आपण एका विषाणू सोबत जागतिक युद्ध लढत आहोत, तेव्हा घरात रहा! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोना विषाणूचा संसर्गाची प्रकरण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून संबोधन केलं. आपण एका विषाणू सोबत जागतिक युद्ध लढत आहोत तेव्हा एकजुटीनं लढण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा, सरकारी यंत्रणेवरील ताण वाढवू नका, सरकारने दिलेल्या सूचना पाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील … Read more

आम्ही भाजपपासून वेगळे झालो, हिंदुत्वापासून नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान पत्रकारांनी हिंदुत्वाबाबत विचारलेल्या एका प्रश्नांला … Read more

जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. त्यामुळं मराठी भाषा दिन चिंतित मनानं साजरा करण्याची गरज नाही. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला शत्रूची पळापळ व्हायची असं मत मुख्यमंत्री उद्धव … Read more

दिल्ली विधानसभा निकाल:‘मन की नव्हे तर जन की बात’ आता देशात चालणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र बर्‍यापैकी स्पष्ट झालं आहे. दिल्लीतील लोकांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्याकडे सत्तेची चावी सोपविली आहे. दिल्लीतील विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत. ”दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे मन:पूर्वक अभिनंदन. … Read more

हिंगणघाट जळीतकांड पीडितेच्या उपचारासाठी सरकारकडून आर्थिक मदत

हिंगणघाटमधील जळीतकांड प्रकरणी पीडितेच्या उपचारासाठी राज्य सरकारकडून ४ लाखांची रक्कम ऑरेंज सिटी रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत दिली गेली आहे. याचबरोबर पीडीतेच्या उपचारासाठी गरज भासल्यास आणखी आर्थिक मदत देण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.

शेलार जर बाप काढत असतील तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रात सीएए  लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेवर सीएए लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का? अशी जळजळीत टीका भाजपचे नेते आशीष शेलार यांनी केली आहे. नालासोपारा येथील एका कार्यक्रमात शेलार यांनी शेलार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधानावरून नवा राजकीय आता वाद निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘अयोध्या’वारीचा दिवस ठरला! या दिवशी करणार प्रयाण

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संदय राऊत यांनी ‘राज्य सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत जातील, ट्विटरवरून माहिती दिली होती. त्यानुसार अयोध्या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम ठरला असून येत्या ७ मार्चला मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर २०१८ रोजी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारा त्यांचा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

भगवा झेंडा खाली ठेवला नाही, आमचं अंतरंगही भगवंच; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलं भाजपाला प्रतिउत्तर

शिवसेनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जेष्ठ शिवसैनीकांच्या हस्ते जंगी सत्कार करण्यात आला. वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपकडून होत असलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं.

‘माझं घड्याळाचं दुकान नाही मात्र घड्याळवाले माझे पार्टनर आहेत’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामती दौऱ्यावर आहेत. गुरूवारी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विकास केंद्र बारामती यांच्यातर्फे माळेगाव येथे भरविण्यात आलेल्या ‘कृषिक २०२०’ या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या उदघाटनावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री दादा भुसे, प्रसिद्ध अभिनेते आमीर खान पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार आणि बारामती कृषी विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते.

शेतकरी कर्जमाफीसाठी पोलिस अधिकाऱ्याचा पुढाकार, १ महिन्याचा पगार पाठवून उचलला खारीचा वाटा

पावसाळ्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला. यामध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला सुद्धा सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केला असून याबाबतचे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.