महाराष्ट्रात 31 डिसेंबर पर्यंत लॉकडाउन वाढवला ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यातच राज्यातील कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता महाराष्ट्रात ठाकरे सरकारने 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी ठाकरे सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याची माहिती यातून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका … Read more

मी शांत आहे, संयमी आहे पण नामर्द नाही ; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परखड मुलाखत सामना वर्तमानापत्रातून आज वाचकांना वाचायला मिळणार आहे, तत्पूर्वी या मुलाखतीचे प्रोमो खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत, यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या ठाकरे शैलीत विरोधकांवर तुटून पडताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांना सडेतोड उत्तर देत उद्धव ठाकरेंनी भाजपवर … Read more

जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन ; उद्धव ठाकरेंचा नक्की कोणाला इशारा ??

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांची अभिनंदन मुलाखत शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून घेतली जात आहे. त्याचा पहिला प्रोमो खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे. या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत दिसले. जास्त अंगावर याल तर मी हात धुवून … Read more

हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकार नाकर्तेपणा दाखवत आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. मात्र, तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आगामी काळात मनसेला सोबत घेणार नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या … Read more

स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील ; दानवेंच्या ‘त्या’ विधानाला राऊतांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut and Danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल, असा दावा केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीचं सरकार देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार असून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल … Read more

येत्या 8-10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउन बाबत निर्णय घेऊ – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बर्‍याच राज्यात कोरोना संक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करत असून येत्या 8 ते 10 दिवसांत सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून लॉकडाउन बाबत पुढील निर्णय घेण्यात … Read more

अशोक चव्हाणांना हटविण्याची मागणी केल्यानेच माझी नियुक्ती रद्द केली ; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप

Narendra Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त करण्याचा मोठा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंडळाच्या सर्व नेमणुका रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला हा एक प्रकारे मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे. दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे. मराठा आरक्षण … Read more

“माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार” ; एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली.आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं … Read more

अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ राम कदमांचे उपोषण ; पोलिसांनी घेतलं ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपा आमदार राम कदम यांनी लाक्षणिक उपोषण केले आहे. शुक्रवारी सकाळी आमदार राम कदम हे मंत्रालयाच्या गेटसमोर फुटपाथवर आंदोलनाला बसले, यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाराष्ट्र सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. त्यानंतर काही वेळांनी पोलिसांनी आमदार राम कदम … Read more

सरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही ; राज ठाकरेंचा टोला

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?,” असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. आज त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बोलताना त्यांनी सरकारच्या … Read more