Video : नव्या कोऱ्या i20 चारचाकी गाडीवर नारळाचे झाड कोसळले

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील चाफळ व परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसात अनेक झाडे उन्मळून पडली. पावसात उभी असलेल्या एका नव्या कोऱ्या आय ट्वेन्टी (i20) या चारचाकीवर एक नारळाचे झाड कोसळले. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चाफळ (ता. पाटण) येथील सुरेश … Read more

दादा.. डोंगर कडा अख्ख्या गावाला गिळणार हाय… आम्हाला इथ रहायच नाय; धावलीतील ग्रामस्थांची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दादा.. डोंगर..कडा अख्ख्या गावाला गिळणार… आम्हाला नाय इथ रहायच..आम्हाला सुरक्षित ठिकाणी आसरा द्या.. नायतर माळीण सारखं ढिगाऱ्याखालून आम्हाला काढण्याची यळ तुम्हावर येवू देवू नका?, असा प्रश्न महाबळेश्वर तालुक्यातील धावली येथील बाबुराव पार्टे या वयोवृद्ध आजोबांशी गावकऱ्यांनी राज्यसरकारला केला आहे. मुसळधार पावसामुळे धावली गावावर भूस्खलनामुळे दरडी कोसळण्याच्या धोका आहे. त्यामुळे अजूनही … Read more

मुसळधार पावसामुळे मुंबई रेल्वेचे पन्नास हजाराचे तिकीट रद्द

tapowan express

औरंगाबाद | सध्या मुंबईमध्ये प्रचंड पाऊस होत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी दरड कोसळत असल्यामुळे या मार्गावरील चार एक्सप्रेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी तिकीट बुक केलेल्या सुमारे पन्नास ते साठ हजार प्रवाशांनी त्यांचे तिकीट रद्द केले होते. हजारो प्रवासी नांदेड मुंबईवर प्रवास करतात. सध्याच्या काळात एक्सप्रेस आरक्षित असल्यामुळे अगोदरच प्रवाशांना नोंदणी करावी लागते. त्याशिवाय प्रवास … Read more

महाबळेश्वर तालुक्यातील 113 पैकी 85 गावे अद्यापही संपर्कहीन

महाबळेश्वर प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सातारा, सांगलीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, पाटण व जावळी तालुक्यातील काही गावांना आतापर्यंत भूस्खलन व पुराचा चांगलाच फटका त्यात महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावांपैकी 85 गावे अद्यापही संपर्कहीन आहेत. त्या ठिकाणी या गावात दळणवळण सुरु करणे व रस्ते करण्यासंदर्भात सातारा येथे खासदार … Read more

पश्चिम महाराष्ट्रातही मोठे नुकसान; येथेही उद्या दौरा करणार – उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला तर महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. तर कोल्हापूर, सातारा, सांगलीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला जाऊन पूरग्रस्तांच्या व्यथा … Read more

बाधित लोकांचे पुनर्वसन करून पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देणार – नारायण राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल तळीये गावात जाऊन दरडग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर आज भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस … Read more

भूस्खलनातील बाधितांना शासनामार्फत पूर्ण मदत केली जाईल – नाना पटोले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या गावात प्रशासनाच्यावतीने मदतकार्य केले जात आहे. दरम्यान, यातील वाई तालुक्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट देत दौरा केला. यावेळी त्यांनी बाधीत लोकांना शासनामार्फत पूर्ण मदत करण्यात येईल तसेच मदत व पूनर्वसन मंत्री … Read more

राज्य, केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्थांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार – प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ढगफुटीसद्रूश्य पावसामुळे चिपळूण तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली. या ठिकाणच्या अनेक भागात पाणी साचून एनडीआरएफचे पथक पुण्याहून चिपळुणात रात्री उशिरा दाखल झाली. या ठिकाणी झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सकाळी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस हे आज महाड, चिपळूण या जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी रवाना झाले. केंद्र … Read more

सातारा जिल्ह्यात 379 गावे बाधित; 18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता – जिल्हाधिकारी शेखर सिह

सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता झाले आहे. तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे. याबाबत सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी महत्वाची माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात एकूण 1 हजार 324 … Read more

तांबवे गावास पाण्याचा वेढा : सर्व मार्ग बंद, संपर्क तुटला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीपात्रात मोठी वाढ होत आहे. कराड तालुक्यातील नदीकाठी असणार्‍या तांबवे गावाला या पुराच्या पाण्याचा फटका प्रत्येक वर्षी बसत असतो.  कराड तालुक्यातील पूरग्रस्त म्हणून ओळखले जाणारे गाव तांबवे हे सलग दुसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. तांबवे गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढले असून … Read more