थापनेसाठी तालिबानमध्ये संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानच्या ‘पंजशीर ऑब्झर्व्हर’ या वृत्तपत्राच्या रिपोर्ट नुसार, तालिबान आणि हक्कानी नेटवर्क सत्तेसाठी समोरासमोर उभे थकले आहेत. या दोन गटांमध्ये गोळीबार झाला आहे. अशाच एका घटनेत तालिबानचे सहसंस्थापक मुल्ला बरादर जखमी झाले. मात्र, सत्तेसाठी रक्तरंजित … Read more